PM सुर्योदय योजना 2024

PM Suryoday Yojana 2024

PM Suryoday Yojana 2024 राम राम मंडळी 22 जानेवारीला आयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सोबत हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला, आणि त्याच दिवशी मा. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सुर्योदय योजनेची घोषणा केली, चला तर मग जाणून घेऊयात या संदर्भातील संपूर्ण माहिती..

PM Suryoday Yojana 2024

प्रधानमंत्री सूर्योदय योजना, मंडळी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम यांची अयोध्येमध्ये सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला मोठ्या थाटामध्ये प्रतिष्ठापना झाली, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत हजारो राम भक्तांनी या सोहळ्याचे विधी पूर्ण केले, आणि संपूर्ण देशामध्ये एक आनंदाची लाट असतानाच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी दिल्लीमध्ये परतताच एक आनंददायी अशी घोषणा केलेली आहे, देशातील जवळपास एक कोटी घर ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून उजळून निघणार आहेत, म्हणजे देशातील कोट्यावधी घरांवरती सौर ऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्यात येणार आहे,तसेच मंडळी ही योजना ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे.

मंडळी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर देशातील कोट्यावधी कुटुंबांसाठी वीज ही लाईफ टाईम फ्री स्वरूपात दिली जाणार आहे, या योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील जवळपास एक कोटींच्या घरा वरती सौर पॅनल हे बसवले जाणार आहेत, सौर पॅनल बसवलेल्या घरासाठी वीज निर्मिती तर होईलच, शिवाय त्या पॅनल मधून मिळणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेतून ही कमाई देखील करता येणार आहे, म्हणजे आपल्याला जी आपण जेवढी वीज वापरणार आहोत आणि जी वीज वापरून शिल्लक राहणार आहे ती वीज आपण विकू सुद्धा शकतो.

मंडळी आपल्या देशाला स्वातंत्र होऊन जवळपास 75 वर्षे पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे देशाचा अमृत महोत्सव काळ हा पूर्ण झालेला आहे, देशाचा अमृत काळ सुरू असताना अजूनही देशातील अनेक दुर्गम भागातील गावांमध्ये अद्यापही वीजपुरवठा होऊ न शकल्यामुळे आता अंधार असलेल्या भागांमध्ये या योजनेमुळे प्रकाशमय करण्यात येणार असलेला विश्वास आता व्यक्त होताना दिसत आहे. मित्रांनो या योजनेद्वारे कोणत्याही प्रकारची प्रदूषणाविणा घरगुती वीज तयार करण्याची निर्मिती ही शक्य होणार आहे. आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी केंद्र शासन हे अनुदाना स्वरूपात रक्कम म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे.

मंडळी आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांसाठी तीन किलो वॅट वीज ही फार होते म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांमध्ये टीव्ही ब्रिज फॅन याच्या व्यतिरिक्त अन्य काही वस्तू असतात त्यांना जास्त प्रमाणात वीज लागत नाही तुमचा जो विजेचा लोड असतो तो तीन किलो वॅट पर्यंत सफिशियंट असतो. तीन किलो वॅट मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरांमध्ये 360 युनिट हे जनरेट होतील. म्हणजे 360 युनिटमध्ये तुमचं घर हे प्रति महिन्याला चांगलं चालू शकतं. मंडळी पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत अशा स्वरूपाच्या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताच्या वापरात देशांमध्ये गुजरात प्रथम क्रमांक वर आहे तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. मंडळी लवकरच देशभरातील संपूर्ण प्रकारची घरे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची घरे ही या योजनेअंतर्गत वीज वापरामध्ये आत्मनिर्भर होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंडळी या योजनेअंतर्गत अखंड वीज पुरवठा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील अंधकार दूर होईल यात तीळ मात्र शंका नाही. आणि मग मित्रांनो तुम्ही वीज वापरून तुमची जी वीज शिल्लक राहील त्यातून तुम्ही ती वीज विकून कमाई देखील करू शकणार आहात.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती म्हणजेच एक्स मीडिया हँडल वरून पोस्ट करताना असं लिहिलं की आज आयोध्यातील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पला आणखी बळ मिळालेले आहे. भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूप-टॉप यंत्रणा असावी जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमी ऊर्जा मिळते आज आयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्प ला आणखी बळ मिळालं की भारतातील लोकांच्या घराच्या छतावरती स्वतःची सोलर रूप टॉप यंत्रणा होणार आहे.

