बांधकाम कामगार योजना|Construction Workers Scheme 2024

Construction Workers Scheme 2024

Construction Workers Scheme 2024 नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत बांधकाम कामगारांसाठी एक चांगल्या प्रकारची योजना राबवली जात आहे, या योजनेचे नाव आहे गृह उपयोगी वस्तुसंच योजना किंवा भांडी संच योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध वस्तू देण्यात येणार आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

Construction Workers Scheme 2024

बांधकाम कामगार योजना 2024, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व ऊर्जा कामगार विभाग या विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तूसंच वितरित करण्यासाठी या योजनेस महाराष्ट्र शासनामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते. आशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण, आरोग्य विषयक समस्या व भोजन याबाबत जुळून घ्यावे लागते. तसेच त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास साहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27 10 2020 रोजी च्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष नोंदणीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबत ठराव पारित करण्यात आलेला आहे.

आणि या सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदणी लाभार्थी बांधकाम (ज्यांची नोंदणी सक्रिय आहे) अशा कामगारांच्या गृह उपयोगी वस्तू व संच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचारधिन होती. आणि म्हणूनच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात अंतर्गत नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा योजनेत शासनाने मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. असे महाराष्ट्र शासनाने 2021 च्या काढलेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

गृहपयोगी वस्तुसंचामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे

बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गतील अटी व शर्ती आपण खाली पाहुयात.

 • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील
 • भांडी किट नोंदीत (सक्रिय जीवित बांधकाम कामगार) एका कुटुंबातील एका सदस्याला एक एकदाच देण्यात येतील
 • तसेच भांडी किट बांधकाम कामगारांच्या कुटुंबात एकदाच जनतेत असून कुटुंबांमध्ये पती किंवा पत्नी यामधील कोणी एक व 18 वर्षाखालील आपत्य यांचा समावेश राहील
 • महाराष्ट्र कामगार मंडळ यांच्या अटीनुसार कामगाराच्या कुटुंबांमध्ये भविष्यात भांडी किट एकापेक्षा अधिक लाभ मिळवला अशी माहिती आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कार्यवाही स्वतः कामगार व कुटुंबातील सदस्य पात्र राहतील याची दक्षता घ्यावी
 • तसेच भांड्याचे किट वाटप हे महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे निशुल्क असून यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही, जर कोणी व्यक्ती पैशाची मागणी करत असेल तर त्या व्यक्तीचा वाटप संस्थेसोबत संबंध नसून त्याची तक्रार व माहिती तुमच्या जवळच्या कामगार अधिकारी कार्यालय यांच्याकडे देण्यात यावी.
 • नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी याची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी) सरकारी कामगार अधिकारी( उपजिल्हा कार्यकारी अधिकारी) यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तुसंच पुरवण्यात येतील
 • जिल्हास्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त ( जिल्हा कार्यकारी अधिकारी) तसेच सरकारी कामगार अधिकारी म्हणजेच उपजिल्हा कार्यकारी अधिकारी हे या योजनेचे समन्वय(नोडल अधिकारी)राहतील.
 • गृहपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांचे छायाचित्र काढल्यानंतरच तसेच बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेतल्यानंतरच त्यांना वस्तू वितरित करण्यात येतील.
 • गृह उपयोगी वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबिर(camp) आयोजित करण्यात येतील.

बांधकाम कामगार योजना या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

 • अर्जदाराचे आधार कार्ड मूळ प्रत व ( प्रत्येकी तीन झेरॉक्स)
 • लेबर कार्ड पावती किंवा कार्ड मूळ प्रत व (प्रत्येकी तीन झेरॉक्स )
 • लाभार्थी स्वतः उपस्थित असणे गरजेचे आहे

बांधकाम कामगार योजना 2024 या योजनेसाठी लागणारी संपूर्ण माहिती म्हणजेच आवश्यक कागदपत्रे अटी व शर्ती तसेच योजना अंतर्गत मिळणाऱ्या वस्तू अशा संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आपल्या संकेतस्थळात मार्फत पाहिलेली आहे, अशा विविध योजनांची म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची माहिती आपण दररोज आपल्या संकेतस्थळामार्फत लोकांपर्यंत पोहोचवत असतो. राज्य शासन तथा केंद्र शासन विविध योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या असतील तसेच महिलांच्या हिताच्या असतील अशा सर्व योजना नेहमी अमलात आणत असते. आणि त्यातून या योजनांचा पात्र नागरिकांना तसेच पात्र लाभार्थ्यांना फायदा होणे हे देखील गरजेचे आहे. परंतु या योजनांची माहिती त्या लाभार्थ्यांपर्यंत तथा त्या व्यक्तींपर्यंत ही योग्य वेळी पोहोचत नाही. आणि यासाठीच आपण आपल्या संकेतस्थळा मार्फत दररोज माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध करत असतो, तरी आमच्या संकेतस्थळा मार्फत आपणास विनंती आहे की, आपण या सरकारमार्फत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ हा घेत जावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी तसेच आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.