मुख्यमंत्री वयोश्री योजना|Mukhyamantri Vayoshree Yojana 2024

Mukhyamantri Vayoshree Yojana 2024

Mukhyamantri Vayoshree Yojana राम राम मंडळी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत जेष्ठ नागरिकांसाठी महत्व पूर्ण अशी मुख्यमंत्री वयोश्री योजना आमलात आणली आहे,चला तर मग जाणून घेऊयात या बाबतीतील संपूर्ण माहिती..

Mukhyamantri Vayoshree Yojana 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024, मंडळी काल म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली, आणि मंडळी या बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि मंडळी या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये इतकी रक्कम या अंतर्गत पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहेत. मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे, आणि त्यासाठीच मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभ देण्यात येणार आहे.

मित्रांनो राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने उपकरणे खरेदी करणे करता तसेच मनस्वस्थ केंद्र,योगो उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

मंडळी एकंदरीत आपण जर पाहिले तर केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम वयोश्री योजना राबवली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील 65 वर्षावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना लागणारी जी सुविधांची साधने आहेत मग त्यामध्ये व्हीलचेयर असेल, हातातील छडी असेल, कानातील हेरिंग असतील अशा प्रकारच्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वस्तू असतील त्या दिल्या जाऊ शकतात, अशा वस्तूंसाठी त्यांची शिबिरे लावून त्यांची तपासणी करणे ज्येष्ठ नागरिकांना गरज असेल त्यांना ही साधने देणे, म्हणून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी काल म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी अधिकृत असा जीआर निर्गमित केलेला आहे.

शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे कि सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाज येथे एकूण दहा ते बारा टक्के जेष्ठ नागरिक 1.25 ते 1.50 कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो, सदर बाबी विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील संबंधित दिव्यांग / दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री सुरू केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्रयोग उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात शासन विचारधीन होती.

राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत मिळणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मन स्वास्थ्य केंद्र वयोगो उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वस्त आबादीत ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमे 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (DBT) प्रणाली द्वारे लाभ प्रदान करणे. हे या योजनेचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार खालील उपकरणे खरेदी करता येतील.

 • चष्मा
 • श्रवण यंत्र
 • ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
 • फोल्डिंग वॉकर
 • कमोड खुर्ची
 • निब्रेस
 • लंबर बेल्ट
 • सर्वाइकल कॉलर इत्यादी.
 • तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाने नोंदणी करण्यात आलेल्या योगउपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष खालील प्रमाणे

 • सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरिक ( ज्या नागरिकांनी दिनांक 31 12 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील) तसेच ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेल्या असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे तसेच जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारली जातील.
 • लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हाप्रधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
 • उत्पन्न मर्यादा- लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
 • सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रम सहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे,तसेच याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
 • पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याची देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्र सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टल वरती 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
 • निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

 • अर्जदाराचे आधार कार्ड/ मतदान कार्ड
 • राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
 • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
 • स्वयंघोषणापत्र
 • शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे, त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के म्हणजे दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि यामध्ये पात्र लाभार्थ्यांना रुपये तीन हजार रुपये प्रति वर्ष एक रिकामी अदा करणे अपेक्षित आहे त्यानुसार थेट लाभ वितरण डीबीटी करिता म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना राबविण्यासाठी अंदाजे रक्कम रुपये 450 कोटी इतका कमाल अंदाजीत खर्च असेल.

तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या एक वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत केले जाईल तसेच अर्जाची प्रक्रिया, छाननी, वितरण पद्धती इत्यादी औपचारिकता अंमलबजावणी एजन्सी द्वारे निश्चित केल्या जातील. तसेच शिबीर आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. व संसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी देखील करण्यात येईल.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करावी, व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.