Compensation for unseasonal rains will now be doubled…
Compensation for unseasonal rains will now be double राम राम मंडळी आता अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हि दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बाबतची संपूर्ण माहिती..
अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार आता दुप्पट दराने…
अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार आता दुप्पट दराने, मंडळी आता 2023 मध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, नुकसान इतके झाले की त्यामधून शेतकऱ्यांना बाहेर पडणे मुश्किल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून राज्य शासनाने अवकाळी पावसाची नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे, आणि याच्यामध्ये राज्याच्या 32 जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण करून या भागातील नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वितरण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला प्रशासनाच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. आणि आता याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा वितरण करण्याची प्रतीक्षा तथा आतुरता राज्यातील सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागलेली आहे.
या शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48(2) अनन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफ ची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75 टक्के व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशाधन दिले जाते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर,त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे,बर्फ अखंड कोसळणे, डगफुटी थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञेय आहे.
आणि तसेच केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 30 जानेवारी 2014 अनन्वय घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधान व अकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 22 जून 2023 अनन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
तसेच नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपिट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेती पिकांच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत करण्याकरता मंत्रिमंडळाने दिनांक 19 12 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधी अवकाळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती, असे या शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
मंडळी 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. आणि याच पार्श्वभूमी वरती राज्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे, आणि आता अशाच परिस्थितीमध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची आलेली पिके असतील या रब्बी हंगामातील पिकांचं राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि यातूनच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा तसेच दिलासा मिळावा यासाठी राज्यातील झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती.
आणि आता याच मागणी वरती राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत दिली जाईल अशा प्रकारचा आश्वासन देण्यात आलेलं होतं. आणि आता याच पार्श्वभूमीवरती काल एक जानेवारी 2024 रोजी एक अतिशय मोठा असा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या शासन निर्णयातून देण्यात आलेला आहे. मंडळी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे ज्या भागातील तथा राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीमुळे अशा शेतकऱ्यांना एक वेळचं निविष्ठा अनुदान देण्यासाठी जिराईत पिकाच्या नुकसानासाठी दिली जाणारी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ची दोन हेक्टर च्या मर्यादित असलेले मदत 13600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रतिशतकरी जास्तीत जास्त चाळीस हजार आठशे रुपये इतकी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाऊ शकते.
तसेच बागायत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 17000 रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये आता वाढ करून 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये केलेली आहे.
तसेच बहूवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 22,500 प्रती हेक्टर दोन एकरच्या मर्यादित असणारी मदत यांच्यामध्ये वाढ करून 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये केलेली आहे. मंडळी ही दिली जाणारी मदत ही नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानी बाबतची आहे, मी याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 19 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी देखील मिळालेली आहे. मंडळी आता लवकरच ज्या जिल्ह्यांमध्ये तथा राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये पंचनामे झालेले आहेत, ज्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून दिलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात तथा वितरित करण्यात आलेले आहेत. आणि ते प्रस्ताव आता लवकरात लवकर मंजूर देखील केले जातील, आणि ज्या त्या जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील मात्रा असलेले जेवढे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची गणना करून तेवढी मदत जिल्ह्याला वितरित केली जाणार आहे.
मंडळी आपण जर पाहिलं तर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 8500 प्रति हेक्टर ने प्रस्तावित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता, परंतु 19 डिसेंबर 2023 च्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे ही मदत आता दुप्पट दराने आणि तीन हेक्टर च्या मदतीत देण्यासाठी निर्णय हा घेण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा निधीची तरतूद ही राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाईल. आणि एकंदरीतपणे जो निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावा लागेल तो निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यानुसार जे पात्र झालेले शेतकरी असतील तथा जेवढी गणना असेल त्यांच्यासाठी आवश्यक असलेला निधी यांच्यासहित एक जीआर हा निर्गमित केला जाईल, आणि या जीआर च्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मदतीचा वितरण हे केल्या जाणार आहे हे आपल्याला समजणार आहे. तसेच कोणते कोणते जिल्हे हे पात्र केले जातील आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना जिरायत बागायत तथा बहुवार्षिक पिकाच्या माध्यमातून प्रकारची मदत ही देण्यात येईल.
मंडळी आता लोकसभेचे इलेक्शन हे जवळ आलेले आहे तथा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत देखील मिळतायेत, आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई ची लवकरात लवकर मदत ही वितरित केली जाईल. असे देखील संकेत आपल्याला मिळत आहेत. चला तर मंडळी येणारे दिवसांमध्ये कळेलच की राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासन नक्की मदत किती देते की फक्त आश्वासन दाखवते. कारण राज्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे प्रचंड हाल सहन करावे लागलेले आहेत, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक या अवकाळी पावसाने हिसकून घेतलेले आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाला ही नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच पाठवावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.