PM कुसुम सोलर पंप योजना 2024

PM Kusum Solar Pump Scheme 2024/ राज्यात कुसुम सोलर पंप योजना सुरु

राम राम मंडळी, राज्यात कुसुम सोलर पंप योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात पाच लाख लाभार्थ्यांना सौर पंप आस्थापित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. चला तर मग मंडळी आपण आज या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊयात..

कुसुम सोलर पंप योजना

मंडळी केंद्र शासन तथा राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या तथा फायद्याच्या विविध योजना अमलात आणत असते. आणि हेच उद्दिष्ट लक्षात घेऊन केंद्र शासनाने देशामध्ये पीएम कुसुम सोलर पंप योजना ही योजना अमलात आणली या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दिवसा वीज उपलब्ध व्हावी तसेच शेतकऱ्याला होणारा विजेचा जो खर्च आहे तो कमी प्रमाणात हवा आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मित्रांनो प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अभियान याच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता व्हावी, यासाठी राबवली जाणारी ही देशातील अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. जागतिककरणा वरती होणार ग्लोबल वार्मिंग तसेच नवीकरणीय माध्यमातून जे काही जागतिक स्त्रोत आहेत याच्या माध्यमातून विजेची निर्मिती तसेच हे सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशभरात केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम कुसुम सोलर योजना ही योजना आणलेली आहे, तथा राबवली जात आहे.

तसेच या योजनेचे तीन घटकांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे घटक अ घटक ब आणि घटक क आणि या प्रत्येक घटकांबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

घटक अ

मंडळी या योजनेअंतर्गत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावरती घेतल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 50 हजार रुपये इतके भाडे देण्यात येत आहे, अशा ज्या काही खाजगी शेतकऱ्यांच्या किंवा शासनाच्या माध्यमातून भाडेतत्त्वावरती घेतलेल्या ज्या काही जमीनी आहेत अशा जमिनीवरती किंवा शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जमिनी वरती तसेच विकासकांच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या जमिनीवरती स्वतः शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे गट तसेच विकासक यांच्या माध्यमातून ०.५ ते दोन मेगावॅट पर्यंतचे सौर ऊर्जेचे प्रकल्प या घटक चा अंतर्गत उभा करण्यात येतात, आणि याच्यासाठीच केंद्रशासन माध्यमातून निविदा देखील काढण्यात येतात.

घटक ब

प्रधानमंत्री कृषी सोलर पंप योजना अंतर्गत राबवला जाणारा हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. मंडळी या योजनेअंतर्गत जर आपण पाहिले गेले तर आतापर्यंत नऊ लाख 71 हजार सोलर पंप शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. एकंदरीत जर आपण पाहिले तर घटक ब च्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची विजेची जोडणी अद्याप पर्यंत झालेली नाही जे शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचनाची सोय करतात आता विहिरी मधून पाणी उपसतात अशा शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता न होऊ शकल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा सिंचन होऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देण्यासाठीची योजना आहे. मंडळी या योजनेअंतर्गत 0.5 पासून 2.5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी तीन एचपी चा सोलर पंप उपलब्ध करून दिला जातो. तसेच अडीच एकर पासून पाच एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पाच एचपी चा सोलर पंप दिला जातो. आणि पाच एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जमीन असलेल्या तसेच भौगोलिक परिस्थिती चांगली असलेल्या भागातील शेतकऱ्यांना 7.5 एचपी चा पंप हा या योजनेअंतर्गत दिला जातो.

मंडळी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र मधील जे जे गाव भूजल सर्वेक्षणच्या यादीमध्ये आहेत, ज्या गावांमध्ये पाण्याची उपलब्धता आहे अशा गावांची निवड करून या गावांमध्ये ही योजना प्रामुख्याने राबवली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत निवड केलेल्या गावांच्या व्यतिरिक्त जी गावे तथा शेतकरी डिझेल पंपांच्या माध्यमातून सिंचन करत आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येतो. मंडळी या योजनेअंतर्गत लाभ घेत असताना शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी असे पंप वितरित केले जातात, त्याच्यासाठी अनुसूचित जाती तथा जमातीतील शेतकऱ्यांना 95 टक्के इतक्या अनुदान दिले जातं, आणि लाभार्थी हिस्सा म्हणून या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के हिस्सा भरायचा असतो, याच्या व्यतिरिक्त खुला व ओबीसी प्रवर्गासाठी या सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 90% इतके अनुदान दिले जात. तर दहा टक्के लाभार्थी हिस्सा हा शेतकऱ्यांना भरायचा असतो.

उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर…एखाद्या सौर पंपाची किंमत जर दोन लाख रुपये असेल तर तर अनुसूचित जाती आणि जमातीतील (SC / ST) लाभार्थ्यांना पाच टक्के इतकी अर्थात दहा हजार रुपये इतकी रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून भरावयाची असते. आणि उर्वरित जे रक्कम आहे शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपी दिली जाते.

तर ओपन तथा खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाचा जर पंप असेल तर लाभार्थी हिस्सा म्हणून 10% रक्कम भरवायचे असते, म्हणजे जर दोन लाख रुपयांचे पंप असेल तर 20000 रुपये इतकी रक्कम हि GST सह शेतकऱ्याला लाभार्थी हिस्सा म्हणून भरावे लागते आणि उर्वरित रक्कम ही शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात दिली जाते.

आपण जर पाहिलं तर देशातील सर्व शेतकऱ्यांना वीस लाखाच्या पेक्षा जास्त सौर पंप वितरित करण्याचे मंजुरी देण्यात आलेले आहे, आणि या पार्श्वभूमीवरतीच 9 लाख 71 हजार पंप आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत, त्याच्या पैकी महाराष्ट्र राज्याला दोन लाख 25 हजार इतके पंप हे महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख 4 हजार पंपांची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आणि या योजनेमध्ये तथा घटक ब मध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल स्थानी आहे.

घटक क

मंडळी घटक क कडे जर आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता आहे, तसेच त्या शेतकऱ्यांकडे सौर पॅनल लावण्याची सुद्धा उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत 40 टक्के अनुदानावरती घटकाच्या कच्या अंतर्गत सोलर पंप उभारण्यासाठी मंजुरीही देण्यात येते. जर एखाद्या शेतकऱ्याकडे पाच एचपी किंवा साडेसात एचपी ची जोडणी झालेली असेल तर त्या जोडणीच्या दुप्पट सोलर पंप हा मंजूर करण्यात येतो, आणि या सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली जी काही अतिरिक्त वीज आहे ती वीज पुन्हा महावितरण ला तथा डिस्कोमला घटक चा अंतर्गत दिली जाते. मंडळी हा घटक राबवण्यासाठी संपूर्ण देशांमध्ये मंजुरीही देण्यात आलेली आहे, परंतु हा घटक फक्त राजस्थान गुजरात व मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये झालेले आहे, महाराष्ट्र मध्ये सुद्धा या घटकाच्या अंतर्गत 10000 सोलर पंप वितरित करण्याचे मंजुरी देण्यात आलेली होती, परंतु अध्याप तरी या योजनेची अंमलबजावणी तथा घटक क ची अंमलबजावणी महाराष्ट्र मध्ये झालेली नाही. परंतु हा घटक जर महाराष्ट्रामध्ये राबवला तर ज्या शेतकऱ्यांकडे विजेची जोडणी पहिली झालेली आहे अशा शेतकऱ्यांना या घटक क च्या अंतर्गत फायदा होऊ शकतो.

तर मंडळी घटक अ घटक ब घटक क अशा तीन घटकांमध्ये राबवली जाणारी ही केंद्र शासनाची अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच पीएम कुसुम सौर पंप योजना आणि या योजनेची माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात पाहिलेली आहे.

पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्रे

  • आधार कार्ड प्रत
  • रद्द केलेला धनदेश प्रत/ बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 7/12 उतारा ( विहीर कुपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक) तसेच एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर बोगवटदारांचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती सादर करावे.
  • तसेच शेतजमीन/ विहीर/ कुपनलिका/पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल..
  • नोटकॅम मध्ये विहरीचा तथा अन्य सिंचनाचा स्रोत उपलब्ध असलेला फोटो

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की पाठवावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.