ऊसाची शेती खरच परवडते का? खर्च लाखोंचा आणि उत्पन्न??

Cane farming really affordable? Costs of millions and income??

Cane farming really affordable? Costs of millions and income? राम राम मंडळी आज आपण पाहणार आहोत, महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने घेतले जाणारे पिक म्हणजे ऊस. ऊसाची शेती राज्यातील बर्याच जिल्ह्यात केली जाते, परंतु हि शेती शेतकऱ्यांना खरच परवडते का? खर्च लाखो रुपयांचा होतो आणि उत्पन्न किती हा प्रश्न कायम उभा राहतो चला तर मग आज पाहूयात खरच ऊसाची शेती परवडते का?

Cane farming really affordable? Costs of millions and income??

ऊसाची शेती खरंच परवडते का खर्च लाखोंचा आणि उत्पन्न? मंडळी शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेतात कोणती पिक लावले तरी ते बाजारात जाऊन विकेपर्यंत तथा त्याचा मोबदला शेतकऱ्याच्या हातापर्यंत येईपर्यंत बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. शेतकरी शेतामध्ये जेव्हा पीक लावतो तेव्हा त्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो ते म्हणजे एकदा पीक लावले तर त्याची पेरणी केली की मग त्याची योग्य निगा राखावी लागते त्याला पाणी खत हे वेळ सगळे वेळेवर द्यावे लागतील आणि त्यात जर पावसाने जडी मारली तर पिके आणि अवघडच आणि त्यात अवकाळीच संकट तर वेगळच भरपूर साऱ्या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

उसाच्या आडसाली लागणीचा पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम आता पूर्ण झाला आहे, तथा बऱ्यापैकी संपत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता त्याची बिल सुद्धा यायला सुरुवात होईल दहा टक्के रिकव्हरी ला 3150 रुपये प्रति टन या FRP सरकारने ठरवलेला आहे. त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पैसे सुद्धा येतात, पण खरंच शेतकऱ्याला एवढा दर हा परवडतो का? जो सरकारनी एफ आर पी ठरवलेला आहे त्याप्रमाणे कारखाने बिल देत नाहीत हा विषय ठाण मांडून उभा आहे, पण असो वर्षातून एक रकमी पैसे शेतकऱ्यांना उसाच्या पिकातून मिळतात म्हणून लोक उसाची शेती करतात. परंतु उसाचे उत्पादनासाठी लागणारा खर्च हा भयान वाढलेला आहे, त्याच्या तुलनेत दर मात्र काय काही वाढलेले नाही, हा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा चर्चेचा विषय आहे. आणि खरंच उसाचे उत्पादनातून शेतकऱ्याला नफा मिळतोय का का उगाच चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं होतंय हे पुढे पाहूयात.

हा खर्च प्रति एकर च्या हिशोबाने मांडलेला आहे

उसाच्या लागनीची सुरुवात होते शेत जमिनीच्या मशागतीपासून सगळ्यात पहिल्यांदा ऊस लावायचा म्हटलं तर त्याचे जमिनीची नांगरट करावी लागते, आता नांगरटीला ट्रॅक्टर वाला तीन ते चार हजार रुपये पर एकर तर घेतच असतो, त्यानंतर रोटर मारायला पण पाळी मारून सरी घालायला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये तरी लागतात अशा पद्धतीने सुरुवातीच्या मशागतीला साधारणता एकरी नाय म्हटलं तरी दहा हजार रुपये लागतात.

त्यानंतर विषय येतो खरोखरच्या लागणीचा औषधं,मजूर ऊस जर कांडी पद्धतीने लावला तर किमान दहा ते बारा रुपये किमतीच्या बियाणे चा तथा लागलीच बेन असतं. कांडी पद्धतीने एकरी तुम्हाला किमान 600 ते 700 रुपये रुपयाचा ऊस लागतो म्हणजे जवळजवळ सहा ते सात हजार रुपये तुम्हाला नुसतं लागणीचे बियाणे लागते, आणि याची लागण करायला देखील मजूर पाच ते सहा हजार रुपये घेतात. त्यात परत औषधाचा खर्च तीन हजार रुपये येतोच. म्हणजे कांडी पद्धतीने लावायचा म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार रुपये पर एकराचा खर्च लागणी चा फक्त येतो.

रोपण लावायची पद्धत म्हटलं तर एकरी सहा ते सात हजार रुपये रोप लागतात एक रोप साधारणतः अडीचशे तीन रुपयापर्यंत पडतं मजुरांकडून लावून ते मिळतं म्हणजे रोपाच्या नुसता लागण्याचा खर्च 20 ते 25 हजार रुपये प्रति एकर ला येतो, आणि त्यात शेतीचे संपूर्ण मशागत मिळून 35 हजारापर्यंत खर्च जातो फक्त एका लागणीचा.

