गाय गोठा अनुदान योजना 2023/24

Cow Gotha Grant Scheme 2023/24

Cow Gotha Grant Scheme 2023/24 राम राम मंडळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे.या योजनेला शासनाने 3 फेब्रुवारी 2021 ला मंजुरी दिलेली आहे.चला तर मंडळी या योजने बद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहूयात..

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)

गाय गोठा अनुदान 2023/24, मंडळी राज्य शासन अल्पभूधारक शेतकऱ्याला तथा सर्वसामान्य नागरिकांना शासनामार्फत मदत व्हावी यासाठी विविध योजना अमलात आणत असते, त्यातील प्रमुख योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजना, या योजनेची सुरुवात केंद्र शासनाने 7 सप्टेंबर 2005 रोजी सुरू केली. आणि आता याच योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व अल्पभूधारक तथा सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांना गाय गोठा पालन कुक्कुटपालन शेळीपालन अशा विविध शेती सोबत जोडधंदांच्या व्यवसायासाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा हे उद्दिष्ट तथा ध्येय ठेवून राज्य शासनाने ही योजना अमलात आणलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेला 3 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेत या योजनेच्या लाभार्थी ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिक आहेत. या गोट्यासाठी जे अनुदान दिले जाते ते अनुदान तुमच्या गोठ्यामध्ये गुरे तथा गाई किती आहेत या वरती दिले जाते. तसेच मंडळी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर करायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जे काही लेबर बजेट मध्ये तरतूद केलेली असेल त्यानुसार किंवा गावातून जे लाभार्थी असतील जे सार्वजनिक वृक्ष लागवडीची, फळबागेची कामे घेतात तसेच शेततळ्याची कामे घेतात आशा लाभार्थ्यांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य देखील दिले जातं. या लाभार्थ्यांना गाय गोठ्याचा लाभ दिला जातो. मंडळी आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांचा या वैयक्तिक लाभाच्या योजनेकडे सातत्याने कल असतो. परंतु याच्याबरोबर जी 60-40 चा रेशो मेंटेन करण्यासाठी ची जी आवश्यक काम असतात ती सुद्धा त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे, या प्रकारची जर कामे केली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तथा लाभधारकांना गाय गोठा या योजनेचा शेळी पालन शेड तसेच कुकूटपालन शेड या योजनेचा लाभ दिला जातो.

गाय गोठा या योजनेचा उद्दिष्ट हे गोठ्यातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र शेण याचा संचय न करता आल्याने ते मोठ्या प्रमाणात वाया जाते. जनावरांचे मूत्र व शेण हे उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत असल्याने जनावरांच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट काँक्रीट चा वापर करून पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केल्यास जनावरापासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठ्या शेजारी असणाऱ्या खड्ड्यांमध्ये एकत्र जमा करून त्याचा शेत जमिनीची सुपीकता व उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग करून घेता येईल. तसेच गोट्यामध्ये जर काँक्रीट केले तर जनावरांचे आरोग्य हे निरोगी राहते, तसेच जनावरांच्या गोठ्यामध्ये स्वच्छता असल्यास जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचा बचाव होतो.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने मधून शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी छतासाठी तसेच छतावीरहित याच्यामध्ये छतासाठी साधारणपणे 77 हजार रुपये इतक्या अनुदान दिले जाते, तसेच छताविरहित गोटासाठी 48000 पर्यंतचे अनुदान दिले जाते तसेच याच्यामध्ये लाभार्थ्याकडे तसा तसेच अर्जदाराकडे गाई म्हशी किती उपलब्ध आहेत याची पडताळणी देखील केली जाते. तसेच शेळी मेंढी शेड बांधणे याच्यामध्ये शेळी मेंढी ची संख्या तसेच कुकूटपालन शेड बांधणे याच्यामध्ये पक्षांची संख्या याचा अर्ज आपल्याला भरून द्यावा लागतो तसा सादर करावा लागतो.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना ( गाय गोठा अनुदान योजना)

