PM किसान योजना 2024

PM Kisan Yojana 2024

PM Kisan Yojana 2024 राम राम मंडळी आज आपण पाहणार आहोत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपये दिले जातात,परंतु आता शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 9 हजार रुपये मिळणार अशी चर्चा देशभर चालू आहे. चला तर पाहूयात याच संदर्भातील संपूर्ण माहिती..

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना

PM Kisan Yojana 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने 1/12/2018 पासून ही योजना कार्यान्वित केली. देशातील सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला केंद्रशासन वर्षाला सहा हजार रुपये इतके अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येक चार महिन्याच्या अंतरावरती वर्ग करते. तसेच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची ओळख करून पात्र शेतकऱ्यांना योजना लागू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते दोन हजार रुपये प्रमाणे चार महिन्याच्या अंतरावरती वितरित करण्यात आलेले आहेत.

देशातील त्याचा सर्व राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठ्या प्रमाणावरती सामना करावा लागतोय, शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेले पीकाचे या नैसर्गिक संकटांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागत आहे. अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल अशा भरपूर सह नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये पिकाला योग्य हमीभाव देखील मिळत नाही त्यामुळे देशातील शेतकरी पूर्णतः हातबल झालेला आहे, म्हणूनच केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना अमलात आणली. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सहा हजार रुपये प्रति वर्ष इतके अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते, या योजनेतून शेतकऱ्याला थोडाफार का होईना आर्थिक आधार मिळावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मंडळी आपण पाहतच आहोत की राज्यांमध्ये तसेच देशामध्ये 15 जानेवारी 2024 पर्यंत संपर्कता अभियान सुरू आहे ज्याच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही तसेच ज्यांची केवायसी अपूर्ण आहे असे सर्व कामे पूर्ण करून घेतले जातात तसेच ज्या शेतकऱ्यांचा फिजिकल वेरिफिकेशन अपूर्ण आहे अशा शेतकऱ्यांचा फिजिकल वेरिफिकेशन हे पूर्ण करून या अभियानामार्फत घेतले जात आहे. याच्यासाठीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून देखील एक संपर्कता अभियान राबवण्यात आले होते, आणि याच अभियानाच्या अंतर्गत उर्वरित असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी तसेच आपले आधार कार्ड संलग्न बँक खाते ओपन करून घ्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल वेरिफिकेशन बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा अशा प्रकारचा आवाहन हे कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. जेणेकरून या योजनेचा हप्ता मिळत असताना महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी या योजनेसाठी पात्र होतील अशा प्रकारचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि याच्यासाठीच देशातील सर्व राज्यांमध्ये संपर्कता अभियान राबविले जात आहे. मंडळी हे संपर्कता अभियान देशांमध्ये राबवल्यानंतर त्याच्यामध्ये जे पात्र शेतकरी आहे यांची फायनल यादी पुन्हा एकदा प्रसिद्ध केली जाईल आणि ही यादी साधारणतः 20 जानेवारी पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याच कालावधीमध्ये देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 16 वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो. म्हणजे मंडळी जानेवारी 2024 मध्येच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 9 हजार रुपये दिले जाणार?

मंडळी आपण पाहत आहोत की बरं साऱ्या प्रसारमाध्यमातून अशा बातम्या दाखवल्या जात आहेत की शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये आता दिले जाणार म्हणजे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये वाढीव दिले जाणार अशा भरपूर बातम्या आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

मंडळी याच्यासाठी आपण जर पाहिले तर ही योजना राबवत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या मंजूर या दिल्या जातात आणि या मंजुऱ्यांसाठीच बजेटमध्ये तरतूद केली जाते, आणि येणाऱ्या बजेटमध्ये या योजनेसाठी 9 हजार रुपयांची तरतूद करावी अशी मागणी देखील केली जात आहे. मंडळी आपण जर पाहिलं तर 2020 पासून स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा लागत आणि मूल्य जो खर्च आहे हा खर्च वाढलेला आहे, आणि याच्या माध्यमातून जे दिले जाणारा अनुदान आहे हे पोकळ आहे त्यासाठी अनुदानामध्ये वाढ करून जास्तीत जास्त बारा हजार रुपये अनुदानात वाढ करावी. अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती, आणि आता याच पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून वार्षिक मिळणारे 6000 रुपये याच्यामध्ये वाढ करून वार्षिक नऊ हजार रुपये इतक्या अनुदान देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु याच्या संदर्भात अद्याप देखील कोणत्या प्रकारचे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आणि तशा प्रकारची घोषणा जर केली जाईल तर ती फक्त बजेटच्या माध्यमातून केली जाते.

मंडळी फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्र शासनाचा शेवटचा अर्थसंकल्प हा प्रसारित केला जाणार आहे, कारण फेब्रुवारी 2024 नंतर लोकसभेच्या निवडणुकीचा कालावधी सुरू होणार आहे तथा आचारसंहिता सुरू होणार आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या 2024 च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा देखील शेतकऱ्यांसाठी केल्या जाणार आहेत, आणि याच माध्यमातून पी एम किसान या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजनेसाठी देखील काही महत्त्वपूर्ण अशी देखील घोषणा केली जाऊ शकते. परंतु हे जे काही वाढीव रक्कम असेल 9000 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल ही रक्कम फक्त बजेटमध्ये घोषित केली जाऊ शकते, त्यामुळे अध्याप तरी या योजनेअंतर्गत जो दोन हजार रुपयाचा हप्ता चार महिन्याच्या अंतरावरती वितरित केल्या जात आहे तोच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केल्या जाणार आहे, आणि तो या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल.

मंडळी अशाप्रकारे राज्य शासनाच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति वर्ष दिले जाणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे, आणि त्यातील एक हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग देखील करण्यात आलेला आहे. परंतु दुसरे हप्त्याचा कालावधी हा संपलेला आहे आणि तिसरा हफ्ताचा कालावधी हा सुरू झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाऊ शकतात, असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मंडळी आपण जर पाहिलं तर आता लोकसभा च्या निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या नंतर कधीही लागू केल्या जाऊ शकतात त्यामुळे त्याच्या आचारसंहिता ही कधीही लागू केली जाऊ शकते त्यामुळे त्याच्या आधी पंतप्रधान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल अशा दोन्ही योजनांचा सलग तीन हप्ते म्हणजे पी एम किसान योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते असे तीन हप्ते सहा हजार रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोबत वर्ग केले जाऊ शकतात.

तर मंडळी देशांमध्ये तथा राज्या राज्यामध्ये जे राबवले जाणारे संपर्कता अभियान आहे हे अभियान 15 जानेवारी 2024 पर्यंत राबवले जाणार आहे तरी राज्यातील तथा देशातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे ज्यांची जर केवायसी बाकी असेल त्यांनी केवायसी करून घेणे तसेच ज्यांचे आधार कार्ड हे बँकेची सलग्न नसेल तर ते बँकेच्या खात्याला जोडून घेणे, तसेच ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल वेरिफिकेशन बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी फिजिकल वेरिफिकेशन करून घेणे म्हणजे या योजनेमार्फत येणारे सर्व हप्ते शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता त्यांच्या खात्यावरती वितरित होतील.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळावर अवश्य भेट द्यावी धन्यवाद.