PM मातृवंदना योजना 2.0 राज्यात लागू झाली..

PM Matru Vandana Yojana 2.0 implemented in the state..

PM Matru Vandana Yojana 2.0 implemented in the state.. राम राम मंडळी आज आपण पहाणार आहोत केंद्र शासनाच्या मार्फत सुरु असलेली पंतप्रधान मातृवंदना योजना 2.0 आता महाराष्ट्र राज्यात देखील लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बाबतीतील अटी शर्ती तसेच लाभार्थी पात्रतेबद्दलची संपूर्ण माहिती..

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

मंडळी आता महाराष्ट्र राज्यामध्ये देखील प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्याच्या निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे. मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. मंडळी केंद्र शासन हे नेहमी सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करत असते, त्यातीलच महिलांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाच्या योजना अमलात आणण्याचा केंद्र शासनाचा कायम हेतू असतो, या उद्देशानेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना केंद्र शासनात मार्फत चालवण्यात येत होती आता ती राज्य शासन देखील चालू करणार आहे तसा शासन निर्णय 29 डिसेंबर 2023 रोजी झालेला आहे.

मंडळी देशातील तसेच राज्यातील दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाचे शेवटच्या टप्प्यांपर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते, त्यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्या साठी तसेच या महिलांना पोषक आहार मिळावा त्यांना या गरोदरपणाच्या कालावधीमध्ये मंजुरी करावी लागू नये याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात देखील विभागामार्फत करण्यात येणार आहे. आणि मंडळी यांच्यामध्येच मिशन शक्तीच्या काही सूचनानुसार किंवा मार्गदर्शनानुसार काही बदल करण्यात आले आहेत. आणि आता हेच नवीन बदल राज्य शासनाच्या माध्यमातून देखील राज्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

याच्यामध्ये जे लाभ दिले जाणार आहेत ते प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 च्या अंतर्गत पहिल्या आपत्यासाठी पाच हजार रुपये इतकी रक्कम दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे, याच्यामध्ये पहिला हप्ता 3000 रुपये देण्यात येणार आहे, तर बाळाची जन्म नोंदणी, तसेच बालकास बीसीजी ओपीव्ही झिरो ओपीव्ही 3 मात्रा, पेंटाव्हॅलेंट तीन मात्रा लसीच्या झाल्यानंतर दुसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. निर्णय घेण्यात आलेला आहे, तसेच दुसरे आपत्य मुलगी झाल्यास मुलीचे जन्म नंतर एकाच टप्प्यात 6000 रुपये चा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात डी बी टी पोर्टलद्वारे दोन्ही मिळून रक्कम 11 हजार रुपये इतकी जमा केली जाईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे( किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याचे प्रत जोडणे देखील आवश्यक आहे)

लाभार्थी पात्रता

 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला
 • ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपये पेक्षा कमी आहे त्या महिला
 • बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला
 • 40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या (दिव्यांग जन)महिला
 • आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) अंतर्गत महिला लाभार्थी
 • ई-श्रम कार्डधारक महिला
 • किसान सन्माननिधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
 • मनरेगा जॉब कार्डधारक महिला
 • गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/ अंगणवाडी मदतनीस (AWHs)/ आशा कार्यकर्ती (ASHAs.)
 • अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशन कार्डधारक महिला लाभार्थी

आणि वरीलपैकी कोणत्याही एकाच कागदपत्राची प्रत जोडणे देखील आवश्यक आहे.

खालील कागदपत्रे देखील असणे तथा तपशील असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
 • लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी(EID) कागदपत्र त्यासोबत विहित केलेली कागदपत्र.
 • परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, प्रसुती पूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
 • लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत
 • बाळाच्या जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
 • माता आणि बालसंरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत
 • गरोदरपणाची नोंदणी केलेला RCHपोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक
 • लाभार्थ्यांचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक
 • वेळोवेळी विहित केलेले किंवा मागितली गेलेली अन्य कागदपत्र या योजनेच्या अंतर्गत वरील सर्व कागदपत्र लाभार्थ्याला द्यावी लागणार आहेत.

जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रांसोबत आधार नोंदणी (EID) कागदपत्रासोबत खालीलपैकी कोणत्याहि एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक राहील.

 • बँक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुक
 • मतदान ओळखपत्र
 • रेशन कार्ड
 • किसान फोटो पासबुक
 • पासपोर्ट
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पॅन कार्ड
 • MGNREGS जॉब कार्ड
 • सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेले तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र
 • राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने जारी केलेले इतर कोणतेही फोटो ओळखपत्र
 • अधिकृत लेटरहेडवर राज्यपत्रित अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या छायाचित्रासह ओळखीचे प्रमाणपत्र
 • प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC) किंवा सरकारी रुग्णालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य कार्ड.

याप्रमाणे लाभ देण्याची कार्य मर्यादा देखील राज्य शासनामार्फत तथा केंद्र शासनामार्फत या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये पहिला अपत्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून पूर्वी असलेला 730 दिवसांचा कालावधी कमी करून तो आता 570 दिवसांवरती आणण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या आपत्य हे मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून 270 दिवसापर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे हा अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याने जर हस्तलिखित फॉर्म जमा केलेला असेल, परंतु प्रधानमंत्री मातृ योजनेच्या अंतर्गत च्या नवीन संगणक प्रणाली वरती कोणत्याही कारणामुळे ऑनलाइन पद्धतीने जर अर्ज केलेला नसेल तर या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तथा मिळणार नाही, त्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.

तसेच जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या जिवंत आपत्तीच्या जन्माचे वेळी एकापेक्षा जास्त अपत्य झाली व त्यामध्ये एक किंवा अधिक मुलगी असतील (जुळे तिळे चार) तर अपत्य मुलगी असल्याचा लाभ मिळेल. तसेच लाभार्थीने विहित कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्यक आहे.

तसेच लाभार्थींना महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या(http://wcd.nic.in) या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करणे आणि सिटीजन लॉगिन मधून ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थीने हा फॉर्म परिपूर्ण भरून लाभार्थ्याने स्वाक्षरी केलेल्या हमीपत्र सह व सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करावा.

तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत चालला पात्र लाभार्थी महिलेस तिच्या स्वतःच्या आधार संलग्न (सीडेड) बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यातच डीबीटी पोर्टलद्वारे जमा केला जाईल.

तसेच लाभार्थ्यांना केवळ आधार क्रमांक च्या आधारावरच लाभ दिला जाणार आहे, आणि वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. ( केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिला आणि स्तनदा माता किंवा सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत समान लाभ मिळवणाऱ्या महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार नाही)

तसेच योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार गर्भपात आणि मृत जन्म किंवा उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थीस भविष्यात गर्भधारणा झाल्यास नवीन लाभार्थी म्हणून गणले जाईल. व केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना निकष कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणाली द्वारे आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या मार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असे देखील या शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजने करता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यरत असणाऱ्या एसएनए बँक खात्यामार्फत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याची पुढील कार्यवाही अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल असे देखील या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद.

शासन निर्णय