लाभार्थी पात्रता

 • दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंब
 • अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती
 • शारीरिक अपंगत्व प्रदान असलेली कुटुंब
 • भटक्या जमाती (NT)
 • भटक्या विमुक्त जमाती
 • महिला प्रधान कुटुंब( महिला कर्ता असलेली कुटुंब)
 • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
 • भू सुधार योजनेचे लाभार्थी
 • अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वननिवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती
 • कृषी कर्जमाफी 2008 नुसार अल्पभूधारक (१ हेक्टर पेक्षा जास्त पण दोन हेक्टर (पाच एकर)पर्यंत जमीन असलेला शेतकरी) (जमीन मालक कुळ व समान शेतकरी एक हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकरी)
 • तसेच सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान 20 ते 50 फळझाडे वृक्ष लागवड करण्यात येऊन त्याचे तीन वर्षे संगोपन करून झाडे शंभर टक्के जिवंत ठेवून योजनेचा लाभ पूर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
 • 1) वैयक्तिक क्षेत्रावर वीस ते पन्नास फळझाडे वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा छताविरहित कामाचा लाभाकरिता पात्र असेल
 • 2) वैयक्तिक क्षेत्रावर 50 पेक्षा जास्त फळझाडे वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा, शेळीपालन पालन शेड तसेच कुक्कुटपालन कामाचा लाभ करता पात्र असेल
 • 3) तसेच सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान शंभर दिवस काम केल्यास छतासह गाय गोठा, शेळी पालन शेड कुक्कुटपालन कामाचा लाभाकरिता पात्र असेल
 • पशुपालन असले बाबतचा पशुधन पर्यवेक्षक पशुधन अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे
 • 1)गाय गोठा करिता दोन ते सहा गुरे आवश्यक आहेत ( तसेच जनावरांचे टेगिंग आवश्यक राहील)
 • 2) शेळीपालन शेडकरिता 2 ते 10 शेळी आवश्यक आहे
 • 3) तसेच कुकूटपालन शेड करिता किमान 100 पक्षी आवश्यक आहेत ( ज्या लाभार्थ्याकडे 100 पक्षी नाही त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करावी व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये कुक्कुटपालन शेडमध्ये 100 पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील)

आवश्यक असणारी कागदपत्रे

 • ग्रामपंचायत नमुना 9चा उतारा ( तीन महिन्याच्या आतील) 8अ किंवा 7/12 उतारा साक्षांकित सत्यप्रत जोडावी
 • ग्रामसभेचा ठराव
 • ग्रामपंचायत चे मागणी पत्र
 • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
 • जॉब कार्ड / बँकपासबुक / आधार कार्ड
 • जनावरांचा गोठा जनावरांचा तपशील (संख्या)
 • अल्पभूधारक शेतकरी/ भूमिहीन/ अपंग प्रमाणपत्र
 • गोठ्याचा तपशील तथा अंदाजपत्रक
 • प्रस्तावित जागेचा GPS PHOTO (note cam)
 • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये Tagging फोटो
 • रहिवासी स्वयंघोषणापत्र

अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकता.

गाय गोठा योजनेच्या काही अटी व शर्ती

 • वैयक्तिक क्षेत्रावर वृक्ष लागवड व संगोपन (तीन वर्ष प्रती हेक्टर) कोणतेही वृक्ष किंवा विविध वृक्षांचे मिश्रण
 • वैयक्तिक शेततळे 15×15×15 मीटरचे लाभ घेतलेले लाभार्थी
 • सार्वजनिक क्षेत्रावर व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड संगोपन कामे (किमान 200 झाडेचा एक गट संगोपन करणारे कुटुंब)
 • कंपोस्ट बडींग चे लाभ घेतलेले लाभार्थी तसेच योजनेअंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये नरेगाअंतर्गत 275 वयक्तिक व सार्वजनिक कामांपैकी ज्या कामांमध्ये अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे अशा सर्व कामाच्या संयोजनातून 60-40 चा अकुशल कुशल प्रमाण राखण्याचे प्रयत्न करणारे सर्व कुटुंब लाभार्थी मजूर हे लाभ घेण्यास पात्र राहतील.
 • वरील प्रमाणे जे लाभार्थी योजनेअंतर्गत कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण 60-40 राखण्यास प्रयत्न करणारे असे सर्व इच्छुक कुटुंब तसेच अर्जदार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहतील.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावे व आपल्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.