संजय गांधी निराधार योजना 2024

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना राबवली जाते, या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पूर्वी 1500 रुपये दिले जायचे, परंतु आता या मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तरी या संदर्भातील अटी, शर्ती लाभार्थी पात्रता या बाबतची संपूर्ण माहिती आज आपण पहाणार आहोत..

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024

संजय गांधी निराधार योजना 2024, मित्रांनो राज्य शासनाच्या म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते, ही योजना राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2008 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून ही योजना सुरू केलेली आहे. समाजातील दुर्बल घटकांना म्हणजे समाजातील आर्थिक मागास घटकांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मंडळी 2019 च्या अगोदर या योजनेमध्ये प्रति महिना 600 रुपये इतकी पेन्शन लाभार्थ्याला रक्कम स्वरूपात दिली जायची. त्यानंतर 2019 विचार अर्थसंकल्पांमध्ये एक हजार रुपये इतकी पेन्शन लाभार्थ्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि त्यानंतर परत दीड हजार रुपये प्रति महिना इतकी पेन्शन लाभार्थ्याला दिली जात आहे.

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला तसेच अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग, एड्स, कर्करोग, कुष्ठरोग, क्षयरोग यांसारख्या आजारांमुळे स्वतःचा चारितार्थ म्हणजे स्वतःचा खर्च चालू न शकणारे पुरुष व महिला तसेच निराधार विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या आहे सर्व प्रकारच्या महिला या योजनेमध्ये समाविष्ट आहेत.

तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला,तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी या सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे म्हणजे दीड हजार रुपये इतकी रक्कम प्रति महिना दिली जाणार आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर लाभार्थ्याचे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखालील पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे, आणि जर त्यांच्याकडे दारिद्र रेषेखालील नाव नसेल तर त्यांचे उत्पन्न हे म्हणजे त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 21 हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला तालुकास्तरावरील तहसील कार्यालयातून तुम्हाला 21 हजार रुपयांचा वार्षिक उत्पनाचा दाखला घेणे तहसीलदाराकडून घेणे गरजेचे तथा अनिवार्य आहे.

संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत मिळणारे दीड हजार रुपये अनुदान आता तीन हजार रुपये मिळणार?

मंडळी राज्यातील दिव्यांग वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना शासनाकडून मानधन हे दिले जाते दर महिन्याला दीड हजार रुपये इतके मानधन सध्या या लोकांना राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत मिळत आहे, हे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जाते परंतु काही दिव्यांग तसेच व वृद्ध व्यक्तींना बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे तथा या योजनेचे पैसे काढण्यासाठी खूप अडचणी येतात. तसेच मित्रांनो आजकालच्या महागाईच्या काळात पंधराशे रुपये यामध्ये उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पडत आहे. पंधराशे रुपये मिळणारे अनुदानामध्ये काहीच होत नाही म्हणून या अनुदानात वाढ करावी अशी मागणी राज्यातील लाभार्थ्यांकडून वारंवार केली जात होती.

म्हणूनच मित्रांनो या लाभार्थ्यांच्या दोन्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणजेच अनुदानात वाढ आणि बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यास अडचण या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी राज्यातील दिव्यांग वृद्धा आणि निराधारणा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या महिन्याला थेट पोस्टद्वारे घरपोच दिले जाणार आहे. अशी माहिती मंत्री हसनमुश्रीफ यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना सांगितलेले आहे, म्हणजे मंडळी राज्य शासनाकडून पोस्टमध्ये थेट पेमेंट जमा केले जाईन आणि त्या माध्यमातून त्यांना घरपोच या पैशाची तथा या योजनेमार्फत मिळणाऱ्या रकमेची थेट रोख स्वरूपात रक्कम लाभार्थ्याच्या हातामध्ये दिली जाईल.

त्याचबरोबर राज्यातील दिव्यांग वृद्ध व निराधार यांना विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेला होता, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसाह्यत रक्कम रुपये एक हजार रुपयांवरून पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. आणि डिसेंबर अखेर मानधन हे सर्वांना देण्यात आलेले देखील आहे. सध्या पंधराशे रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे मंत्री श्री हसनमुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतलेले आहे.

तसेच आता पोस्ट बँकेच्या मदतीने म्हणजेच पोस्ट ऑफिस च्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. आर्थिक निकषांचे मर्यादा देखील वाढवण्यात येईल व दिव्यांग, वृद्ध आणि निराधार यांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील असे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे.

संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत काही अटी आहेत ते आपण पाहूयात

 • अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
 • तसेच लाभार्थ्याची मुले 21 वर्षांची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत लाभार्थ्याला व मुलांना लाभ देण्यात येतील
 • लाभार्थ्यांच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 21 हजारापर्यंत असल्यास लाभार्थी योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होईल
 • या योजनेखाली लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या आपत्य संख्येची अट ही राहणार नाही
 • अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळवण्याकरता त्यांच्या एकत्रित कुटुंबाची उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी 21000 रुपयांपर्यंत असावे
 • शारीरिक छळवणूक झालेला किंवा बलात्कार झालेल्या अत्याचारी स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक व महिला बालविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील
 • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या अशा महिलेच्या वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाचे अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
 • तसेच अनाथ मुले-मुली म्हणजे आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहणारे मुले मुली यांना लाभ मिळेल
 • विधवा महिला म्हणजे ज्या स्त्रियांच्या पतीचे निधन झालेले आहे अशा स्त्रिया या योजनेअंतर्गत पात्र ठरतील
 • संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी जमीन आहे किंवा नाही याचा विचार न करता उत्पादन मर्यादा 21 हजार रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला लाभ मिळू शकतो
 • शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती विशेष सहायता या योजना अंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहणार नाही
 • तसेच एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार संपूर्णतः शासनाला राहतील.

संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूयात

 • विहित नमुन्यातील अर्ज
 • वयाचा दाखला- किमान 18 ते 65 वर्ष (18 पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ)
 • विधवा महिला अर्जदाराकर्ता पतीचा मृत्यूचा दाखला
 • दिव्यांग -जिल्हा शल्यचिकित्सांचा दिव्यांगत्त्वाचा दाखला आवश्यक (किमान 40% )
 • अनाथ मुलांसाठी (अनाथ दाखला)
 • दुर्धर आजार प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी.
 • दिव्यांग-कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 हजार रुपये
 • इतर सर्व लाभार्थ्यांकरता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21 हजार रुपये
या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा हे आपण पाहूयात
 • अर्जदार हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अशा दोन्ही प्रकारे करू शकतो
 • ऑफलाइन पद्धतीने अर्जदाराला अर्ज हा तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रा मध्ये सादर करावा लागेल

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावे व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.