मोठी बातमी!! प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी महत्वपूर्ण निर्णय..

Big news!! Important decision for Pradhan Mantri Kusum Solar Pump Scheme..

Big news!! Important decision for Pradhan Mantri Kusum Solar Pump Scheme.. राम राम मंडळी शेतकऱ्यांसाठी राज्य तथा केंद्र शासन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना वेळोवेळी आमलात आणत असते. या योजनांपैकी महत्वाची योजना म्हणजे पीएम कुसुम सोलर पंप योजना या योजनेसाठी काल 18 डिसेंबर 2023 रोजी एक महत्व पूर्ण निर्णय घेण्यात आला, त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत..

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, पीएम कुसुम सोलर पंप योजना ही अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. आणि याच योजनेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आज 18 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे राज्यातील कुसुम सोलर पंप योजनेच्या कामाला गती मिळणार आहे, येत्या पाच वर्षांमध्ये पाच लाख सोलर पंप वितरित करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनामार्फत तथा केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. आणि राज्यामध्ये पीएम कुसुम सोलर पंपाच्या योजनेअंतर्गत या पंपांचा आस्थापित करण्याचे काम सुरू आहे, मित्रांनो 13 जानेवारी 2021 च्या शासन निर्णय नुसार राज्यांमध्ये एक लाख सोलर पंप महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख सोलर पंप उभा करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे, आणि या पाच वर्षातीलच सोलर पंप पैकी पहिल्या एक लाख सोलर पंपांच काम हे राज्यांमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे.

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अभियान (PM-KUSUM) योजना भारत सरकार द्वारे सुरू केलेले आहे या योजनेच्या माध्यमातून भारतामध्ये 2022 पर्यंत 30800 एम डब्ल्यू या अतिरिक्त सौर ऊर्जा तयार करण्याचा उद्देश आहे या योजनेच्या तीन तीन घटक आहेत पहिला घटक म्हणजे वैयक्तिक विद्युत प्रदान करण्यासाठी छोटे सोलर पावर प्लांट लागू करणे ज्याची क्षमता 500kkw ते दोन एम डब्लू असते. दुसरा घटक म्हणजे ऑफग्रेड क्षेत्रात सोलर पावरच्या कृषी पंपाची स्थापना करणे. आणि तिसरा म्हणजे ग्रीड कनेक्टेड कृषी पंपाची सोलरीकरण करणे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी समूह आणि पंचायत आणि सहकारी संस्था सोलार पंप लागू करण्यासाठी पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात, या योजनेतील शेतकऱ्यांना सरकारने 60% सबसिडी प्रदान करण्याची घोषणा केलेली आहे आणि लगतच 30% राज्य सरकार रुणाच्या रूपात देण्यात येणार आहे, शेतकऱ्यांना एकूण प्रकल्पाच्या 10% लगत ही फक्त शेतकऱ्यांनी द्यायची आहे. माध्यमाने तयार केलेली विधी शेतकऱ्यांना विकण्यासाठी उपलब्ध असेल वीज विकत घेण्यानंतर प्राप्त झालेले जे पैसे आहेत ते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

