PM आवास योजना 2024

PM Awas Yojana 2024

PM Awas Yojana 2024 राम राम मंडळी पंतप्रधान आवास योजना हि योजना भारत सरकार म्हणजे केंद्र शासनाच्या मार्फत राबवली जाणाऱ्या प्रमुख योजनांपैकी हि एक योजना आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशातील पात्र नागरिकांना जो लाभ दिला जातो, त्या बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पहाणार आहोत.

PM Awas Yojana 2024

PM आवास योजना 2024, मंडळी केंद्र शासनाच्या मार्फत देशातील सर्वसामान्य नागरिक तसेच आर्थिक दुर्लभ घटकातील नागरिक यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आर्थिक लाभाच्या योजना या अमलात आणल्या जातात. आणि त्याच प्रयत्नातून केंद्र शासनाच्या मार्फत राबवली जाणारी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना प्रामुख्याने देशभरात मोठ्या प्रमाणावर ती राबवली जात आहे. तथा या योजनेचा लाभ भरपूर लाभार्थ्यांना देशभर मिळत आहे.

मंडळी तुम्हाला माहित आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना सर्वसामान्य नागरिकांना घर उपलब्ध करून देणे योजना आहे, ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांची प्रतीक्षा यादीही तयार केली जाते, 2018 ते 19 या व आर्थिक वर्षांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा ड यादीचा सर्वे करण्यात आलेला होता, याद्यातून जे लाभार्थी हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तथा वगळण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आता मोदी सरकारने देखील नवीन योजना राबवण्यात आलेली आहे, मोदी आवास योजना ही योजना राबविण्यात आलेली आहे.

मित्रांनो पंतप्रधान आवास योजना 2024 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या योजनेतून 2.95 कोटी इतकी पक्की घर देण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाच्या मार्फत ठेवण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना तसेच देशातील सर्व आर्थिक घटकांना मागास असणाऱ्या नागरिकांना या योजनेतून हक्काचे घर मिळावं हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मंडळी पंतप्रधान आवास योजना ही योजना तुम्हाला घर देत नाही तर ही योजना जर तुम्ही एखादे घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता किंवा तुम्ही घर दुरुस्ती करण्यासाठी जेव्हा बँकेकडून कर्ज घेता त्या कर्जावरती तुम्हाला अनुदान दिलं जातं. आणि ते अनुदान तुमच्या कॅटेगरीवर तथा तुमच्या उत्पन्नावर ठरतं. या उत्पन्न तथा या कॅटेगिरी वरती निर्माण होतात पहिला म्हणजे EWS MIG व LIG या तीन गटांद्वारे तुम्हाला अनुदान म्हणजे दोन लाख 67 हजार पर्यंत पैसे दिले जातात.

पंतप्रधान आवास योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अटी काय आहेत ते आपण खाली पाहुयात.

  • सर्वप्रथम ज्या कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्या नावे पहिले कोणतेही घर नसले पाहिजे
  • तसेच या योजनेचा जो लाभार्थी लाभ घेणार आहे त्याचे वय 21 ते 55 वर्षे इतके असावे तेव्हा तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो
  • तसेच याच्या आधी दुसरीकडे जर आपण आधीच सबसिडी घेत असाल तर तुम्हाला इतर गृह कर्जात अनुदान मिळणार नाही
  • आणि जर आपण विवाहित जोडपे असाल तर आपण संयुक्त गृह कर्जावर देखील अनुदान घेऊ शकता
  • आणि जर अर्ज करताना जर एखाद्या महिलेच्या नावाने जर अर्ज केला तर त्या महिला लाभार्थीला अधिकची सवलती दिली जाणार आहे. ( जर महिलांनी एलआयजी व एम आय जी या गटांमध्ये जर अर्ज केला तर तुम्हाला पूर्ण लाभ हा दोन लाख 67 हजार रुपये इतका मिळणार आहे)
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आवश्यक असणारे कागदपत्रे आपण पाहूयात
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • तसेच पत्त्याचे स्वरूप म्हणून आपल्याकडे मतदार ओळखपत्र किंवा आपला पत्ता असल्याचा कोणताही पुरावा असावा
  • सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
  • आपण ज्या मालमत्तेवरती कर्ज घेत आहोत त्या मालमत्तेवर विक्री करार नोंदणी प्रमाणपत्र यांसारखे कागदपत्रे असली पाहिजेत.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला अर्ज कशा प्रकारे करावा लागेल या संदर्भात आपण पाहुयात

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, लाभार्थ्याला pmay.gov. in या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल.

तर तसेच वरील वेबसाईट ग्रामीण भागातील लोक हे अर्ज करू शकत नाहीत ग्रामीण भागातील लोकांना अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो, तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल म्हणजे तुम्हाला ऑफलाईन फॉर्म ग्रामपंचायत मध्ये भरावा लागतो, त्यासाठी अनेक योजना ग्रामपंचायतीमध्ये राबवल्या जातात आणि त्या योजनेसाठी तुम्हाला एक लाख 50 हजार अनुदान हे इथं प्रधानमंत्री आवास योजनेतर्फे दिले जाते ज्याला आपण घरकुल योजना असे म्हणतो तर तुम्ही ते तिथे जाऊन अर्ज करू शकता.

एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंब प्रमुखाच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने फक्त त्याच व्यक्तीला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ हा दिला जात होता,परंतु कुटुंबातील अन्य व्यक्ती योजनेसाठी पात्र असून देखील त्यांना घरकुल योजनेचा लाभ हा दिला जात नव्हता. त्यामुळे आता या योजनेत सुधारणा करून राज्य शासनाने नवीन जीआर काढलेला आहे त्या जीआर नुसार जर एका कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर घरकुल योजनेसाठी ते सर्व पात्र असतील तर त्या सर्व व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे अशा प्रकारे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता घर ऐवजी 1 लाख 65 हजार रुपये मिळणार परंतु त्यासाठी पात्र आहेत हे लाभार्थी

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्या बाधित गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अशा प्रकरणीचे प्रकल्पाग्रस्त आर्थिक पॅकेज देतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामध्ये उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला परत करण्यात येईल, म्हणजे ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला आहे असा परत करण्यात येईल.

तसेच मित्रांनो पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहन खेड व मौजे पर्वतापुर तालुका /जिल्हा अमरावती या गावातील तसेच कोथेरी लघुपाटबंधारे योजना तालुका महाड जिल्हा रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी ही देण्यात आलेली आहे.

तसेच या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिघना करणे निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या सर्व बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना 2024 या योजनेसाठी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, तसेच या योजनेचा लाभ देशातील सर्व पात्र नागरिकांनी घ्यावा ही या संकेतस्थळाद्वारे विनंती आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी तसेच आमच्या yojanjankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.