लेक लाडकी योजना

Lake Ladki Scheme

lake ladki scheme नमस्ते मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या lake ladki scheme या योजने बाबतीतील संपूर्ण माहिती आज आपण पहाणार आहोत

Lake Ladki Scheme

लेक लाडकी योजना, मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये मदत दिली जाणार आहे, महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्य शासना मार्फत 125 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे, आणि जे आता अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्या निधीची मागणी देखील केलेली आहे. ती मागणी मान्य झाली की त्वरित त्याचा लाभ हा त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे.

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत मुलीला एक लाख एक हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे, मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, यानंतर इयत्ता सहावी सात हजार रुपये, तसेच इयत्ता अकरावी ते आठ हजार रुपये लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे अशी एकूण मिळून एक लाख हजार रुपये इतकी रक्कम ही मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील एकूण अडीच लाख मुलींना या योजनेअंतर्गत लाभ होऊ शकतो असे सरकारकडून म्हणजे राज्य शासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तिला पाच हजार रुपयांचा लाभ हा मिळणार आहे. राज्यामध्ये एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे, तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्यानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे ही आवश्यक राहील. तसेच मित्रांनो एक एप्रिल 2023 आधी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्रपणे ही योजना लागू राहील.

मंडळी महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंगनिवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, तसेच मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये लेक लाडकी योजना लाडके राज्य शासनामार्फत राबविण्यात मंजुरी ही देण्यात आलेली आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींचे शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नवीन योजना संदर्भातील दिनांक १ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे, सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमणी करण्याकरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचारधारेत होते. आणि त्याच अनुषंगाने सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्येअनुदान देऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा देखील करण्यात आलेली आहे. त्याच अनुसरून राज्यात मुलींचे सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच मुलींच्या शिक्षणास चालना देणे तसेच मुलींच्या मृत्यू दर कमी करून बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व शाळबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे या योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहेत.

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ज्या काही अटी व शर्ती आहेत त्या आपण खाली पाहुयात

 • लेक लाडकी योजना ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
 • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करता वेळी माता पित्याने कुटुंबाचे नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे बंधनकारक राहील.
 • तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील, मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील/ म्हणजे आई किंवा वडिलांनी या दोघांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
 • दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ( स्वतंत्र) ही योजना अनुज्ञय राहील मात्र मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
 • तसेच मित्रांनो लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील
 • लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे
 • लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आपण खाली पाहुयात

 • लाभार्थ्याचा जन्माचा दाखला
 • कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे) याबाबत तहसीलदार/ सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील
 • लाभार्थ्याचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)
 • पालकाचे आधार कार्ड
 • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
 • रेशन कार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड याची साक्षांकित प्रत )
 • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला )
 • संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, म्हणजे बोनाफाईड
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
 • या योजनेअंतर्गत अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसल्याचे आवश्यक राहील व (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र लागेल)

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या योजनेच्या लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी व तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीचे जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकीकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टांमध्ये नमूद केल्यानुसार आवश्यकता कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त व एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई त्यांच्या स्तरावरून सुधारणा कराव्यात, तसेच या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी तसेच जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. तसेच अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा अशा प्रकारची कार्यपद्धती या शासन निर्णयांमध्ये तथा शासन निर्णया मार्फत सांगण्यात आलेली आहे.

मंडळी मुलींच्या सक्षमीकरणा करता राज्यांमध्ये पूर्वी सुरू असलेली माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना ही योजना बंद करून आता राज्यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपयांपर्यंतच्या अनुदान हे या योजनेमार्फत देण्यात येणार आहे, तरी या संकेतस्थळामार्फत राज्यातील सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना एवढीच विनंती आहे की या योजनेच्या लाभास जर आपण पात्र असाल तर या योजनेचा लाभ आपण त्वरित घ्यावा एवढीच विनंती.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.