Good news for ration card holders..
Good news for ration card holders महाराष्ट्र राज्य शासनाने रेशनकार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे,राज्य शासन येणाऱ्या मोठ्या सणांचे औचित्य साधून राज्यातील नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करणार आहे,चला तर मग पाहून घेऊयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.
आता आनंदाचा शिधा मिळणार या सणाला
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर मंडळी राज्य शासन विविध योजना राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी व त्यांच्या हितासाठी अमलात आणत असते. आणि त्यामध्येच राज्य शासनाने सर्वसामान्याचे सणवार गोड व्हावे यासाठी आनंदाचा शिधा वाटप हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. याच्या माध्यमातून राज्यातील रेशन कार्डधारकांना शिधावाटप केली जाते. पात्र रेशन कार्डधारक यांना शंभर रुपये इतके देऊन आनंदाचा शिधा मध्ये सहा वस्तूची वाटप केली जाते. पूर्वी याच्यामध्ये पाच वस्तू देण्यात येत होत्या परंतु आता यामध्ये सहा वस्तू देण्यात येतात.
मंडळी आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना शिदेचे तथा आनंदाचे शिधाचे वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा झालेला आहे. मंडळी अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. प्रभू श्रीराम म्हटलं हिंदू लोकांचे आराध्य दैवत राज्यामध्ये त्याचा देशांमध्ये खूप आनंदाचे वातावरण यानिमित्त आहे, तसेच अखंड हिंदुस्तानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील जयंती 19 फेब्रुवारीला येत आहे प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज या खंड हिंदुस्तान चे आराध्य दैवत असल्यामुळे त्याचे अवचित्त साधून राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.
राज्य शासनाने हा निर्णय काल 10 जानेवारी 2024 रोजी घेतलेला आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाचे मान्यता मिळालेले आहे.
या आनंदाच्या शिधांमध्ये नेहमी पाच वस्तू देण्यात येतो त्या परंतु आता यामध्ये सहा वस्तू देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे, मध्ये तुम्हाला साखर, खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. मंडळी हा आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.
मंडळी याच्यामध्ये राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील तसेच केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे असा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. तसेच मित्रांनो हा आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी राज्य शासनाने सुमारे 549.86 कोटी रुपये अंदाजे खर्चाचा मंत्रिमंडळात मंजूरी देखील देण्यात आलेली आहे. तसेच मंडळी हा आनंदाचा सिद्धांत नेहमीप्रमाणे प्रति संच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येईल.
या शिधा जिन्नस संचामध्ये साखर एक किलो खाद्यतेल एक लिटर चणाडाळ अर्धा किलो तसेच रवा मैद्या आणि पोहे प्रत्येकी अर्धा अर्धा किलो असा देण्यात येईल. यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना तसेच आर्थिक दुर्लभ घटकातील नागरिकांना याचा थोडा का होईना फायदा होईल.
राज्य शासनाने 2022 पासून हा उपक्रम चालू केलेला आहे सन 2023 मध्ये आनंदाचा शिधा हा स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाच्या शिद्याची वाटप करण्यात आलेली होती. तसेच त्यानंतर गणेश चतुर्थीचे औचित्य साधून आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात आलेले होते. या दोन्ही सणावेळी शिधा जिन्नस संचामध्ये फक्त चार वस्तू देण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये साखर चणाडाळ रवा प्रत्येकी एक किलो आणि खाद्यतेल प्रत्येकी एक किलो असे देण्यात आलेले होते. तसेच त्यानंतर राज्य शासनाने दीपावली या सणानिमित्त आनंदाचे शिदाचे वितरण केले होते. यावेळी शिधा जिन्नस संचामध्ये सहा वस्तूंचे वाटप करण्यात आलेले होते. यामध्ये शिधा जिन्नस संचामध्ये नेहमीच्या वस्तूंपेक्षा दोन वस्तू अधिक देण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये मैदा व पोहे या जिन्नसांची वाढ करण्यात आलेली आहे.
आता आनंदाचा शिधा वर्षभर मिळणार?
मंडळी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की आता आनंदाचा शिधा वर्षभर मिळणार? मंडळी राज्य शासनाने राज्यातील सणांमध्ये आनंदाचा शिधा देऊन नागरिकांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केलेले आहे. परंतु आता महाराष्ट्र शासनाने तथा अन्न व नागरी पुरवठा विभागाने आता आनंदाचे शिधाचे वितरण वर्षभर सुरू ठेवण्याचे विचारांमध्ये आहे. आणि लवकर त्याला मान्यता देखील मिळेल. वर्षभर जर आनंदाचा शिधा मिळणार या बातमीमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण या उपक्रमाचा फायदा राज्यातील एक कोटी 58 लाख सर्वसामान्य तथा गरीब व दुर्लभ समाजातील नागरिकांना होणार आहे.
मित्रांनो लोकसभेचे इलेक्शन आता जवळ आलेले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये कधीही लोकसभेचे इलेक्शन ची आचारसंहिता लागू शकते, आणि त्यानंतर राज्यातील देखील निवडणुका सप्टेंबर महिन्यामध्ये लागू शकतात, म्हणून त्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या आणि शेतकऱ्यांच्या तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना अमलात आणत आहे.
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.