शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार?

Will farmers get a loan waiver?

Will farmers get a loan waiver? राम राम मंडळी राज्याचं हिवाळी अधिवेशन संपल्यापासून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बऱ्याच वर्तमानपत्रांमधून बातम्या छापून येत आहेत कि शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार आहे? चला तर मग मंडळी आपण पाहूयात शेतकऱ्यांना खरच कर्जमाफी मिळेल का?

Will farmers get a loan waiver?

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? मंडळी शेतकऱ्याचे जीवन हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा देखील म्हटला जातो आणि ते अगदी खरं आहे, परंतु दुष्काळ परिस्थिती अवकाळी पाऊस गोगलगायनचे संकट अशा विविध संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हवाली झालेला आहे तथा शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागत आहेत, आणि यामुळे कित्येक हजारो शेतकऱ्यांचं जनजीवन तथा कौटुंबिक जीवन विस्कळीत झालेला आहे, हे आपण वेळोवेळी तथा वास्तववादी परिस्थितीमध्ये पाहत आलेलो आहोत. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल ही माफक अपेक्षा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची राज्य शासना कडून असते, मंडळी आपण पाहत असतो, इलेक्शन जवळ आले की प्रत्येक राजकीय पक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणू,अशा पोकळ घोषणा देत असतं परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस तो राजकीय पक्ष सत्तेवर येतो त्यावेळेस या योजनांकडे दुर्लक्ष होते हे आपण प्रत्येक राज्यामध्ये पाहत आलेलो आहोत. जर निसर्गाने शेतकऱ्याला योग्य साथ दिली तर शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार नाही, तसेच शेतकरी जो पीक पिकवतो त्याला योग्य हमीभाव जर मिळाला तर शेतकऱ्याला कर्ज घेण्याची वेळच येणार नाही, परंतु ह्या दोन्हीही गोष्टी शेतकऱ्याच्या हातामध्ये राहिलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज माफ करण्याची वेळ तथा शेतकऱ्याला राज्य शासनाजवळ हात पसरावे लागतात.

गेल्या दोन-तीन दिवसापासून जसं राज्य विधानसभा अधिवेशन संपलेल आहे तसं वर्तमानपत्र मध्ये गेले दोन-तीन दिवस शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा बातम्या छापून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाच वातावरण निर्माण झालेलं आहे. तर काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून एकच विचारणा केली जाते की शेतकरी कर्जमाफी होणार का?

मंडळी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार या प्रश्नाचे दोन उत्तरे आहेत किंवा दोन बाजू आहेत, एक तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मंडळी महाराष्ट्र राज्य मध्ये सध्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान अवकाळी पावसामुळे झालेल आहे. शेतकरी वेळोवेळी अवकाळी पाऊस असेल तर तथा नैसर्गिक कोणतीही आपत्ती असेल याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान गेल्या काही वर्षांमध्ये होत आहे आपण पाहत आहोत. शेतकऱ्यांची घेतलेल्या पिक कर्ज आहे ते फेडण्याची सध्या शेतकऱ्याची ऐपत नाही तथा नैसर्गिक आपत्तीमुळे तो फेडू शकत नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहत आलेलो आहोत की महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2015 ते 2019 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली होती.

तसेच जे शेतकरी सातत्याने तथा नेहमी कर्ज भरत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्यात आलेल होत. आणि याच्यापूर्वी सुद्धा तथा 2015 पूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आलेली होती. आणि या कर्जमाफीसाठी देखील हजारो कोटी रुपये आतापर्यंत वाटण्यात आलेल आहेत. आणि इथून पुढे जे शेतकऱ्यांची कर्ज असेल त्या शेतकऱ्यांचा काय होणार याच्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य मध्ये दुष्काळी परिस्थितीसाठी सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली, आणि आता याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून तथा महायुती सरकारकडून काय निर्णय घेतला जातोय याच्याकडे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते तथा राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष होतं.