महाराष्ट्र राज्यकर्ता केंद्र शासनाकडून आतापर्यंत दोन लाख सोलर पंप आस्थापित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, आणि याच मंजुरी पैकी एक लाख तीन हजार आठशे सोलर पंपासाठी राज्य शासनाकडून कार्यादेश देखील देण्यात आलेले आहेत, याच्यापैकी 68,500 सोलर पंप आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत, ज्याच्या पैकी 58 हजार 230 सोलर पंप खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आणि उर्वरित दहा हजार दोनशे सोलर पंप हे मागासवर्गीय तथा अनुशासित जाती-जमातीतील लाभार्थ्यांसाठी उभा करण्यात आलेले आहेत. मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 339 कोटी 90 लाख रुपयांचा निधी हा अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे. ज्याच्या पैकी 100 कोटी तेरा लाख रुपयांचा निधी याच्या आधी राज्य शासनाच्या माध्यमातून महा ऊर्जाला वितरित करण्यात आलेला आहे. आणि आता याच योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या हिश्याच्या दहा टक्के निधी आहे हा राज्य शासनाच्या 10% हिशापोटीचा निधी 15 कोटी 68 लाख रुपये वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सिलेक्शन झालेले आहे, मोठ्या प्रमाणात सोलर पंपाचं सिलेक्शन झालेलं आहे. सोलर पंपांचा पेमेंट देखील झालेला आहे, वेंडर सिलेक्शन देखील झाला आहे लाभार्थ्यांचा सर्वे, जे जॉईंट सर्व आहेत ते देखील झालेले आहेत, परंतु बऱ्याच साऱ्या सोलर पंपांच्या माध्यमातून अद्याप देखील सोलर पंपांचा इन्स्टॉलेशन झालेले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कंपन्यांसाठी जी निधी वितरित करण्यात असतो, निर्णय घेण्यात आलेला आहे, यामुळे नीतीची उपलब्धता झाल्यामुळे कंपन्यांना त्यांचा हिस्सा मिळाल्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल तथा केली जातील, आणि एक लाख तीन हजाराचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे पुढील काही कालावधीनंतर या कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत उर्वरित पंपाच्या आस्थापीकरणाचे काम सुरू होईल, मित्रांनो एकंदरीत दोन लाख 25 हजार पंपांसाठी राज्य शासनाला तथापि मंजुरी मिळालेली आहे. आणि याच्यापैकी साधारणता एक लाख तीन हजार पंपांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची अपलोड करण्याची सर्व प्रक्रिया तथा कार्यादेश पूर्ण झालेले आहेत, साधारणपणे एक लाख 22 हजार सोलर पंपांची प्रक्रिया ही एक एप्रिल 2024 पासून सुरू होऊ शकते. आणि याच्यापुढील सुद्धा जे जे अपडेट आपल्याला मिळत जातील ते सुद्धा आपण आपल्या संकेतस्थळावरती जाणून घेऊ, परंतु तूर्तास सध्या ज्या शेतकऱ्यांना या सोलर पंपांसाठी अर्ज केलेले आहेत आणि तरी देखील त्यांचे पंप लागलेला नाही तथा पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यांना या शासन निर्णयाच्या माध्यमातून तथा निधीच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

 • या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी कृषी पंप किमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातींच्या लाभार्थ्यांसाठी पाच टक्के लाभार्थीस मिळतो.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यानंतर स्वखर्चाने इतर वीज उपकरणे तुम्ही लावता येण्याची सोय यामध्ये उपलब्ध आहे.
 • लाभार्थ्यांच्या तथा शेतकऱ्यांच्या क्षमतेनुसार तीन एचपी पाच एचपी साडेसात एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ति असणारे सोलर पंप तथा महा ऊर्जा सोलर पंप उपलब्ध होणार.
 • तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात तथा 34 जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज उपलब्ध तसेच सिंचन उपलब्ध होणार हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य या कुसुम सोलर पंप योजनेचे आहे.

PM KUSUM YOJANA DOCUMENTS 2023/24

 • आधार कार्ड प्रत
 • सातबारा उतारा ( विहीर तथा कुपनलिका शेतात असल्यास सातबारा उतारा वरती त्याची नोंद असणे आवश्यक आहे)
 • तसेच एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर बोगवडदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या मुद्रांक कागदावरती सादर करावे लागणार.
 • बँक पासबुक ची झेरॉक्स
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शेतजमीन विहीर तसेच पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर हिस्सेदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

कुसुम सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निवडीच्या काही अटी

 • ज्या शेतकऱ्याकडे तथा लाभार्थ्याकडे पहिले विज कनेक्शन उपलब्ध असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • ज्या शेतकऱ्याकडे शेततळे विहीर बोरवेल बारामाही पाण्याचा स्रोत उपलब्ध असेल असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • 2.5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास 3 एचपी डीसी 5 एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यास 5एचपी डीसी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याच्या 7.5
 • एचपी डीसी व अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध होतील
 • मुख्यमंत्री सौर कृषी योजना तसेच अटल सौर कृषी योजना या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही. वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला आवश्यक भेट द्यावी धन्यवाद.

शासन निर्णय