हे सरकारी ७ कार्ड असतील तर मिळेल लाखोंचा फायदा

If these are government 7 cards, they will benefit lakhs of rupees.

If these are government 7 cards, they will benefit lakhs of rupees. राम राम मंडळी भारत सरकारचे तथा राज्य शासनाचे हे सात कार्ड आहेत जर हे कार्ड तुम्ही बनवून घेतली तर तुम्हाला लाखोंचा फायदा मिळतो तथा होऊ शकतो. तसेच सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही सर्व कार्ड तुम्हाला मोफत बनवता येतात, आणि हे सर्व कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रकारचा वेळ देखील लागत नाहीत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही सर्व कार्ड बनवू शकता. आणि एकदा तुम्ही हे सर्व कार्ड बनवले तर तुम्हाला सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा हा लगेच मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ही ७ कार्ड.

हे सरकारी ७ कार्ड असतील तर मिळेल लाखोंचा फायदा

आयुष्मान भारत कार्ड

मंडळी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड हे एकदा तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये दरवर्षी पाच लाख रुपयाचा उपचार अगदी मोफत पणे घेऊ शकता, यासाठी तुम्हाला कुठेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. हे कार्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बनवू शकता. ऑनलाइन तुम्ही एक कार्ड बनवू शकता आणि डाऊनलोड देखील करू शकता. एकदा तुमच्या नावाचे हे कार्ड बनवून झाल्यानंतर तुम्ही सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचार हा दरवर्षी मोफत घेऊ शकता. आणि त्यामुळे मंडळी हे आयुष्यमान भारत कार्ड हे सर्वसामान्य लोकांसाठी फार महत्वाचे कार्ड आहे. कारण तुम्हाला मंडळी अचानकपणे तुम्हाला जर तुमच्याकडे पैसे उपलब्ध नसतात तर तुम्ही या कार्डद्वारे हॉस्पिटलमध्ये सरकारी किंवा खाजगी असो, दोन्ही हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपये पर्यंतचा उपचार घेऊ शकता.

अभा कार्ड

अभा कार्ड हे कार्ड देखील सरकार मार्फत देण्यात येणारे एक महत्त्वपूर्ण कार्ड आहे. या कार्डमध्ये रुग्णाची संपूर्ण हिस्ट्री तथा माहिती असते, मग त्यामध्ये रुग्णाला कोणते आजार आहे, तथा कोणता प्रॉब्लेम आहे. त्यावरती तुम्ही कोण कोणते उपचार घेतलेले आहेत, तुम्ही कोणती औषधे सध्या कोणत्या आजारावरती घेतलेले आहेत, अशी तुमची आरोग्याची संपूर्ण माहिती या कार्डमध्ये उपलब्ध असते. तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा शासकीय किंवा निमशासकीय हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती हे कार्ड दाखवल्यावरती तुमच्या आजारावरची तथा तुमच्या शारीरिक व्याधींची संपूर्ण माहिती मिळते, व हॉस्पिटल त्यानुसार तुम्हाला उपचार देते, आणि मंडळी तुम्हाला हे कार्ड जर काढायचे असेल तर तुम्ही आधार नंबर वर गुगल वरती टाकून लगेच तुम्हाला दहा मिनिटांमध्ये हे कार्ड उपलब्ध होऊ शकते. आणि त्यामुळे मित्रांनो हे आभा कार्ड आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला कोणतीही फाईल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता पडत नाही, हे आभा कार्ड हे फाईल प्रमाणे काम करते. त्यामुळे फक्त हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुम्ही हे आभा कार्ड जर दाखवले तर तुमचे आजारावरचे सर्व प्रॉब्लेम त्यांना लगेच कळतात आणि ते उपचार देखील सुरू करतात.

ई- श्रम कार्ड

मंडळी ई-श्रम कार्ड हे कार्ड भारत सरकार द्वारा म्हणजे केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेले कार्ड आहे. हे कार्ड बनवल्यानंतर लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ईश्रम कार्ड धारकांना श्रमयोगी मानधनाचा लाभ हा मिळत असतो, या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन ही सुरू केली जाते. त्याच्यानंतर या कार्डधारकांना सरकारने अपघाती विमा दोन लाख रुपयांचा मोफत दिलेला आहे. ई श्रम कार्ड जर लाभार्थ्याकडे असेल तर आणीबाणीच्या काळामध्ये आर्थिक सहाय्य देखील दिले जाते. हे कार्ड तुम्ही ऑनलाईन पोर्टल द्वारे अगदी मोफत बनवू शकता. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्ही आपले सरकार केंद्र आहेत,तिथे जाऊन देखील बनवू शकता किंवा मोबाईल द्वारे देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्यामुळे हे कार्ड देखील अतिशय महत्वपूर्ण असे भारत सरकार द्वारा निर्मित महत्वाचे कार्ड आहे.

