बांबू लागवड योजना|Bamboo plantation scheme 2024

Bamboo plantation scheme 2024

Bamboo plantation scheme 2024 नमस्ते शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवडीला प्रोत्साहित केले जात आहे,तथा प्राधान्य दिले जात आहे. आणि मनरेगाच्या अंतर्गत या योजनेला जवळपास सात लाख रुपये इतके अनुदान दिले जात आहे, चला तर मग जाणून घेऊ या संदर्भातील संपूर्ण माहिती.

Bamboo plantation scheme 2024

बांबू लागवड योजना, मंडळी महाराष्ट्र राज्य शासनाच्या तर्फे शेतकऱ्यांच्या भल्याच्या दृष्टीने म्हणजे, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने भरपूर योजना या अमलात आणल्या जातात. आणि त्यासाठीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून बांबू लागवड योजना या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जात आहे. अगदी मिशन मोड वरती महाराष्ट्र मध्ये ही योजना राबवली जात आहे. आणि मनरेगा योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी जवळपास हेक्टरी सहा लाख 97 हजार रुपये इतक्या अनुदान दिले जाणार आहे. आणि हाच उपक्रम राज्यामध्ये मिशन मोड वरती राबविण्याकरता राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी योजना मंत्री. संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची अशी बैठक पार पडली, ज्या बैठकीला वनविभाग, कृषी विभाग फलोविभाग,उत्पादन विभाग याच प्रमाणे मनरेगाचे सचिव म्हणजेच आयुक्त लेव्हलचे जे अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आणि या सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली ही महत्त्वाची अशी बैठक, आणि या बैठकीमध्ये या योजनेसाठीचा वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्यासाठीचा निर्देश तथा आदेश हा मंत्री संदीपानजी भुमरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

बांबू लागवडीला आता सात लाख रुपयांचे अनुदान मिळणार

मंडळी शेतकऱ्यांचा तथा मजुराचे हित लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्या, त्याचप्रमाणे या योजनेसाठीच्या असलेल्या अंदाजपत्रक आहेत याच्यामध्ये जमीन तयार करणे असेल तसेच कुंपण योजना असेल या सर्व बाबींचा समावेश करून ही योजना राबवण्यासाठी वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक तयार करावीत अशा प्रकारचे निर्देश मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि आता याच पार्श्वभूमीवरती या योजनेसाठीची अंदाजपत्रक तसेच आराखडे तयार केले जातील. आणि लवकरच याच्यातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना 6 लाख 97 हजार रुपये प्रति हेक्टर असे अनुदान असलेल्या या बांबू लागवडीच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत तुम्ही बांबू लागवड ही शेतामध्ये 3×3 मीटर अशा पद्धतीने करू शकता. असे देखील सांगण्यात आलेले आहे. आणि तसेच तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये या बांबू लागवड करायचे असेल तर त्यांनी एक प्रकारचा ग्रुप तयार करून तेथील नजीकच्या तुमच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामरोजगार सेवक असेल तर ग्रामसेवक असेल यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि तेथे ठराव मंजूर करून घेऊन पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याजवळ हा ठराव सबमिट करायचा आहे, तिथे त्यांना या ठरावाला संमती मिळेल आणि तिथून संमती मिळाल्यानंतर ते संमती पत्र घेऊन शासनाने नियुक्त करून दिलेल्या ज्या काही नर्सरी असतील त्या नर्सऱ्यांना आपण दिलेले संमती पत्र तथा ते पत्र सादर करायचे, आणि आपल्याला त्या पत्राच्या आधारे त्या नर्सरीमध्ये आपल्याला रोपांची संख्या मिळणार आणि त्या नर्सऱ्यांना शेतकऱ्यांना आपल्या जवळची तथा आपल्या खिशामध्ये कोणताही एक रुपया द्यायचा नाही, शासन त्या नसऱ्यांना त्या रोपांचे पैसे देणार. त्यामुळे शेतकऱ्यांना आभार रोपला खरेदी करण्याची पद्धत एकदम सोप्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे.

