खुशखबर!! अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरु,लवकरात लवकर अर्ज करा…

Good news!! Annasaheb Patil Tractor Scheme resumes, apply as soon as possible

Good news!! Annasaheb Patil Tractor Scheme resumes, apply as soon as possible राम राम मंडळी, मंडळी राज्यामध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना नवी संजीवनी देणारी ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आलेली आहे, चला तर मंग पाहूयात या योजनेबद्दल लाभार्थी पात्रता,अटी व शर्ती आश्या सर्व बाबी जाणून घेऊयात..

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना मध्यंतरी बंद होती, परंतु आता पुन्हा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस हा गंभीर बनत चाललेला आहे आणि याच पार्श्वभूमी वरती सरकारने मराठा समाजासाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. मराठी माणसाची एक चालत आलेली म्हण आहे ती म्हणजे नोकरी करून फक्त चाकरी करणे, परंतु आता या योजनेच्या माध्यमातून काळ आणि वेळ मराठा समाजासाठी बदलणारा आहे, आणि मराठा समाजामध्ये व्यावसायिक तथा युवा उद्योजक तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे, तसेच भविष्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक संख्येने मराठा तरुण उद्योजक तयार करण्याचे ध्येय असल्याचे श्री.पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहेत, मंडळी मराठा समाजासाठी राज्य शासनामार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे, आणि या महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना ही पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात आलेली आहे. मंडळी याच्या संदर्भातली माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेऊन देण्यात आलेली आहे.

मंडळी आत्तापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 70000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे आणि 58 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 567 कोटीचा व्याज परतावा देण्यात आलेला आहे असे अध्यक्षांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माध्यमातून आजपर्यंत 70 हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत राज्यात सध्या 70,000 लाभार्थ्यांना 5,140 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसाय करता वितरित केलेले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला आर्थिक पाठबळ मिळावं तसेच मराठा समाजामध्ये सुख व समृद्धी नांदावी या उद्देशाने व समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना सुरू करण्यात आलेली असून दसऱ्याच्या सुरुवात करण्यात आलेली आहे.

24 ऑक्टोबर 2023 पासून ट्रॅक्टर खरेदीसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. माननीय नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज परतावा योजनेअंतर्गत स्थगिती असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केली आहे त्याच्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात केलेली आहे. यामध्ये महिंद्रा आणि एस्कॉर्ट टर्बो या दोन कंपन्यांसमोर सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परताव्या योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाभदायक योजना ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत मराठा समाजासाठी भरपूर हित जोपासण्यात आलेले आहे. समाजातील सर्व तथा दुर्लभ शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळावं हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेला विविध योजनांची मर्यादा ही पाच वर्षा वरून सात वर्षे इतकी करण्यात आलेली आहे, आणि वयोमर्यादा ही सर्वांकरिता तसे सर्व शेतकऱ्यांकरता ही साठ वर्षाची करण्यात आलेली आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेची जनजागृती राज्य मध्ये गाव पातळीवरती करण्याच्या उद्देशाने जिल्हा न्यायालय मेळाव्यांचे आयोजन देखील करण्यात आलेले असून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरू करून त्याचा लाभगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत पत्र व्यवहार करून ही ही बाब उपसमिती मध्ये देखील मांडण्यात आलेली आहे. तसेच ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून महामंडळाचे लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदी वर विशेष सवलत मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्न करून ट्रॅक्टर प्रकरणे सुरू करण्याकरिता कार्यवाही केली असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने योजनांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, या योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना(IR-1) अंतर्गत कर्ज मर्यादा दहा लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेले आहे तर तीन लाख रुपयांच्या मर्यादित करण्यात येणाऱ्या व्यास कर्तव्याची मर्दा साडेचार लाख रुपयापर्यंत वाढून कर्ज कालावधी पाच वर्षावरून सात वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे तसेच महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वांकरता वय मर्दाची अटी साठ वर्षे करण्यात आलेली आहे. तसेच शासन आपल्या दारी प्रमाणेच लाभार्थी संवाद मिळावे आयोजित करून महामंडळ आपल्या दारी ची कार्यवाही सुरू केलेली असून आत्तापर्यंत राज्यात तीन संवाद मिळावे व एकूण 11 जिल्ह्यांमध्ये दौरे करण्यात आलेले आहेत, तसेच लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक ऑफ इंडिया समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्याप्रमाणे पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर बरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून या सीएससी सेंटरच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया महामंडळाच्या स्तरावर सुरू आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. मराठी माणसांमध्ये भांडवलाची कमतरता असल्यामुळे मराठी माणूस हा धंद्यामध्ये उतरण्यामध्ये पाऊल मागे घेत असतो आणि याचाच विचार करता समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून तसेच मराठा समाजामध्ये अधिकाधिक तरुण उद्योजक तयार होण्यासाठी हे फार महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे, शेतीसाठी पूर्वी बैलांच्या माध्यमातून मशागत केली जायची परंतु आता तंत्रज्ञान जसे विकसित झालं तर शेतामध्ये ट्रॅक्टरचा वापर जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे, परंतु ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ट्रॅक्टरच्या किमती देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आणि हा ट्रॅक्टर मराठा समाजामधील तसेच समाजातील आर्थिक व दुर्बल मागास असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी खरेदी करण्यास अवघड जात आहे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, आणि या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी चांगल्या प्रमाणे घेत आहेत हे दिसून येत आहे.

अनेक बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत व्यवसाय करिता बिनव्याजी कर्जाची उपलब्धता करण्यात येत आहे. आणि आता या ट्रॅक्टरची या योजनेच्या माध्यमातून देखील लाभ देण्यात येत आहे, आता शेतातील सर्व कामेही ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येत आहेत, त्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टर ला अनन्य साधारण महत्व आहे तथा ट्रॅक्टर ही शेतकऱ्याची एक मूलभूत गरज बनलेली आहे. आर्थिक पाठबळ नसणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना तसेच मराठा समाजातील बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही अशावेळी तुम्ही जर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊ शकतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेअंतर्गत भरपूर योजना या समाजाच्या हितासाठी राबवल्या जातात, तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण भरपूर प्रमाणात अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी आणि आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.