PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या दिवशी जमा होणार

PM Kisan and NaMo Kisan Yojana installments to be collected on this day

PM Kisan and NaMo Kisan Yojana installments to be collected on this day राम राम मंडळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा हफ्ता कधी मिळणार याची महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे, चला तर मंग पाहूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती..

PM Kisan and NaMo Kisan Yojana installments to be collected on this day

पी एम किसान व नमो शेतकरी योजनेच्या हाफ्त्याची देशातील तसेच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे, कारण अनेक नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. आणि त्यामुळेच या योजनांमुळे शेतकऱ्याला थोडा का होईना आर्थिक आधार मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने 2019 मध्ये सुरू केली. यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते चार महिन्याच्या अंतरावर ती वितरित करण्यात आलेले आहेत वर्षाला सहा हजार रुपये इतके अनुदान शेतकऱ्याला प्रतिवर्ष मिळते. आणि आता महाराष्ट्र राज्याच्या राज्य शासनातर्फे देखील नमो शेतकरी सन्माननीय योजनेची स्थापना करण्यात आलेली आहे, या योजनेमधून देखील महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 6000 रुपये प्रति वर्ष देण्याचे घोषित करण्यात आलेले आहे, त्यामध्ये एक हप्ता वितरित करण्यात आलेला आहे परंतु राहिलेले दोन हप्ते कधी वितरित होणार याची आतुरता शेतकऱ्यांमध्ये लागलेली आपण पाहत आहोत.

मंडळी गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये चर्चा चाललेली आहे की पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी वितरित होणार, तसेच महाराष्ट्र राज्य तर्फे चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी वितरित होणार, तसेच शेतकऱ्यांची चाळीस हजार कोटीची कर्जमाफी झाली का? दोन लाखाच्या वरती असणारी कर्जमाफी झाली का होणार आहे का? तसेच पीक विमा कधी खात्यावरती वितरित होणार असे भरपूर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. भरपूर माध्यमांच्या सांगण्यात येत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या दरम्यान वितरित होईल. परंतु खरोखरच विचार केला तर तारीख ही डिक्लेअर केली जात नाही तथा दिली जात नाही. तसे पाहायला गेले तर या योजनेच्या प्रत्येक हप्त्यामध्ये चार महिन्याचा पिरेड देण्यात आलेला आहे. चार महिन्याच्या अंतरावरती दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती दर चार महिन्याला वर्ग केले जातात.

मंडळी आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका या एप्रिल किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केल्या जातील, लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, त्याची आचारसंहिता ही जाहीर केली जाईल, आणि ही आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही लागू शकते, आणि याच पार्श्वभूमी वरती केंद्र शासनाला आचारसंहिता याच्यापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करावा लागेल. आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे पैसे याच दिवशी येतील किंवा जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात येतील हे फिक्स सांगू शकत नाही. परंतु केंद्र शासनाला 15 फेब्रुवारी च्या आत मध्येच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावा लागेल.

तसेच मंडळी राज्य शासनाचा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा अजून शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित करण्यात आलेले नाही. आणि याचा पिरेड जो आहे की तो संपलेला आहे, पहिला जो हप्ता होता तो खरोखर तर जुलै महिन्यातला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करणे अपेक्षित होते, दुसरा जो हप्ता आहे त्या दुसऱ्या हप्ताचा कालावधी हा राज्य शासनाकडून संपलेला आहे. त्यामुळे दुसरा हप्ता हा थकीत आहे, आणि राज्य शासनाचा तिसरा हप्ता देखील या योजनेच्या अंतर्गत बाकी आहे, जो डिसेंबर ते मार्च या कालावधीच्या मदतीला जाईल. मंडळी केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या लोकसभेच्या आचारसंहिता लागणार आहे, या आचारसंहितेच्या पूर्वीच केंद्र शासनाचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित होईल तसेच या आचारसंहितेपूर्वीच राज्य शासनाचे देखील दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाऊ शकतात. कारण राज्यांमध्ये लोकसभेच्या 48 जागा लढवत असताना केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच सरकार राज्यामध्ये असल्यामुळे या दोन्ही हप्त्यांचा लाभ येणाऱ्या निवडणुकांमुळे शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्याच्यामुळेच पी एम किसान चा एक हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे सलग दोन हप्ते असे एकूण सहा हजार रुपये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तसेच 15 फेब्रुवारी च्या आत मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाऊ शकतात.

आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा तो एक हप्ता आहे तो सेपरेट वितरित केला जातो की, दुसरा आणि तिसरा हप्ता एखाद्या सणाचे निमित्त साधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जात आहेत हे मात्र पाहण्यासारखं राहिला आहे. मात्र मंडळी वर्तमानपत्रातून तसेच विविध माध्यमातून रोज एक तारीख आणि एक महिना सांगितलं जातोय, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. परंतु हे हप्ते फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील तथा देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केले जाऊ शकतात, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. कारण फेब्रुवारीच्या कोणत्याही तारखेला लोकसभेच्या आचारसंहिता ही लागू केली जाऊ शकते. तसेच याच्यानंतर राज्य सरकार हेच राहणार का किंवा सत्ता बदल होणार किंवा आमदार अपात्रतेचा काय होणार?असे भरपूर प्रश्न उपस्थित होतात, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता काय होईल हे कोणी सांगू शकत नाही.

कारण हे सरकार जर विसर्जित झालं तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका सोबत होऊ शकतात, आणि जरी तसं झालं नाही तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधी संपायला मे एंडिंग पर्यंत वेळ जाऊ शकतो, आणि तोपर्यंत लगेच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा कालावधी संपतोय. आणि त्यामुळेच सप्टेंबर 2024 मध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो, जर सरकारला कोणत्याही प्रकारची बाधा आली नाही तर. परंतु हा जो नमो शेतकरी सन्माननिधीचा हप्ता आहे हा एक थकीत आहे आहे आणि एक थकलेला आहे. आणि हे हप्ते मे पर्यंत थकवले जाऊ शकत नाही. कारण याच्यासाठीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी करण्यात आलेले आहेत. आणि याच्यामुळेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि केंद्रशासनामार्फत पीएम किसान सन्माननिधी योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निर्णय तसेच आचारसहिता जाहीर होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 6000 रुपये वितरित करण्यात येतील.

आणि याच्यानंतर मंडळी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध योजनांची तसेच पीक विम्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली ती एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कर्जमाफीची माहिती देण्यात आली. राज्यामध्ये राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार सहा ते साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत जे कर्जमाफीसाठी पात्र आहेत, काही तांत्रिक कारणामुळे तथा अडचणींमुळे त्यांना अपात्र करण्यात आलेल होत. किंवा काही शेतकऱ्यांच्या पोर्टल सुरू नसल्यामुळे त्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नव्हती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की चालू कर्ज ही माफ केली जाऊ शकतात का परंतु तशा प्रकारची कोणतीही तरतूद राज्य शासनामार्फत आतापर्यंत तरी करण्यात आलेले नाही. तसेच राज्य शासनामार्फत अजून देखील कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रत्येक गोष्टीची खोलावरती जाऊन सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.

यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता व राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्माननीय योजनेचा हप्ता हा पुढील महिन्यांमध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. असे एकंदरीत संकेत मिळत आहेत.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की पाठवावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.