मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु झाली,लवकरात लवकर अर्ज करा..

If you ask, the farm pond scheme has been restarted, apply as soon as possible..

If you ask, the farm pond scheme has been restarted, apply as soon as possible.. राम राम मंडळी राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व नफ्याची ठरावी, व शाश्वत व्हावी आणि राज्यातील शेतकरी सुखी व्हावा असं महाराष्ट्र शासनचं ध्येय तथा उदिष्ट्य आहे,आणि यासाठी राज्यात विविध योजना नियोजन पद्धतीने राबवल्या जातात, आणि आज आपण पाहणार आहोत, मागेल त्याला शेततळे या योजनेविषयी.

If you ask, the farm pond scheme has been restarted, apply as soon as possible..

मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु झाली आहे, मित्रांनो शेततळे शेतीसाठी एक शाश्वत सिंचनाचा स्त्रोत शेततळ्याच्या माध्यमातून एक बारमाही सिंचनाच साधन शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं आहे, शेतीबरोबरच शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून मच्छीपालन, शेळीपालन असे पूरक जोडधंदे देखील करत आहेत. आणि परिणामे शेतकरी सदन होण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत होत आहे, आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या शेततळ्यासाठी अनुदान किती दिले जाते, कागदपत्रे काय लागतात याच्या वेगवेगळ्या साईज अशी सगळी माहिती आपण आज पाहणार आहोत.

मित्रांनो राज्यात 2016 पासून मागेल त्याला शेततळे ही योजना राज्य मंत्रीमंडळाने सुरु केलेली आहे, ज्याच्या अंतर्गत 50 हजार रुपये राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळी दिली जात होती, एकात्मिक फलोत्पादन यांच्या अंतर्गत याचा समावेश करण्यात आला होता आणि याच बरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने मधी देखील याचा समावेश करून या शेततळ्याला आता जास्तीत जास्त 75 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो याच बाबी करिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, अशा प्रकारचं आव्हान आता कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे.

आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल ला अर्ज करावा लागतो. आणि याच्या वेगवेगळ्या प्रमाणानुसार वेगवेगळे अनुदान दिले जातात. आणि शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होणार आहे, आणि आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी व मार्च मध्ये शेततळ्याची कामे सुरु होतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाने अर्ज करावेत.

या योजनेमध्ये सात प्रकारच्या आकार मानाची शेततळी निश्चित करण्यात आलेली आहेत. आणि या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून सामुदायिक पणे शेततळ्याची मागणी करता येईल, आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती तसंच ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाईल.

कोणकोणत्या साईज मध्ये शेतकऱ्यांना शेततळे मिळेल पुढे आपण पाहुयात

यामध्ये 15×15×3 मीटर पासून ते जास्तीत जास्त 34×34×3 मीटर पर्यंत या शेततळ्याच्या साईज आपण घेऊ शकतो. आणि साधारणपणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून 10 गुंठयासाठी 30×30×3 मीटर किंवा 25×25×3 मीटर पर्यंतची साईज घेतली जाते. ज्याच्यासाठी अनुदान हे 75 हजार रुपये इतके आहे. जशी तुम्ही साईज छोटी घ्याल तसं अनुदान हे कमी होत, याच्यामध्ये 25 हजारापासून ते 75 हजारापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं जातं.

योजनेचे फायदे

  1. पावसाच्या पाण्यावरचे अवलंबन कमी होऊन सिंचनासाठी शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध होईल.
  2. शेतकऱ्यांना दुरून किंवा दुसरीकडून सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज भासणार नाही.
  3. पावसाच्या पिकावर अवलंबुन असलेल्या कोरडवाहू शेती पिकांचे नुकसान होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास चांगली मदत होईल.
  4. आणि या योजनेचे अनुदान थेट अर्जदाराच्या खात्यात जमा केले जाईल
  5. या योजनेमुळे शेतकरी समृद्ध व सुखी होईल.

लाभार्थी पात्रता

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी शेततळ्याच्या शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
  • ही योजना फक्त महाराष्ट्रातील मुळ रहिवासी शेतकऱ्यांसाठी आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन असावी.
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन ही शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. यामुळे पुनर्भरण करणे शक्य होईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • बँकेचे पासबुक
  • जातीचा दाखला
  • सातबारा व 8अ प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला, तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखला
  • व स्वतःच्या स्वाक्षरीत भरलेला अर्ज

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा, व Yojnajankalyankari.com या संकेत स्थळाला आवश्य भेट द्यावी, धन्यवाद.

Download PDF