विहिरीसाठी मिळतंय आता 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज..

Now you are getting a grant of Rs 4 lakh for the well, apply like this..

Now you are getting a grant of Rs 4 lakh for the well, apply like this..राम राम मंडळी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 387500 विहिरी खोदण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. मागेल त्याला विहीर या अंतर्गत याच विहिरीसाठी अर्ज कसा करायचा या साठी अटी व शर्ती तसेच लाभार्थी पात्रता काय आहेत, या बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पहाणार आहोत…

मागेल त्याला विहीर..

विहिरीसाठी मिळतंय आता 4 लाख रुपये अनुदान, मंडळी महाराष्ट्र राज्य तथा केंद्र शासन सर्वसामान्य तसेच आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विविध योजना अमलात आणत असते. या योजनांमधलीच प्रमुख योजनाम्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत मागील त्याला विहीर सर्वांना विहीर तसेच वैयक्तिक विहीर देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या योजनेअंतर्गत पहिले लाभार्थ्याला तीन लाख रुपये इतक्या अनुदान देण्यात येत होते परंतु आता हे अनुदान चार लाख रुपये करण्यात आलेले आहे. या योजनेसाठी भरपूर अटी या शिथिल करण्यात आलेल्या आहेत कारण भरपूर लोकांना यावेळी योजनेचा लाभ घेता यावा आणि या योजनेला गती मिळेल. मंडळी आपण जर पाहिलं तर दारिद्र्यरेषेखालील तसेच अनुसूचित जाती जमातीतील जे लाभार्थी असतील, आशा लाभार्थ्यांमध्ये जी दोन विहिरींची अट होती ती देखील शिथिल करण्यात आलेली आहे. मंडळी आपण जर पाहिलं तर पूर्वी शेतकऱ्यांना विहीर घेण्यासाठी तथा विहिरीच्या अनुदानासाठी तीन लाख रुपये ही एवढी रक्कम देण्यात येत होती परंतु आता या रकमेमध्ये एक लाख रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि आता ही रक्कम चार लाख रुपये इतकी देण्यात येते. जर आपण भूजल सर्वेक्षणाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अजूनही तीन लाख 87 हजार 500 विहिरी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये घेऊ शकतो अशाप्रकारे सांगण्यात आलेला आहे. तसा शासन निर्णय देखील आलेला आहे.

तसेच मंडळी जी दोन खाजगी विहिरीमध्ये जी आठ होती ती देखील शितल करण्यात आलेली आहे. फक्त पिण्याच्या पाण्यापासून पाचशे मीटर वरती विहीर असावी ती अट ठेवण्यात आलेली आहे. याच्या आदी मंडळी आपण जर पाहिले तर प्रत्येक गावनिहाय लक्षांक देण्यात आलेले होते त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी अर्ज करू शकत नव्हते परंतु आता लक्षांकाची अट देखील हटवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मागील त्याला विहीर असे अर्ज करण्यात येणार आहे, आणि अशा प्रकारचे बदल करून आता राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. तसेच विहिरीसाठी लाभधारकांची निवड करत असताना गाव पातळीवर एका आर्थिक वर्षामध्ये मजुरी व साहित्याचे प्रमाण हे 60-40 राखण्यात यावं अशा प्रकारचे देखील एक महत्त्वाची अट आहे. आपण जर पाहिलं तर फळबाग लागवड असेल बांधबंधिस्तीची काम असतील अशी कामे घेऊनच लाभार्थ्यांना यादेखील विहिरीच्या अनुदानाचा लाभ हा घेता येणार आहे. मंडळी याच्यामध्ये लक्षांकाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही, जो 60- 40 चा रेशो दिलेला आहे तो मेंटेन करून ज्या त्या गावांमध्ये जेवढे लाभार्थी पात्र होतील तेवढ्या लाभार्थ्यांना आता या विहिरीच्या चार लाख रुपयांच्या अनुदानासाठी पात्र हे केले जाणार आहे. तसेच अधिक विहिरींची मागणी झाल्यास सुरू असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण होत जातील तसतसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी असे देखील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तसेच या सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये एकाच वेळी किती विहिरीची कामे सुरू असू शकतात या संदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजुरीची आठ रद्द करण्यात येत आहे, असे देखील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

कोणते लाभार्थी पात्र असतील

 • अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / भटक्या जमाती
 • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
 • स्त्री करता असलेली कुटुंबे
 • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
 • जमीन सुधारणांचे लाभार्थी
 • इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी
 • निरधीसुचित जमाती( विमुक्त जाती)
 • सिमांत शेतकरी (अडीच एकर पर्यंत भूधारणा)
 • अल्पभूधारक शेतकरी (पाच एकर पर्यंत भूधारणा) असे सर्व प्रवर्गातील लाभार्थी.
 • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006(2007चा 2) खालील लाभार्थी.

लाभार्थ्याची पात्रता काय असेल

 • लाभार्थ्याकडे किमान एक एकर क्षेत्र सलग असावे
 • महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पेजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञय करू नये.
 • तसेच दोन सिंचन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराचे आठ पुढील बाबींना लागू राहणार नाही.1) दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ जोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंबायां करता लागू करण्यात येऊ नये 2) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. ह्या नवीन अटी शिथिल करण्यात आलेले आहेत.
 • लाभार्थ्याच्या सातबारा वरती पहिली विहिरीची नोंद असू नये
 • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा
 • एकापेक्षा अधिक लाभदायक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र एक एकर पेक्षा जास्त असावे
 • ज्या लाभार्थ्यांना या विहिरीचा लाभ मिळणार आहे ते लाभधारक जॉब कार्डधारक असावेत.

विहीर कोठे खोदावी

 • दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांच्या संगमा जवळ जेथे मातीचा किमान 30 सेंटिमीटर चा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो येथे विहीर खोदावी.
 • नदी व नाल्याजवळील उथळ गाळाच्या प्रदेशात
 • जमिनीच्या सखलं भागात जेथे किमान 30 सेंटिमीटर पर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम झिजलेला खडक आढळतो
 • नाल्याच्या तीरावर जेथे उंच उठा आहे तेथे परंतु सदर उंचावर चोपन किंवा चिकन माती नसावी.
 • नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदीपात्र नसताना देखील वाळू रेती व गारगोटे थर दिसून येतात
 • नदीचे नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग
 • अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

विहीर कोठे खोदु नये

 • भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत
 • डोंगराचा कडा व आसपासच्या दीडशे मीटरच्या अंतरात
 • मातीचे थर 30 सेंटिमीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात
 • तसेच मुरमाची खोली पाच मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
 • तसेच विहीर खोदताना खाली काळा खडक पाषाण लागल्यास मशीन वापरून पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करून पंचनामा करून पूर्णत्वाचे दाखले द्यावे तसेच 14 क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करू नये एखाद्या विहिरीत पाणी लागले नसल्यास तसे नमूद करून विहीर निष्पर ठरविण्यात यावी अशा दोन्ही प्रकारे अपयशी झाल्यास विहिरीत पुरेसे पाणी यावे याकरिता शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहिरी साठी मनरेगा योजनेतून कामे देखील करू शकता.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

 • सातबाराचा ऑनलाईन उतारा
 • 8अ चा ऑनलाईन उतारा
 • जॉब कार्ड ची प्रत
 • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून एक एकर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा
 • सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापरा बाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र.

कशाप्रकारे अर्ज करू शकतो..

अर्जदार अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकारे देखील करू शकतो.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा तसेच आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद..

शासन निर्णय