त्यानंतर येतात आळवणी, मित्रांनो उसाची एका एकराच्या आळवणी नाय म्हणलं तरी तीन हजार रुपये वर जातील एकराच्या हिशोबाने सुरुवातीच्या टप्प्यात दोन आळवण्याचे झाले सहा हजार रुपये, आळवणे करून होतात तोपर्यंत रानामध्ये तन वाढते, ते खुरपून काढायला महिला मजुरांकडून तीन-चार हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर येतो बाळ भरणीचा डोस त्याला नाही म्हणलं तरी एकरी पाच हजार रुपये जातात, बाळभर करण्यास एकरी 15000 रुपये खर्च येतो, त्यानंतर येतात फवारणी एक फवारणी नाही म्हटलं तरी तीन-चार हजार रुपये खर्च येतो. चांगलं उत्पन्न जर पाहिजे असेल तर तीन-चार फवारण्या अशा कराव्याच लागतात.

पुढे मोठी भरणी होती त्या भरणीला देखील पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतोच, तथा तेवढी खतं प्रती एकराला टाकावीच लागतात, तिथे देखील ट्रॅक्टरचा ऊस बांधणीचा खर्च येतोच, त्यासाठी ट्रॅक्टरचा खर्च प्रति एकरी तीन ते चार हजार रुपये हा येतोच परत येतो तन नाशकाचा खर्च तन नाशकासाठी दोन-तीन फवारण्यासाठी तीन-चार हजार रुपये खर्च येतोच, त्यानंतर पुढचा एक खताचा डोस सहा ते सात हजार रुपयांचा टाकावा लागतोय. त्यानंतर पुढे उसाच्या अखेरच्या टप्प्यात युरिया पोटॅश अमोनियम सल्फेट अशी पाच ते सहा हजार रुपयाची खते ही भरावीच लागतात. यामध्ये आता विजेचे लाईट बिल आणि त्याचा येणारा इतर खर्च हा वेगळाच विषय आहे.

त्यामध्ये आता महावितरण ने लाईट आता रात्रीची ठेवलेली आहे, नाही म्हणलं तरी दोन ते तीन आठवडे लाईट ही रात्रीची असते. मग त्यासाठी शेतकऱ्याला रात्रीचे भिजवण्यासाठी जागाव लागत, रात्रीच्या वेळी शेतकऱ्याला भिजवण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते, तरी यामध्ये शंका तरी ठिबक सिंचनासाठी येणारा खर्च आपण धरलेला नाही, शेणखत जर घरचा असेल तर ठीक आहे नाहीतर तो अधिकचा खर्च आहे. ठिबक सिंचन जर आयएसआय मार्क असेल तर ते चार ते पाच वर्ष टिकत, परंतु त्याच्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावरती गुंतवावं लागतं.

मित्रांनो शेवटी असते उसाची तोडणी आणि उसाची तोडणी करून घेणे ही सर्वस्वी ज्या त्या कारखान्याची जबाबदारी असते. परंतु त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याकडेच बोट दाखवले जाते, अडचणीच्या ठिकाणी जर ऊस तोडणी असेल तर ऊसतोड कामगार शेतकऱ्याला जास्तीचे पैसे मागतात, त्यामध्ये ऊसाला तोड आणण्यासाठी स्लिप बॉय च्या कशात देखील पैसे घालावे लागतात ही बाब अत्यंत खरी आहे. परत ऊस तोडल्यानंतर ट्रॉलीमध्ये भरल्यानंतर जर ट्रॅक्टर अडकला तर तो काढण्यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टरचा टोचन चा खर्च तर वेगळाच.

अशा सर्व अडचणींवर मात करून शेवटी शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यावरती जात असतोय तो बी जात असताना मी परत ड्रायव्हरने काही जर उसाच्या मुळ्या जर विकल्या तर तो बहार देखील शेतकऱ्याच्या माथ्यावर येतो. अशा सगळ्या अडचणींवरती खर्च करून शेवटी शेतकऱ्याचा ऊस हा कारखान्यावरती जात असतो. त्यामध्ये अवकाळी पाऊस आणि दुष्काळ हा याच्यानंतर येणारा खर्च तर वेगळाच आह, त्यामध्ये ऊसाला जर पाणी नाही पुरलं तर उसाच्या टनेज 100% कमी होतंय.

आता या सगळ्याचा हिशोब तुम्हीच करा, एवढं सगळं करून 60-70 टन एवरेज निघते.या सगळ्याचा कालावधी 14 ते 15 महिने तर जातोच. ह्या सगळ्याचा हिशोब करून शेतकऱ्याची महिन्याची तरी मजुरी निघाली का बघा. उसाच बिल खात्यावर येत नाय तोच धपाधप सोसायट्या कट होऊन जात्यात, अन त्यात ट्रॅक्टरवाला, खतवाला या सगळ्यांची देणी देऊन शेतकऱ्याच्या हातामध्ये किती पैसे उरतात याचा हिशोब न केलेलाच बरा.

शेतकऱ्यांच्या पोरांचा शिक्षणाचा खर्च, दैनंदिन जीवन जगण्याचा खर्च हा खर्च तर शेतकऱ्यापुढे आ वासून उभा आहेच, मंग आता तुम्हीच सांगा मंडळी शेतकऱ्याला उसाची शेती खरंच परवडते का??

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र मंडळींना नक्कीच पाठवा व आमच्या Yojnajankalyankari.com https://yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला आवश्य भेट द्या धन्यवाद.