मंडळी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर घोषित केलेल्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. ज्याच्यामध्ये ज्या पहिल्या दिलेल्या कर्जमाफी आहेत, त्याच्या मध्ये शेतकऱ्यांना कशाप्रकारे कर्जमाफी देण्यात आली तसेच प्रोत्साहन पर अनुदान कशा प्रकारे देण्यात आले, शेतकऱ्यांना पिक विमा एक रुपयांमध्ये कशाप्रकारे दिला जातोय यामध्ये नैसर्गिक आपत्तीचे शेतकऱ्यांना किती रुपये यांच वाटप करण्यात येणार आहे, आदी योजनांबद्दल माहिती देण्यात आली, आणि मंडळी ही माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे माध्यमातून आणखीन एक सुत्वाच करण्यात आलेलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकरी काही त्रुटींमुळे कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्ज माफी होणार, साधारणपणे जो आकडा या माध्यमातून शासनाच्या मार्फत सांगितला जातोय तो सहा ते सात लाख शेतकऱ्यांपर्यंत असू शकतो. आणि याच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केली जाणार अशा प्रकारची कर्ज सुचवास त्यांच्या माध्यमातून तथा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आला.

मात्र मंडळी याच्यामध्ये नवीन असे काही नाहीये, राज्याचा अर्थसंकल्पी अधिवेशन ज्यावेळेस पार पाडले गेलं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हाच मुद्दा चर्चेसाठी मोठा ठरलेला होता. आणि हा मुद्दा चर्चेचा ठरल्यानंतर एक एप्रिल 2023 पासून हे पोर्टल पुन्हा एकदा सुरू करून शेतकऱ्यांना कर्जमाफी पुन्हा एकदा दिली जाणार अशा प्रकारची माहिती अधिवेशनामध्ये मंत्री महोदयाच्या माध्यमातून याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आता एक एप्रिल 2023 पासून डिसेंबर चा अखेरचा महिना संपत आलेला आहे, परंतु अद्याप देखील हे पोर्टल शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं नाही. आता या नऊ महिन्यांमध्ये पोर्टल न सुरू केलेल्या सहा ते सात लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.

मंडळी येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले आहेत. या पार्श्वभूमी वरती जर राहिलेल्या शेतकऱ्यांना असा काही लाभ देण्यात आला तर त्याचा देखील फायदा राज्य शासनाला होऊ शकतो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या काही शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होता, त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची याचिका दाखल होती, आणि त्या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि त्यांना साधारणपणे दीड ते दोन लाख रुपयांची जी थकीत कर्ज बाकी होती ती माफ करण्यात आली, याच पार्श्वभूमी वरती जर आपण पाहिलं तर याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेले आहेत तर याच्या विरोधात न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू आहे, या सगळ्या मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी तथा दिलासा द्यावा लागणार आहे.

म्हणून आता जी काय कर्ज माफी होणार आहे त्यामध्ये आता दुष्काळामध्ये बाधित झालेल्या तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नसून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी कर्जमाफी सांगण्यात येते ती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वंचित राहिलेल्या तथा त्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी असणार आहे, आता गेल्या एप्रिल 2023 पासून हे पोर्टल सुरू करण्याचे सांगितले जात आहे परंतु अद्याप देखील सुरू केले जात नाही. त्यामुळे हे पोर्टल ची प्रक्रिया कधी सुरू केली जाईल हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखा आहे.

त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तथा सर्व सामान्य नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती तथा कोणत्याही बातम्यांवरती पडताळणी करून विश्वास ठेवावा, आणि तसेच सध्या तरी जे वास्तविक जीवन आहेत तसेच जगावे. एकंदरीत आपण पाहिलं तर सध्या असलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना फोटोंना कुठेतरी दिलासा तथा आधार देणे गरजेचे आहे, मी याच्यामध्ये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी असतील यांना देखील दिलासा मिळणे गरजेचे आहे, आणि ज्या शेतकऱ्यांची कर्ज खरंच थकीत असतील आणि जे शेतकरी 2015 पासून या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असतील देखील या पार्श्वभूमीवरती तथा आलेल्या संकटांपासून दिलासा देणे गरजेचे आहे. शासनासो तथा केंद्र शासन असो या दोन्ही शासनाच्या माध्यमातून या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेज करून कर्जमाफी सारख्या योजनांचा लाभ देणे अत्यंत गरजेचे आहे तथा आवश्यक आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच पाठवावेत तसेच आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.