ठरलं!! नवीन वर्षासाठी सरकारकडून या नवीन घोषणा..

Fixed!! These new announcements from the government for the new year..

Fixed!! These new announcements from the government for the new year.. राम राम मंडळी,1 जानेवारी 2024 पासून म्हणजेच नवीन वर्षापासून देशात होणार आहेत हे 5 मोठे बदल, 29 नोव्हेंबर रोजी जी बैठक केंद्र सरकारची झालेली आहे, त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्या बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत

Fixed!! These new announcements from the government for the new year..

नवीन वर्षासाठी सरकारकडून या योजनांची मोठी घोषणा होणार आहे, अशी माहिती प्रसारण मंत्र्यांनी दिलेली आहे, 31 डिसेंबर नंतर काही योजना त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. कारण की 2024 मध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन लागणार आहे त्याच्या धरतीवर ती सरकारने तब्बल 81 कोटी नागरिकांना लाभ मिळतील असे काही निर्णय घेतलेले आहेत,याबरोबरच ग्रामीण महिलांना महिन्याला 15000 रुपये कमावण्याची संधी सुद्धा एक जानेवारी 2024 नंतर मिळणार आहे, नवीन योजना ज्या 1 जानेवारी नंतर सुरू होणार आहेतच त्याचबरोबर ज्या लोकांना घर बांधायचे आहे त्यांना देखील सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फायदा होणार आहे, याबरोबरच महागाई देखील भरपूर वाढलेली आहे ती देखील कमी करण्यासाठी सरकार मोठ्या प्रयत्नामध्ये आहे. याबरोबरच जे लघु व्यवसाय काय आहेत त्यांच्यासाठी अत्यंत कमी व्याजदरामध्ये रक्कम उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे, चला तर मग आज आपण पाहूयात कोणते कोणते योजना सरकार 2024 मध्ये अमलात आणणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा

1 जानेवारी 2024 नंतर ही जी विकसित भारत संकल्प यात्रा चालू होणार आहे, योजना अशासाठी आहे तुम्हाला केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती व्हावी यासाठी ही योजना अमलात आणलेली आहे. केंद्र शासनाने इथून मागे भरपूर योजना अमलात आणल्या परंतु त्या नागरिकांपर्यंत त्याची माहिती पोहोचत नव्हती, त्यासाठी विकसित वारस संघ संकल्प यात्रे मार्फत सरकारमधल्या सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचे ट्रायल दोन जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेले आहे, आणि ही यात्रा पूर्ण भारतभर फिरवण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे वाहन देण्यात येणार आहेत ज्याच्या मार्फत देशभर विविध शहरांची माहिती देणे त्याची जाहिरात करणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असा देखील संकल्प आहे की येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये जवळपास दोन लाख 70 हजार ग्रामपंचायतीवर व पंधरा हजार शहरी भागांमध्ये सरकारने जेवढ्या योजना अमलात आणल्या त्यातल्या प्रत्येक योजनेची माहिती ही तळागाळातल्या नागरिकांपर्यंत व पात्र नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. व जे नागरिक पात्र होतील तथा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना असतील त्या योजना पासून सर्वसामान्य नागरिक हा वंचित राहिला नाही पाहिजे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देखील मोठे बदल?

ज्या लोकांना घर बांधायचे आहे शहरांमध्ये जी लोक भाड्याच्या घरामध्ये राहतात, चाळीमध्ये किंवा अनधिकृत वस्तीमध्ये राहतात. तर अशा लोकांना याचा मोठा लाभ होणार आहे. जर त्यांना स्वतःचे घर बांधायचे असेल तर त्यांना केंद्र सरकार हे व्याजदरामध्ये मोठी सवलत देणारच आहे, तसेच मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज देण्याचे सुद्धा मदत करणार आहे, आणि त्यामुळे जन्मा शहरांमध्ये घर बांधायचे आहे त्यांना सरकारकडून देखील मदत होणार आहे, याकरिताची पूर्वी प्रधानमंत्री आवास योजना होती यामध्ये देखील विशेष बदल करण्यात आलेले आहेत

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

या योजनेचा फायदा भारतातील सर्व रेशन कार्डधारकांना होणार आहे. देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 29 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएमजी के वाय या योजनेला पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या मंजुरीचा निर्णय त्याच बैठकीत झालेला असून याची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा 81 कोटी भारतीय नागरिकांना होणार आहे. पी एम जी के वाय म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही योजना कोरोनाच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली होती, जी की मोफत राशन देणारी योजना होती, तर या योजनेमध्ये एक जानेवारी 2024 पासून असा बदल होईल की ही योजना जवळपास पाच वर्षासाठी चालू राहणार आहे, 31 डिसेंबर 2019 पर्यंत सर्व नागरिकांना लाभ घेता येणार आहे, या योजनेमध्ये 81 कोटी भारतीय नागरिकांना पाच किलो राशन हे मोफत स्वरूपात दिले जाणार आहे.

ड्रोन सखी योजना

ही योजना महिलांना प्रति महिना 15 हजार रुपये मिळवून देणारी योजना आहे, या योजनेचे नाव ड्रोन सखी योजना असा आहे. या योजनेअंतर्गत भारतातील सर्व महिलांना तथा बचत गटा अंतर्गत सर्व महिलांना ड्रोन उडवण्याच्या ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या ड्रोनद्वारे शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केली जाणार असून या योजनेमार्फत महिलांना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेवर केंद्र शासनाचा जो नियोजित खर्च आहे तो 1261 कोटी रुपये सरकार याच्यामध्ये खर्च करणार आहे.

लघु व्यवसायिकांसाठी मोठी घोषणा?

देशामध्ये जे काही लघु व्यवसायिक आहेत, म्हणजे जे व्यवसायिक भाजीपाल्याचे व्यवसाय करतात फर्निचरचा व्यवसाय करतात किरणामालाचा व्यवसाय करतात इलेक्ट्रॉनिक चा व्यवसाय करतात जे छोट्या स्तरावरील लघुवव्यवसायिक आहेत, यांना भरपूर वेळा भांडवलाची गरज भासते, कमी कालावधीसाठी भांडवलाची गरज भासते बऱ्याच वेळा यांचा प्रोजेक्ट मोठा नसल्यामुळे बँक कर्ज देत नाहीत आणि जर जरी कर्ज दिले तरी मोठ्या प्रमाणामध्ये व्याजाची तथा कर्जाची रक्कम वसूल करत असतात. यामुळे सरकारने एक जानेवारी 2024 पासून जे लघु व्यावसायिक आहेत यांच्यासाठी भांडवला साठी अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्यामुळे ॲमेझॉन flipkart यांसारख्या ज्या काही ई-कॉमर्स वेबसाईट आहेत यांच्यामुळे त्यांचं जे काही नुकसान होणार होतं याला देखील थोड्या प्रमाणात आळा बसण्यात येईल. याव्यतिरिक्त त्यांचं जे लायसन आहे त्या माध्यमातून फूड लायसन असू द्या शॉप लायसन असू द्या अशा प्रकारचे लायसन त्याला लागत असते त्याची देखील प्रक्रिया सुलभ करून देण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त असे देखील सूत्रांकडून समजते आहे की पेट्रोल डिझेलचे दर देखील कमी होणार आहेत. या व्यतिरिक्त सरकार महागाई बद्दल देखील जो काही महागाई वाढलेला आहे तो दर देखील कमी करण्यामध्ये प्रयत्नशील आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा व आमच्या yojnajankalyankari.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या, धन्यवाद.