बांबू शेतीचे फायदे

मित्रांनो केंद्र सरकारने राज्य सरकार बांबू लागवडीला तथा बांबू शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. तसेच बांबू शेती ही कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व इथेनॉल निर्मितीसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार या हे दोन्ही सरकार बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित तथा प्राधान्य देत आहे. मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू शेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंत प्रतिहेक्टरी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दोनच जिल्हे समाविष्ट होते ते म्हणजे सातारा आणि लातूर त्यानंतर छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री माननीय संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याचा समावेश केला व जालना जिल्ह्यामध्ये बांबू शेतीची लागवड मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे जालना जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला. मित्रांनो माननीय नितीनजी गडकरी यांनी एका कार्यक्रमांमध्ये असे सांगितले आहे की आपल्याला देशांमधील पेट्रोल व डिझेल हद्दपार करायचे आहे, त्यामुळे तुम्ही एक टन बांबू जर गाळला तर त्यातून तीनशे लिटर इथेनॉल निर्मिती होते, तसेच आपल्या देशामध्ये जेवढ्या औष्णिक विद्युत केंद्र आहेत त्याच्यासाठी लागणारा जो कोळसा असतो त्याच्यासाठी लागणारा जो बायोमास आहे तो बांबूपासून बनवला जातो, आणि याचा वापर वाढवा तसेच कार्बन उत्सर्जन कमी व्हावं हा एक उद्देश त्याच्या मागचा राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा आहे. पृथ्वीवरील कार्बन उत्सर्जन कमी करणे, बांबू पासून इथेनॉल निर्मिती करणे तसेच बांबू निर्मित वस्तूंचा वापर वाढवून प्लास्टिक वस्तूंचा वापर कमी करणे हा केंद्र व राज्य शासनाचा मुख्य हेतू तथा उद्देश आहे.

मंडळी आपण जर पाहिलं तर बांबू लागवडीची तसे भरपूर फायदे आहेत, बांबू चा वापर हा मोठ्या प्रमाणावरती बांधकामासाठी होतो तसेच लग्न मंडपासाठी होतो. तसेच अन्य कामांसाठी मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर होतो त्यामुळे बांबूची शेती ही काळाची गरज आहे, आणि आता आपण जर पाहिलं तर इथेनॉल साठी देखील बांबू फार महत्वाचा आहे म्हणजे इथेनॉल ची निर्मिती बांबूपासून होते, हे लक्षात आल्यावर बांबूचे महत्त्व अधिक वाढलेला आहे. आणि ह्याच उद्देशाने राज्य सरकार किंवा केंद्र सरकार बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहे. आणि या बांबूच्या शेतीमधून शेतकऱ्यांना आर्थिक स्रोत निर्माण व्हावा शेतीमधून चांगल्या प्रमाणामध्ये त्यांना उत्पन्न मिळावं व शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे समृद्धीचे व्हावं, आणि याच्यासाठीच अनुदान स्वरूपात रक्कम ही राज्य शासन तसेच केंद्र शासन शेतकऱ्याला देत आहे. आणि यातून शेतकरी समृद्ध व्हावा, हाच मुख्य उद्देश या बांबू लागवड योजना मार्फत सरकारचा आहे.

मित्रांनो बांबू लागवड योजने संदर्भातील माहिती तसेच बांबू लागवड योजनेचे भविष्यातील फायदे तसेच बांबू लागवड योजनेबाबत मिळणारे शासनाचे अनुदान अशी सर्व प्रकारची माहिती आपण आज या मार्फत म्हणजे आमच्या संकेतस्थळा मार्फत पाहिली, तरी या योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा व या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ घ्यावा अशीच आमच्या संकेतस्थळामार्फत आपणास विनंती आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी, व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.