ट्रॅक्टर मिळतोय आता ५० टक्के अनुदानावर,ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३/२४

Tractors are now available on 50 percent subsidy, Tractor Subsidy Scheme 2023/24

Tractors are now available on 50 percent subsidy, Tractor Subsidy Scheme 2023/24, राम राम मंडळी महाराष्ट्र शासनाने २०१९ /२० साली कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते त्याबद्दलची माहिती आपण पुढे जाऊन पाहूयात.

Tractors are now available on 50 percent subsidy, Tractor Subsidy Scheme 2023/24

ट्रॅक्टर मिळतोय आता ५० टक्के अनुदानावर, राम राम मंडळी केंद्र व राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत या योजनेसाठी तसेच अनेक शेती विषयक यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान देत असते.या योजनेसाठी सन २०२३/ २४ करिता ३०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्रामध्ये आधुनिकता व यांत्रिकीकरण वाढावे यासाठी केंद्र व महाराष्ट्र सरकार कृषी क्षेत्रामध्ये तथा कृषी यांत्रीकीकरणाला प्राधान्य देत आहे. देशामध्ये वाढत चाललेले औद्योगीकीकरण, लोकसंख्येबरोबर घटत चाललेली जमीन धारणा, तसेच बैलांची देखील घटत चाललेली संख्या यामुळे शेतकऱ्यांसमोर कामासाठी अपुरे असलेले मनुष्यबळ, मजूर तसेच वाढत चाललेले मजुरीचे दर आणि हंगामामध्ये मिळणारा कमी कालावधी या सर्वांचा आढावा तथा विचार करता केंद्र शासनाने सर्व राज्यात २०१९/२० पासून कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केली.

राज्य शासनाने त्या संदर्भातील शासन निर्णय ३१ मे २०२३ रोजी कृषी विभागाकडे प्रारीत करण्यात आलेला आहे.कृषी यांत्रिकीकरण योजना तथा ट्रॅक्टर योजना २०२३/२४ अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीमध्ये अनुसूचित जाती/ जमाती, महिला प्रवर्ग, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ५० टक्के किवा १.२५ लाख रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात देण्यात येईल.खुल्या प्रवर्गासाठी व इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किवा एक लाख रुपये यांपैकी जी रक्कम असेल तेवढी रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येईल. देशातील तथा सर्व राज्यातील शेती मशागतीच्या खर्चावर काही स्वरुपात तसेच शेतकऱ्यांच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील शेतकरी वर्ग अर्ज करू शकतात. सन २०२३/२४ या आर्थिक वर्षात जवळ जवळ २५ हजार शेतकर्यांना ट्रॅक्टर वितरीत करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची निवड हि लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२३/२४ या वर्षांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु ट्रॅक्टर झालेली असून या योजनेचे 2WD आणि 4WD हे दोन प्रकार आहेत,या ट्रॅक्टर योजनेअंतर्गत 8HP ते 70HP क्षमतेच्या ट्रॅक्टरवर तथा ट्रॅक्टर खरेदीसाठी ७५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच 20HP ते 40HP ट्रॅक्टरसाठी १ लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. आर्थिक वर्ष सन२०२३/२४ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी २१० कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे,तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी तथा विविध योजनेसाठी अनुदान देण्यात येते. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२३/ २४ या योजनेंतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील शेतकरी वर्गाला महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून online अर्ज सादर करावे लागतील. शेतकऱ्यांची निवड हि लॉटरी पद्धतीने होणार आहे, कृषी यांत्रिकीकरण या योजेनेत एकदा अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांची निवड होईपर्यंत तो अर्ज बाद होत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी मिळणारे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दुबार अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत मिळणारे अनुदानाची रक्कम हि ज्या शेतकऱ्यांची निवड होईल, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जमा करण्यात येईल.

चला तर आपण पाहूयात, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान या अनुदानासाठी असणाऱ्या पात्रतेच्या आटी तसेच लागणारी कागदपत्रे आपण पुढे पाहूयात
कागदपत्रे
 • जमिनीचा सातबारा उतारा ८-अ प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे
 • अर्जदार जर अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे
 • पुर्वसंमती पत्र
 • स्वयंघोषणा पत्र
 • जो ट्रॅक्टर किवा औजार खरेदी करायचे आहे त्याचे कोटेशन
 • पासपोर्ट साईझ फोटो
पात्रता/आटी
 • अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराच्या नावावर स्वतच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे
 • एका वैयक्तिक शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टरचा लाभ या योजनेअंतर्गत घेता येईल.
 • शेतकरी जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास त्याला जात प्रमाणपत्र जोडणे बधंनकारक राहील.
 • एखाद्या व्यक्तीला जर औजाराचा लाभ मिळाला असेल तर, दुबार त्या व्यक्तीला त्याच औजारासाठी किमान 10वर्ष तरी लाभ घेता येत नाही, परंतु त्या व्यक्तीला जर दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करायचा असल्यास तो करू शकतो.

अर्जदार कशा पद्धतीने अर्ज करू शकतो हे पुढे आपण पाहूयात

अर्जदार महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट महाडिबीटी पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करू शकतो

तसेच अर्जदार ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतो, ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्जदाराला त्याच्या जवळच्या संबंधित कृषी कार्यलयात जावे लागेल. तिथे या योजने संबंधित जे कुणी अधिकारी असतील ते या योजने संबंधित माहिती देतील.

अशा पद्धतीने कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल वर अर्ज करून या शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा, आणि देशातील तसेच सर्व राज्यातील शेतकरी बांधवानी या योजनेतून समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रबंधूणा नक्कीच शेअर करावी,तसेच आमच्या Yojnajankalyankari.com या संकेत स्थळाला आवश्य भेट द्यावी. धन्यवाद