महिला सन्मान बचत पत्र योजना 2024

Mahila Samman Sach Patra Yojana 2024

Mahila Samman Sach Patra Yojana 2024 केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी हि योजना आहे,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात हि योजना आमलात आणली आहे.जाणून घेऊयात या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती..

महिला सन्मान बचत पत्र

महिला सन्मान बचत पत्र योजना 2024 ही योजना केंद्र शासनाने देशातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अमलात आणलेली आहे. केंद्र शासन आशा योजना म्हणजेच महिलांच्या फायद्याची योजना नेहमी अमलात आणत असते. त्यामधीलच ही फार महत्वपूर्ण योजना आहे. देशातील ज्या सर्वसामान्य महिला रोज काम करून ज्या पैशातून बचत करतात त्या केलेल्या बचतीला योग्य असा व्याज परतावा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना एक फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय बजेटच्या वेळी जाहीर केलेली होती.

या योजनेमध्ये महिला या गुंतवणूक करू शकतात तसेच या योजनेला 18 वर्षावरील महिला या योजनेसाठी पात्र आहे परंतु जर एखाद्या आई-वडिलांनी जर आपल्या लहान मुलीचे नावाने जरी गुंतवणूक केली तरी या योजनेचे पात्र ठरू शकतील. तसेच या योजनेमध्ये आपण कमीत कमी एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतो.

तसेच मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचा कालावधी किती आहे यावरती आपण थोडी माहिती घेऊयात.

चला तर मग आपण एक उदाहरण घेऊया, समजा एखादी महिला आहे आणि या महिलेने समजा आज या योजनेमध्ये पैसे गुंतवले, आणि समजा तिला वाटलं आता सहा महिने झाले पैसे गुंतून आणि चल आता परत पैसे बाहेर काढू यात. परंतु ते पैसे बाहेर निघणार नाहीत कारण त्याला दोन वर्षाचा लॉकिंग पिरेड आहे. परंतु याला काही देखील अपवाद आहेत ते आपण जाणून घेऊयात- समजा गुंतवणूक केलेल्या महिलेचे नावाने जर पैसे गुंतवले असेल परंतु त्या महिलेचे जर निधन झालं तर नॉमिनी त्या महिलेच्या खात्यातील पैसे काढू शकतात तसेच जर महिलेला एखादा जीव घेणे आजार झाला असेल तरी देखील ते पैसे ती महिला काढू शकते. तसेच तिसरी एक अट अशी आहे की जर रक्कम गुंतवणूक केल्यापासून जर एक वर्ष पूर्ण झाले असेल आणि त्या एक वर्षाचे पूर्ण झालेल्या रकमेच्या 40% रक्कम तुम्ही काढू शकता.

या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास व्याज किती मिळणार?

या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास व्याज परतावा 7.71% इतका मिळतो, दर तीन महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक केलेल्या मुद्दल वरती व्याज किती हे कॅल्क्युलेशन केले जाईल आणि ते व्याज तुमच्या मूळ मुद्दल मध्ये जोडले जातं, आणि जी नवीन मुद्दल आहे त्याच्यावरती परत व्याज दिले जाते. समजा तुम्ही एक लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा व्याज परतावा कसा मिळतो हे आपण खाली पाहुयात.

 • मूळ गुंतवणूक -1,00,000.00
 • पहिल्या तिमाई नंतर-1,875.00
 • नवीन मुद्दल-1,01,875.00
 • सहा महिन्यानंतर-1,910.16
 • नवीन मुद्दल-1,03,785.16
 • नऊ महिन्यानंतर-1,945.97
 • नवीन मुद्दल-1,05731.13
 • एक वर्षानंतर-1,982.46
 • नवीन मुद्दल-1,07,713.59
 • एक वर्षात तीन महिन्यानंतर-2,019.63
 • नवीन मुद्दल-1,09,733.22
 • एक वर्ष सहा महिन्यानंतर-2,057.50
 • नवीन मुद्दल-1,11,790.71
 • एक वर्ष नऊ महिन्यानंतर-2,096.08
 • नवीन मुद्दल-1,13,886.79
 • दोन वर्ष पूर्ण झाल्यावर-2,135.38
 • नवीन मुद्दल-1,16,022.17 रुपये लाभार्थ्याला मिळणार.

या योजनेमध्ये पैशाची गुंतवणूक कशा प्रकारे करायची?

 • पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून या योजनेमध्ये आपण पैसे गुंतवू शकतो.
 • तसेच सरकारी बँकांच्या माध्यमातून आपण या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतो त्यामध्ये एसबीआय बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल, या बँकांच्या मार्फत आपण या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करू शकतो.
 • प्रायव्हेट सेक्टर बँकेचे मार्फत देखील आपण या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करू शकतो त्यामध्ये एचडीएफसी आयसीआयसी तसेच ॲक्सिस बँक आणि आयडीबीआय बँक या बँकेच्या मार्फत आपण या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करू शकतो. 27 जून 2023 ला या प्रायव्हेट सेक्टर बँकला परवानगी मिळालेली आहे.

या योजनेमार्फत देशातील सर्व महिला दोन लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. म्हणजे एकदम हे दोन लाख रुपयांची गुंतवणूक जर शक्य नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे तीन महिन्याच्या अंतरावरती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता, म्हणजे तुम्ही आज जर एक लाख रुपये गुंतवणूक केली आणि उद्या जर तुम्हाला लगेच दहा हजार रुपये गुंतवणूक करायचे असेल तर असं चालणार नाही. परंतु तुम्ही जर आज समजा गुंतवणूक केली तर आजच्या तारखेपासून तीन महिन्याच्या अंतरावरती तुम्ही पुन्हा गुंतवणूक करू शकता. म्हणजे दोन गुंतवणूक मध्ये कमीत कमी तीन महिन्याचा अंतर असायला हवे.

मिळालेल्या व्याजावर टॅक्स आकारला जाईल की नाही?

 • जर तुम्ही 30% स्लॅब मध्ये असल्याबद्दल असेल तर तुम्हाला जे काही महिला सन्मान बचत पत्राच्या योजनेमधून व्याज मिळेल त्याच्यावर तुम्हाला 30 टक्के टॅक्स भरावा लागेल.
 • तुम्ही दहा टक्क्यांच्या चौकटीमध्ये असेल तर तुम्हाला दहा टक्के भरावा लागेल.
 • तसेच जर तुम्ही टॅक्सेबल जर नसेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.
 • तसेच टीडीएस हा कट होणार नाही.
महिला सन्मान बचत पत्र योजना ह्या योजनेचे फायदे काय?

ही योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार आहे त्यामुळे या योजनेची सुरक्षितता चांगली आहे, जे पैसे या योजनेमध्ये जर एखाद्या लाभार्थ्याने गुंतवणूक केले तर त्याचा परतावा हा 100% मिळणार याची गॅरंटी आहे.

तसेच या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये केलेल्या एफ डी पेक्षा यामध्ये जास्त परतावा आहे, त्यामुळे ही योजना नक्कीच फायद्याची आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे ही महिला सन्मान बचत पत्र योजना केंद्र शासनाने एक फेब्रुवारी 2023 पासून अमलात आणलेली आहे. आणि ही योजना नक्कीच सर्वसामान्य महिलांच्या फायद्याची आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.