जॉब कार्ड

जॉब कार्ड हे एक असे कार्ड आहे हे जर आपण बनवले असेल तर आपल्याला शासनाच्या 100% अनुदानाच्या योजनांचा लाभ घेता येतो या कार्डवर आपण शासनाच्या अनेक अशा योजना आहेत ज्यांचा लाभ घेऊ शकतो. आणि ते सुद्धा अगदी 100% अनुदानावर, जसे की एक लाख वीस हजाराचे घरकुल योजनेचा लाभ असेल विहिरीसाठी चार लाखांचे अर्थसहाय्य असेल तसेच 12 हजाराचे शौचालय योजनेचा लाभ असेल, शेततळे असतील, शेळी पालन असेल, गाय म्हैस अनुदान योजनेचा लाभ असेल विहीर सिंचन योजना असेल साग लागवड असेल फळबाग लागवड असेल शेवगा लागवड असेल अशा अनेक योजनांचा लाभ आपण जॉब कार्ड वर घेऊ शकतो. आणि या सर्व योजना मनरेगा योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर राबविल्या जातात. फक्त या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असायला पाहिजे मग तुम्ही या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकतात.हे कार्ड तुम्हाला बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागेल.

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड तयार केल्यानंतर शेतकरी जामीनाशिवाय म्हणजे कुठल्याही हमी शिवाय 1.60 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकतात. त्याचवेळी तीन लाख रुपयांच्या कर्जावर सात टक्के व्याज आकारले जाते,हे कर्ज वेळेवर परत केल्यास तुम्हाला तीन टक्क्यांपर्यंत सूट मिळते त्यामुळे तुम्हाला केवळ चार टक्के व्याज द्यावे लागेल. हे कर्ज शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामासाठी वापरू शकतात. या कार्डसाठी तुम्ही सीएससी सेंटर वर जाऊन फॉर्म भरू शकतात. त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड हे कार्ड शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्ड आहे.

पॅन कार्ड

मंडळी भारत सरकारच्या आयकर विभागामार्फत तयार केले जाणारे हे अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्ड आहे. कोणत्याही आयकर विभागाच्या कामासाठी आपल्याला पॅन कार्ड हे अतिशय आवश्यक असते. आणि आता बँकेमध्ये सुद्धा पॅन कार्ड अतिशय महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेत खाते खोलने असेल डिमॅट अकाउंट उघडणे असेल किंवा आयकर विभागाचे कोणतेही काम असेल यासाठी आपल्याला पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. पॅन कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असते, आणि आधार कार्ड च्या साह्याने तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता. आणि अशा प्रकारे पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे असे कार्ड आहे. आणि ते प्रत्येक व्यक्तीकडे असणे देखील आवश्यक आहे.

आधार कार्ड

मंडळी आधार कार्ड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती आहे. कारण आधार कार्ड चा उपयोग आता सर्व ठिकाणी केला जात आहे. बँकेत खाते खोलण्यापासून किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यापर्यंत आधार कार्ड हे फार महत्त्वाचे कागदपत्र आहे. आणि मंडळी आधार कार्ड चे अनेक फायदे आहेत, आणि अजून पर्यंत जर कोणी आधार कार्ड बनवलेल नसेल तर जवळच्या आधार सेंटर वरती जाऊन तुम्ही हे आधार कार्ड बनवू शकता.

आणि मंडळी अशाप्रकारे हे भारत सरकारचे तथा महाराष्ट्र शासनाचे हे सात महत्वपूर्ण कार्ड आहेत, आणि हे कार्ड जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही राज्य शासनाचा असेल केंद्र शासनाच्या असेल अशा भरपूर योजनांचा जो मिळनारा लाखोंचा फायदा आहे तो तुम्हाला मिळू शकतो. आणि तुम्हाला शासनामार्फत मिळणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ हा अगदी सहजपणे किंवा सहजरीत्या घेऊ शकता.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना तथा वडीलधाऱ्यांना व आपल्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करावी.व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.