रोजगार संगम योजना 2024

Rozgar Sangam Yojana 2024

Rozgar Sangam Yojana 2024 राम राम मंडळी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार संगम योजना हि योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पाच हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे. चला तर मंडळी जाणून घेऊयात या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती..

Rozgar Sangam Yojana 2024

मंडळी आपल्या देशातील तरुणांनी शिक्षण तर घेतलेलं आहे परंतु त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेतलेलं आहे, त्या प्रत्येक करिअरमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा एवढे वाढलेले आहे, त्यामुळे प्रत्येकालाच नोकरी मिळेल असे शक्य नाही. म्हणूनच मंडळी केंद्रशासन व महाराष्ट्र राज्य शासन यांनी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार संगम योजना म्हणजेच महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ही योजना अमलात आणली आहे.

रोजगार संगम योजना या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार मुलांना प्रति महिने पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे, ही आर्थिक मदत याच्यासाठी दिली जाणार आहे की जेणेकरून बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल व नोकरी शोधण्यासाठी देखील मदत होईल, रोजगार संगम योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे आहे या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2020 ही योजना चालू सुरू केलेली आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मित्रांनो आपण पाहत आहोत मध्यंतरी तलाठी भरतीच्या जागा सुटल्या होत्या, जागा दहा हजार भरती करायच्यात आणि त्याच्यासाठी अर्जदारांनी अर्ज पाच लाख अर्ज केले होते,म्हणजे किती सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आहेत त्यावरून कळून येते. आणि याच्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तथा केंद्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, की महाराष्ट्र राज्यात तथा देशांमध्ये सुशिक्षित युवकांना रोजगार नाही त्यामुळे ते बेरोजगार आहेत या सर्वांच्या विचार करून शासनाद्वारे रोजगार संगम योजना ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जोपर्यंत बेरोजगार सुशिक्षित तरुणाला एखादी नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता हा दिला जाईल. या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना आत्म निर्भर बनवणे तसेच देशातील व राज्यातील युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधरवणे व राज्यातील युवकांना तसेच देशातील युवकांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

रोजगार संगम योजना या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे तसेच रोजगार संगम योजना या योजनेमुळे देशातील व राज्यातील सर्व युवकांना याचा आर्थिक फायदा हा होणार आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रतिमा 5000 रुपये याची आर्थिक मदती दिली जाणार असली तरी या योजनेचे आर्थिक मदत ती लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे जोपर्यंत सुशिक्षित बेरोजगार तरुणास म्हणजे युवकास नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याला बेरोजगारी भत्ता हा प्रदान केला जाईल आणि या योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक स्वतःचा दैनंदिन खर्च पूर्ण करू शकेल. तसेच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशाच्या साह्याने युवकास नवीन नोकरीसाठी प्रवास खर्च तसेच इतर खर्च तसे अर्ज भरण्यासाठी लागणारा खर्च यासाठी मदत होईल.

रोजगार संगम योजना या योजनेद्वारे राज्यातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच राज्यातील तसे देशातील स्थानिक स्तरावर महिलांना नोकरी उपलब्ध करून देणे व कौशल्य नसणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे हे या योजनेचे देखील उद्दिष्ट आहे.

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध नाहीत आणि जरी उपलब्ध असले तरी त्या मिळवणे अशक्य आहे, कारण आता या नोकऱ्यांमध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे तर खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे त्यामुळे युवकांना सहजासहजी नोकरी मिळवणे खूप अवघड आहे. आणि आता याच कारणांमुळे महाराष्ट्रातील सुशिक्षित युवक हे बेरोजगार आहेत तसेच राज्यातील बहुतांश परिवार हे गरीब तसेच दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असल्यामुळे अशा परिवारातील बेरोजगार युवकांना इच्छा असून देखील सुद्धा आर्थिक पैशाच्या अडचणींमुळे स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय किंवा धंदा सुरू करू शकत नाहीत. त्यामध्येच घरातील सर्व जबाबदारी या युवकांच्या खांद्यावर असल्या कारणांमुळे त्यात त्यांना नोकरी नसल्यामुळे त्यांना मानसिक त्रास देखील भरपूर होतो. तथा हा त्रास खूप सहन करावा लागतो, आणि या सर्वच गोष्टींचा सारंसार विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि आणि युवकांच्या समाधानामध्ये भर घालणारा निर्णय घेतलेला आहे.

रोजगार संगम योजना या योजनेच्या काही अटी आपण पाहुयात

 • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन असता कामा नये
 • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 20 वर्षापासून ते 35 वर्षे दरम्यान इतके असणे आवश्यक आहे
 • लाभार्थ्याचे नाव एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे
 • अर्ज करणारी व्यक्ती कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे फार महत्वाचे आहे तथा आवश्यक आहे
 • तसेच मित्रांनो अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या वरती नसावे
 • तसेच मंडळी या योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात कार्यरत नसावी ( अर्जदार हा बेरोजगार असावा)

रोजगार संगम योजना या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपण पाहूयात

 • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराकडे स्वतःचे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे
 • रहिवासी दाखला
 • अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
 • अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला( वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे )
 • अर्जदाराच्या शिक्षणाचा दाखला (किमान बारावी उत्तीर्ण)
 • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे ( बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असल्या अत्यंत आवश्यक आहे)
 • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
 • अर्जदाराचा ईमेल आयडी
 • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे एखादा कोर्स पूर्ण केल्या असल्याची डिग्री (प्रमाणपत्र) असता कामा नये असे आढळल्यास त्याचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

रोजगार संगम योजना या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ते आपण पाहूयात

रोजगार संगम योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज दराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा

अर्जदाराने सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

अशा पद्धतीने मंडळी आपण या योजनेअंतर्गत ज्या अटी शर्ती आणि ज्या लाभार्थी पात्रता दिली आहेत त्या पद्धतीने आपण या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो तसेच या योजनेचा फायदा घेऊ शकतो, रोजगार संगम योजना 2024 या योजनेचा फायदा राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा, ही या संकेतस्थळाद्वारे आपणास विनंती आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी महिलांचे हितासाठी तरुणांच्या हितासाठी कायम अमलात आणत असते आणि या योजनेची माहिती आपणास वेळोवेळी देणे हे आमच्या संकेतस्थळा द्वारे आम्ही आपणासमोर सादर करत असतो. आता फेब्रुवारी महिन्यानंतर लोकसभेचे देखील इलेक्शन हे लागू शकते त्यामुळे अजून भरपूर प्रमाणात राज्य शासन व केंद्रशासन हे या भरपूर योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अमलात आणू शकतात तरी या सर्व योजनांचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा एवढीच विनंती.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.