आता आनंदाचा शिधा वर्षभर मिळणार ?

Will you get the ration for a year now?

Will you get the ration for a year now? राम राम मंडळी,आता आनंदाचा शिधा वर्षभर मिळणार आहे, १ कोटी ५८ लाख लोकांना होणार आहे याचा फायदा. चला तर मग पुढे जाणून घेऊयात या संदर्भात माहिती

Will you get the ration for a year now?

आता आनंदाचा शिधा वर्षभर मिळणार आहे, तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे तथा शासनाने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे वर्षभर पाठवला आहे. याचा फायदा १ कोटी ५८ लाख नागरिकांना होणार आहे, इथून मागे राज्य शासनाने सण उत्सवाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सणवार आनंदात साजरे करता यावे तसेच सर्वसामान्यांना सणासुदीत गोडधोड करता यावे या हेतूने राज्य सरकारने आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरु केला आहे. याची किंमत १०० रुपये इतकी घेण्यात येते,आणि या आनंदाच्या शिध्याची वाटप हि स्वस्त धान्य दुकानावर म्हणजे जिथे सर्वसामान्य नागरिकांना मोफत राशन दिले जाते, तिथे उपलब्ध केले गेले आहे.

गेल्यावर्षी फक्त दिवाळीला आनंदाचा शिधा देण्यात आला होता,परंतु ह्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व गुडीपाडवा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले होते, त्यानंतर गणेश चतुर्थीचे औचित्य साधून आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले होते. या दोन्ही सणावेळी शिधाजिन्नस संचामध्ये 4 जिन्नस देण्यात आले होते, त्यामध्ये चणाडाळ, रवा, साखर, प्रत्येकी १ किलोग्राम देण्यात आले होते,आणि खाद्यतेल १ लिटर देण्यात आले होते. त्यानंतर दीपावली व जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ३५०) या सणानिमित्त आनंदाच्या शिध्याचे वितरण करण्यात आले आहे, परंतु ह्या वेळेस शिधाजिन्नस संचामध्ये सहा शिधाजिन्नस समाविष्ट केवळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरणासाठी देण्यात आले होते, यामध्ये साखर १ किलोग्राम, खाद्यतेल १ लिटर,चणाडाळ आर्धा किलोग्राम, रवा अर्धा किलोग्राम, मैदा आर्धा किलोग्राम, आणि पोहे अर्धा किलोग्राम देण्यात आले आहे,नेहमीच्या शिधाजिन्नस संचापेक्षा ह्या शिधाजिन्नस संचामध्ये २ जिन्नस अधिक देण्यात आले होते, त्यामध्ये मैदा व पोहे ह्या जिन्नसांची वाढ करण्यात आली आहे.

दिवाळीमध्ये महायुती सरकारने हा आनंदाचा शिधा देऊन सर्व सामान्य नागरिकांच्या तसेच गरीब व दुर्बल कुटूबांच्या आनंदामध्ये भर घातली आहे. परंतु आता महाराष्ट्र शासनाने तथा अन्न व नागरी पुरवठा विभागाने आता आनंदाच्या शिध्याचे वितरण वर्षभर सुरु ठेवण्याच्या विचारात आहे, आणि लवकरच याला मान्यता देण्यात येईल. आणि या आनंदाच्या शिध्याची किंमत केवळ १०० रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. वर्षभर आनंदाचा शिधा वितरणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे, कारण नागरिकांना अत्यंत कमी दरामध्ये हि जिन्नस उपलब्ध होत आहेत. आणि याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात १ कोटी ५८ लाख सर्व सामान्यांना तथा गरीब व दुर्बल समाजातील नागरिकांना होणार आहे. याचे वितरण हे स्वस्त धान्य दुकानात होते,आणि यासाठी नागरिकांना मशीनवर अंगठा द्यावा लागतो, कारण हे जे रास्त भावामध्ये वितरण देण्यात येते हे त्या शिधाधारकाला मिळाले पाहिजे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून अंगठा देणे बंधनकारक आहे, आणि मशीनवर अंगठा लावताना जी थैली दिली जाते त्यामध्ये शिधाजिन्नस संचामध्ये ज्या जिन्नसांचे समाविष्ट करन करण्यात आले आहे ते जिन्नस मिळाले का याची खात्री नागरिकांनी करावी.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्व जिन्नसांची गुणवत्ता चांगली दिली आहे, या जिन्नसांची Manufactured & packed हे पुण्यातील shiva enterprises यांना देण्यात आलेले दिसून येत आहे, आणि या जिन्नसांची अंतिम मुदत हि पैक केल्याच्या तारखेपासून 4 महिन्यापर्यंत देण्यात आलेली आहे. आत्ताच देशातील चार राज्यातील निवडणुका पार पडल्या, यामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला तीन राज्यामध्ये घवघवीत यश मिळाले आहे, महाराष्ट्रामध्ये देखील महायुती सरकार आहे, आणि आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे राज्य सरकार तथा केंद्र सरकार सर्वसामन्याच्या व आर्थिक व दुर्बल समाजाच्या फायद्याच्या योजना अमलात आणतील असे दिसून येत आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळीना नक्कीच शेअर करावी, तसेच आमच्या yojnajankalyankari.com या संकेत स्थळाला आवश्य भेट द्यावी धन्यवाद.

website link