तसेच या योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सोलर सिस्टिम बसविण्यात येणार आहेत या योजनेचा उद्देश घराघरात स्वस्तात वीज पोहोचवणे हे आहे, या योजनेमुळे गरीब व मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी करण्यास मदत होणार आहे तसेच देशात अद्यापही असे भाग आहेत जिथे घरांमध्ये अद्यापही वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळेच केंद्र सरकार आता प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत काळाकुट्ट अंधार असणाऱ्या घरात आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच या योजनेअंतर्गत कोट्यावधी घरे ही देखील उजळली जाणार आहेत.

मंडळी याच्या आधी देखील केंद्र शासनाने 2014 मध्ये रूफटॉफ सोलर प्रोग्रॅम हा सुरू केलेला होता आणि 2014 मध्ये केंद्र शासनाचा 2022 पर्यंत 40,000 mw सोलर क्षमता निर्माण करण्याचे लक्ष होतं. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट वरती असे सांगण्यात आलेले आहे की डिसेंबर 2023 पर्यंत देशामध्ये जवळजवळ 73.71 गीगावैट सौर ऊर्जा स्थापित क्षमता पोहोचलेली आहे, परंतु हे लक्ष होतं जे 2022 मध्ये पूर्ण करायचा होतं ते पूर्ण झाले नाही म्हणून आता सरकारने 2026 पर्यंत हे लक्ष पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे, विश्वउर्जा आऊट लुक यांच्या मान्यतेनुसार पुढील 30 वर्षांमध्ये भारतामध्ये जगाच्या तुलनेत सर्वात जास्त ऊर्जेची मागणी होऊ शकते, आणि त्याच मागणीनुसार भारत देश हा या विजेची पूर्तता करू शकतो. तसेच या योजनेमध्ये गुजरात, राजस्थान सोबत महाराष्ट्र देखील तितकाच सक्रिय आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत होणारे फायदे आपण पाहूयात

  • मित्रांनो सोलर पॅनल च्या साह्याने आपण घरीच वीज निर्मिती करू शकतो.
  • तसेच पावर ग्रिड करून मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत स्वस्त व सहज उपलब्ध होणार आहे
  • तसेच मंडळी सोलर पॅनल हा घराच्या छतावरती बसवता येत असल्यामुळे वेगळ्या जागेची गरज ही भासणार नाही.
  • तसेच मित्रांनो या सोलर पॅनलचे आयुष्य हे 25 वर्षाचे असल्यामुळे दुरुस्ती तसेच मेन्टनन्सची गरज पडणार नाही.
  • तसेच ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण देखील होत असतं.

पीएम सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूयात

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • विज बिल
  • बँकेचे पासबुक
  • राशन कार्ड
  • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक जो( आधार संलग्न असलेल्या बँक खात्याशी जोडलेला असावा)
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराचे आय प्रमाणपत्र (income certificate)

पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत असणाऱ्या अटी आपण खाली पाहुयात

  • अर्जदार हा भारताचा रहिवासी नागरिक असावा
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त नसावे
  • अर्जदार हा कोणत्याही सरकारी नोकरी वरती नसावा
  • अर्जदारांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता करून ते अपलोड करावे

मंडळी प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या घराघरांमध्ये वीज उपलब्ध होणारच आहे. परंतु या योजनेअंतर्गत घरातील वीज वापरून वीज शिल्लक राहिल्यानंतर ती विकून तुम्ही कमाई देखील करू शकता. या योजनेमुळे भारत देश हा वीज उपलब्ध मध्ये आत्मनिर्भर होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही.

मित्रांनो आता लोकसभेचे इलेक्शन जवळ आलेले आहे म्हणजे या इलेक्शनच्या आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यामुळे केंद्रशासन विविध प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाच्या फायद्याच्या योजना या अमलात आणत राहणार, तरी या सर्व योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत त्यांनी या योजनांचा फायदा घ्यावा हीच या आमच्या संकेतस्थळा द्वारे आपणास विनंती आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.