या 3 घरकुल योजना 2024

Or 3 Housing Scheme 2024

or 3 Housing scheme 2024 राम राम मंडळी केंद्रशासन व राज्यशासन यांच्या मार्फत सुरु केलेल्या मोदी आवास घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या तिन्ही योजनांविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात..

Or 3 Housing Scheme 2024

या 3 घरकुल योजना 2024, मंडळी आपलं स्वतःचं छोटंसं का होईना घर असावं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, परंतु या राज्यातील काही गरीब लोकांना हे घर बांधणे शक्य होत नाही म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून अशा गरजू व्यक्तींना घर आणि जागाही उपलब्ध करून दिली जाते. म्हणून मंडळी राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या तीन योजना ज्या सर्वसामान्य नागरिक व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या फायद्याचे आहेत. मग त्यामध्ये मोदी आवाज घरकुल योजना असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना असेल तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल अशा या तिन्ही योजना सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली अमलात आणलेल्या आहेत.

मोदी आवास घरकुल योजना

मंडळी प्रधानमंत्री आवास योजना ही योजना सर्वसामान्य नागरिकांना तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घर उपलब्ध करून देणारी ही सर्वसामान्यांच्या हिताची योजना आहे. ज्या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिक्षा यादी ही तयार केली जाते, 2018 ते 19 या आर्थिक वर्षांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना यादीचा ड यादी सर्वे करण्यात आलेला होता, आणि या ड यादीतून ऑटोमॅटिक अपात्र झालेले लाभार्थी तसेच ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी या लाभार्थ्यांसाठी प्रामुख्याने ही मोदी आवाज घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.

मोदी आवास योजना या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण खाली पाहुयात

 • ग्रामसभेचा ठराव
 • जातीचा दाखला
 • जागेचा उतारा /नमुना 8 अ
 • उत्पन्नाचा दाखला/ उत्पन्न 1.20 लाख रुपयांच्या आत पाहिजे
 • तसेच कच्चे घर किंवा बेघर असल्याचा दाखला
 • तसेच यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा

तसेच मंडळी मोदी आवास योजनेत निवड केलेला लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजनेत(PMAY) प्रतीक्षा यादी मध्ये हा समाविष्ट नसावा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना

मंडळी राज्य शासनाने राज्यातील धनगर समाजासाठी घरकुल उपलब्ध करून देणारी ही योजना म्हणजे अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना. धनगर समाजासाठी अत्यंत महत्त्वाची ही योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजासाठी घरकुल हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो राज्य शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शबरी घरकुल योजना रमाई आवास योजना इत्यादी घरकुल योजनांचा समावेश असतो.

मंडळी या योजनेच्या माध्यमातून 2.10 लाख रुपये इतके अनुदान हे लाभार्थ्याला दिले जाते, राज्यातील भटक्या जमातीच्या व विमुक्त जाती प्रवर्गातील नागरिकांचा विकास होऊन त्यांचं राहणीमान हे सुधराव याच पार्श्वभूमीवरती त्यांना जमीन उपलब्ध करून देऊन त्याच ठिकाणी त्यांना राहता घर उभा करून देण्यासाठी राज्य शासनाकडून अहिल्यादेवी घरकुल योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो मुक्त वसाहत योजना म्हणजे अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती जमातींच्या कुटुंबांना हक्काचं घर हे मिळून दिलं जातं आणि याच योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 20 कुटुंबांसाठी एक वस्ती ही तयार केली जाते. आणि तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा वीज पुरवठा रस्ते अशा प्रकारच्या विविध सुविधा त्या नवीन तयार केलेल्या वस्त्यांना पुरवल्या जातात.

