Good news for ration card holders, food grains will be free for so many years..
Good news for ration card holders, food grains will be free for so many years,राम राम मंडळी आज आपण पाहणार आहोत केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना(पीएमजीकेएवाय) या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य दिले जाणार आहे..
Good news for ration card holders, food grains will be free for so many years
रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण केंद्र सरकार आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत आता ५ वर्ष मोफत धान्य देणार आहे, तसा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण असून याचा फायदा हा समाजातील तथा देशामधील सर्व राज्यातील गरीब कुटूबांना होणार आहे.
केंद्र सरकारने जानेवारी २०२३ मध्ये १ वर्षासाठी हा निर्णय घेतला होता, परंतु आता हा निर्णय ५ वर्षासाठी केला गेला आहे. या योजनेचे उदिष्टे ८१ कोटीपेक्षा जास्त लोकांसाठी अन्न व पोषण सुरक्षा सुन्निषित करणे असून ५ वर्षासाठी अंदाजे ११.८० लाख कोटी रुपये खर्च येणार आहे, हा एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे.कारण इथून मागे कोणत्याही सरकारने असा निर्णय घेतलेला नाही. सर्व राज्यातील सर्व सामान्य नागरिकांसाठी तथा रेशनकार्ड धारकांसाठी हि योजना लागू आहे. या योजनेमुळे जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये आपला देश मानाचे स्थान मिळवेल यात काहीच शंका नाही.
वन नेशन वन रेशन कार्ड तथा एक देश एक शिधा पत्रिका या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना देशातील तथा सर्व राज्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवनगी मिळेल, आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत सुलभता येईल असे वाटते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जानेवारी २०२४ पासून मोफत धान्य वाटप ५ वर्षासाठी आणि अन्नधान्याची तरतूद पोषण सुरक्षेची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ११.८० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे,त्यामुळे या कामातून तथा योजनेतून पंतप्रधानांच्या कामाची वचनबद्धता, दूरदृष्टी दर्शवते. त्यामुळे देशातील तथा सर्व राज्यात्तील सर्व सामान्य जनता तसेच गरीब कुटुंबांना या योजनेचा नक्कीच चांगल्या प्रकारे व दीर्घकालीन शून्य किमतीसह फायदा होईल, व धोरणाची दीर्घकालीन हमी राहील.
आताच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये मोदीसरकारने तथा भारतीय जनता पार्टीने ३ राज्यामध्ये घवघवीत यश मिळवलेले आहे, आणि लोकसभा निवडणूक देखील जवळ आली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र तथा मोदीसरकार मोठ्या आणि जनतेसाठी लाभदायक योजना अमलात आणतील.