Shabri Housing Scheme 2024
Shabri Housing Scheme 2024 राम राम मंडळी आज आपण पहाणार आहोत,शबरी घरकुल योजनेत राज्यशासना मार्फत मिळणारे जे अनुदान आहे, त्या अनुदानात राज्यशासनाने वाढ केलेली आहे. चला तर मग पाहूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती..
घरकुल अनुदान योजनेत वाढ
शबरी घरकुल अनुदान योजना, मंडळी राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल अनुदान योजनेमध्ये नवीन शासन निर्णय घेऊन मोठी वाढ करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख रुपयांची वाढ घरकुल अनुदान योजनेमध्ये करण्यात आली आहे. राज्य शासन विविध फायद्याच्या योजना ह्या अनुसूचित जाती जमाती तथा आर्थिक दुर्लभ घटकातील लोकांसाठी कायम अमलात असते. मंडळी आदिवासी विकास विभाग अंतर्गत 11 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
या राज्य शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, आदिवासी उपयोजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाही अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात झोपड्यामध्ये किंवा तात्पुरते तयार केलेल्या निवारात राहतात अश्या अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना या देण्यात आलेले आहेत, हा जो शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांमध्ये राबवणे अपेक्षित आहे. ग्रामीण विकास विभागाच्या दिनांक 10/2/2016 चे शासन निर्णयांमध्ये राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष इंद्रा आवास योजने कक्षाचे रूपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष तसेच ग्रामीण गृह निर्माण कक्षामध्ये करण्यात आलेले आहे. आणि त्याच अनुषंगाने राज्यव्यवस्थापन कक्षा द्वारे ग्रामविकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमाचे अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे.
आणि त्याच अनुषंगाने या राज्य व्यवस्थापन कक्षा द्वारे ग्रामविकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येणारे सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी या कक्षा द्वारे करण्यात येत आहे, परंतु शहरी भागामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अंमलबजावणी करण्यासाठी अंबलबजावणी यंत्रणा नसल्यामुळे शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची संबंधित महानगरपालिका/ नगरपालिका/नगरपंचायत यांच्या मार्फत करण्यासाठी नगर विकास विभागास आदिवासी विकास विभागा द्वारा प्रस्ताव देखील देण्यात आलेला आहे. असे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
तसेच शासन निर्णयामध्ये असे देखील सांगण्यात आलेले आहे की राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कूडा मातीच्या घरात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरता तयार केल्याने घरात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ हा प्रामुख्याने देण्यात येणार आहे.
शबरी घरकुल अनुदान योजना 2024 संदर्भातील लाभार्थी पात्रता खालील प्रमाणे
- लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा
- लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्षापासून रहिवासी असावा
- लाभार्थ्याकडे घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी
- लाभार्थ्याने यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा
- तसेच लाभार्थ्याचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे
- लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावाने बँकेमध्ये खाते असावे.
शबरी घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधकाम क्षेत्र किती असावे
आदिवासी विभागाच्या दिनांक 28/ 3/ 2013 रोजीच्या शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, घरकुलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे 269.00 चौरस फूट इतके राहील.
लाभार्थ्याची उत्पादन मर्यादा
शबरी घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्याची उत्पादन मर्यादा ही वार्षिक तीन लक्ष रुपये पर्यंत असावी.
शबरी घरकुल योजनेमध्ये अनुदान रक्कम किती दिली जाते?
शबरी घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही दोन लाख 50 हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे, सदर अनुदान रक्कम खालील प्रमाणे चार टप्प्यांमध्ये लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
- अनुदान मंजुरीचे टप्पे
- 1) घरकुल मंजुरी -40000 रुपये
- 2) प्लिंथ लेवल -80000
- 3) लिटल लेवल-80000
- 4) घरकुल पूर्ण-50000
- एकूण -250000
शबरी घरकुल योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
- शिधापत्रिका( राशन कार्ड)
- अर्जदाराचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
- एक रद्द केलेला धनादेश (cancelled check ) अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ज्याच्यामध्ये खाते क्रमांक असेल ती प्रत
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा)
- घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी असलेला पुरावा
शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत कशाप्रकारे आहे ते आपण खाली पाहुयात
या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व कागदपत्रे ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशः टपालाद्वारे किंवा ई-मेल द्वारे सादर करावी.
अधिकृत प्रधान्य
- विधवा किंवा परित्यकत्त्या महिला
- जातीय दंगलींमध्ये घराचे नुकसान झालेले व्यक्ती
- आदिम जमातीची व्यक्ती
- ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्ती
- तसेच आदिवासी विकास विभागाच्या सत्रातील 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्ती साठी ठेवण्यात आलेली आहे, आणि यामध्ये दिव्यांग महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
अशाप्रकारे शबरी घरकुल अनुदान योजनेमध्ये दोन लाख 50 हजार रुपयांची वाढ ही राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर करून करण्यात आलेली आहे. तरी यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.