या योजनेसाठी खालील कुटुंबांना प्रथम प्राधान्य दिले जाते
 • मंडळी या योजनेअंतर्गत पालात राहणाऱ्या कुटुंबांना प्रथम प्राधान्य दिले जाते
 • तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाला प्राधान्य दिले जाते
 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला त्याचप्रमाणे घरात कोणीही कामावर नाही अशा विधवा परित्य कत्त्या किंवा अपंग महिला पुरग्रस्त क्षेत्र बाधित लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ हा देण्यात येतो

तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या कुटुंबास प्रत्येकी पाच गुंठे जमीन देऊन त्या ठिकाणी 279 चौरस फूट चे घर बांधून दिले जाते, तसेच जी जागा शिल्लक राहते त्या जागेत लाभार्थी कुटुंबात शासकीय योजनेद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिले जाते. तसेच मंडळी लाभार्थ्यांना देण्यात आलेली जमीन ही त्याला विकता येत नाही किंवा भाडेतत्त्वावर देखील देता येत नाही. तसेच प्रत्येक वर्षी राज्यातील 34 जिल्ह्यातील म्हणजे (मुंबई व बृहन्मुंबई जिल्हा) वगळून प्रत्येक तीन गावांची निवड करून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ हा देण्यात येतो.

अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या ज्या अटी आहेत त्या आपण पाहूयात
 • अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे हक्काचं घर हे नसावं
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
 • अर्जदार कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे
 • अर्जदार हा सध्याच्या स्थितीमध्ये कच्च्या घरात किंवा झोपड्या मध्ये राहणारा असावा
 • या योजनेचा लाभ हा कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस मिळेल.
 • लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन किंवा जमीन नसलेला असावं
 • तसेच अर्जदाराने किंवा ज्या अर्ज केलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी हे यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा राज्य शासनाकडून हा लाभ घेतलेला नसावा.
 • तसेच मंडळी अहिल्यादेवी घरकुल योजना ही योजना फक्त राज्यातील ग्रामीण भागासाठीच लागू आहे
 • तसेच मित्रांनो लाभार्थी सहा महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी हा वास्तव्यास असावा
 • तसेच अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्जदार वैयक्तिक लाभ मिळू शकतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आपण खाली पाहुयात
 • जातीचा दाखला हा लागेल
 • जागेचा उतारा
 • उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा (1लाख रुपये पर्यंत)
 • जॉब कार्ड
 • शंभर रुपयाचे स्टॅम्प वरती प्रतिज्ञापत्र
 • आधार कार्ड
 • रहिवासी दाखला
 • बँकेचे पासबुक
 • ग्रामपंचायत स्थित भरलेली पावती
 • पासपोर्ट साईज फोटो -2

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे दाखल करावा

मंडळी अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबवली जात असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला भेट द्यावी लागेल, आणि तिथे जाऊन या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊन समाज कल्याण कार्यालयामध्ये सर्व आवश्यक कागदपत्र अर्ज हे सर्व दाखल करावे लागेल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

मंडळी भटक्या विविध जमातीतील लोक हे बऱ्याच वेळा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी या गावातून त्या गावांमध्ये स्थलांतर हे करत असतात. आशा आर्थिक दुर्लभ घटकातील लोकांसाठी राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही योजना अमलात आणली आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना या योजनेअंतर्गत घर बांधकामासाठी जागेची देखील उपलब्धता करून दिली जाते, तसेच घर बांधकामासाठी निधी देखील दिला जातो. या भटक्या विमुक्त जाती-जमातीतील लोकांना या योजने संदर्भात माहिती ही कमी स्वरूपात मिळते त्यामुळे या योजनेपासून या जाती जमातीतील अनेक नागरिक हे वंचित राहतात. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही योजना राबवली जाते. विमुक्त जाती व भटक्या जमाती विकासाच्या मूळ प्रवाहात याव्यात आणि त्यांचं राहणीमान सुधरावे तसेच त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी व त्यांचे उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

 • रहिवासी प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • भूमिहीन प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • बँक पासबुक

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेच्या अटी आपण पाहुयात

 • लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती भटक्या जमाती व मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे असावे
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.20 लाख रुपयाच्या आत मध्ये असावे
 • तसेच लाभार्थी कुटुंबाचे हे स्वतःचे घर नसावे.

मंडळी अशाप्रकारे मोदी आवाज घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या तिन्ही योजनांविषयी आज आपण सविस्तर रित्या माहिती जाणून घेतली, तर या तिन्ही योजनांमध्ये जे लाभार्थी पात्र असतील अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा ही आमच्या संकेतस्थळा द्वारे ही विनंती आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.