स्मार्ट मीटर मुळे नागरिकांच्या खिशाला लागणार कात्री?

Will smart meters hit citizens’ pockets?

Will smart meters hit citizens’ pockets? राम राम मंडळी, राज्यामध्ये आता जानेवारी महिन्यापासून प्रीपेड स्मार्ट मीटर बसणार आहेत. आदानीसोबत तीन कंपन्यांना याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे, प्रीपेड स्मार्ट मीटर नागरिकांसाठी फायद्याचे कि तोट्याचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

Will smart meters hit citizens’ pockets?

स्मार्ट मीटर मुळे खरंच नागरिकांच्या खिशाला कात्री लागेल का? मध्यंतरी कोरोना काळात अधिक बिल वसुली झाल्याची तक्रार संपूर्ण राज्यांमधून येत होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिल देखील भरलं नव्हतं, त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने तथा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ही योजना तब्बल 26 हजार 923 कोटी रुपयांची आहे त्यामुळे महावितरण ची आर्थिक स्थिती सुधारू शकते. रीडिंग, बिल छपाई व वाटप बंद होणार आहे महावितरणला आगाऊ पैसे येणार असल्यामुळे थकबाकी देखील कमी होणार आहे.

पहिले प्रत्येकाच्या घरात गोल चकते असलेल्या मीटर होता त्यानंतर महावितरणने नव्याने डिजिटल मीटर लावले सध्या दर महिन्याला रीडिंगघेणे, त्याप्रमाणे बिल वितरित करणे आणि आलेल्या बिलाचे पैसे ऑनलाईन किंवा छापील बिलाच्या माध्यमातून बँकेमध्ये भरणे. असे चालू आहे, अशा प्रकारे महावितरणचे अर्थकरण चालते त्यामध्ये काही ग्राहकांचे रीडिंग न होणे, रीडिंग झाले तरी बिल वेळेवर न येणे बिल वेळेवर मिळाले तरी ते ग्राहकांनी ते वेळेवर न भरणे यामुळे महावितरण वर थकबाकीचा डोंगर उभा राहिलेला आहे.

महावितरण च्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी नव्या वर्षांमध्ये तुमचे विजेचे मीटर बदलण्यात येणार आहेत,ग्राहकांसाठी महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. सध्याच्या पद्धतीमध्ये वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचा रीडिंग घेतल्या जातात आणि त्यानुसार बिल पाठवले जातात. मात्र आता प्रीपेड मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज प्रमाणे करावं लागणार आहे. विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच ग्राहकांचा वीज वापरण्याचा खर्च निश्चित करण्यासाठी हे नवे मीटर बसवले जाणार आहेत,जानेवारीपासून हे मीटर बसवण्यात येतील महावितरणच्या 41 लाख ग्राहकांपर्यंत मीटर पुरवण्यासाठी दोन वर्षाहून अधिक काळ लागणार आहे.

स्मार्ट मीटरचा निर्णय का घेण्यात आला? एबनॉर्मल बिलिंग, फॉल्टी बिलिंग,सरासरी बिलिंग, मीटर मिसिंग अशा बिलिंग बाबतीत असंख्य तक्रारी दर महा येत असतात, या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरण महावितरण आणि अन्य खाजगी कंपन्यांना व त्या कर्मचाऱ्यांना बराच वेळ द्यावा लागतो. अनेकदा वाद विवाद देखील होतात. एकदा बिलाचा विस्फोट झाला की बिल ग्राहक वीज भरायला उदासीनता तथा कंटाळा करतात. यामुळे महावितरणची व खाजगी कंपन्यांची थकबाकी वाढत जाते,परिणामी वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे राज्य शासनाने स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे.

स्मार्ट मीटर चे फायदे

मीटर रिडींग, बिल छपाई, बिल वाटप या कार्यपद्धतीला जवळजवळ आठवड्याचा कालावधी जातो, तिथून पुढं ग्राहकाला 15 दिवसांचा कालावधी वीज बिल भरण्यासाठी दिला जातो. मागचे बिल भरेपर्यंत पुढच्या महिन्याचे बिलिंग सुरु झालेले असते त्यामुळे प्रिपेड स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाला आगाऊ पैसे भरावे लागणार आहे, महावितरणची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मनुष्याबळावरील होणारा खर्च कमी होणार आहे. कंपनी सर्वांना स्मार्ट मीटर बसवून स्मार्ट ग्राहकांच्या श्रेणित बसवणार आहे. पुढील 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. व हे काम खाजगी कंत्राटदारांकडून पूर्ण करण्यात येणार आहे.

स्मार्ट मीटर चे तोटे

प्रीपेड स्मार्ट मीटर ही योजना मनुष्यबळ कमी करणारी योजना आहे, यामुळे तरुण वर्गामध्ये होणारी रोजगार ची उपलब्धता कमी होणार आहे. विज बिल भरणा विज बिल वितरण विज बिल छपाई या सर्व कामांवर कामाला असणारे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे, यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारांची संख्या मध्ये वाढ होणार आहे.

स्मार्ट मीटर नेमकं कसं काम करणार?

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याला तात्काळ रिचार्ज करावा लागणार आहे. प्रीपेड मोबाईल प्रमाणे किंवा डीटीएच प्रमाणे अगोदर पैसे भरणे व नंतर वापर करणे याप्रमाणे प्रीपेड स्मार्ट मीटरचे काम असणार आहे, पैसे भरून रिचार्ज केल्यानंतर रिचार्ज रकमेच्या वीज वापरानंतर रिचार्ज रक्कम संपली तर वीज पुरवठा आपोआप बंद होईल, पुन्हा रिचार्ज केल्यानंतर तो आपोआप सुरू देखील होईल, रिचार्ज रक्कम संपण्याआधी ग्राहक मोबाईल रजिस्टर केलेला आहे. त्याच्यावरती संबंधित संदेश मिळेल, मोबाईल द्वारे देखील रिचार्ज करता येईल, त्यानुसार ग्राहकांनी जागरूक राहून नियोजनपूर्वक रिचार्ज करून ठेवावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा, व आमच्या Yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या, धन्यवाद..