आता यांनाही मिळणार घरकुल, मोदी आवास घरकुल योजना

Modi Awas Housing Scheme

Modi Awas Housing Scheme राम राम मंडळी मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना ह्या कायम आमलात येतायेत हे आपण पाहत आहोत,आणि त्याच माध्यमातून मोदी आवास घरकुल योजना हि योजना आमलात आणली आहे, चला तर जाणून घेऊयात या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती.

Modi Awas Housing Scheme

आता यांनाही मिळणार घरकुल मोदी आवास घरकुल योजना, मंडळी राज्यातील तथा देशातील ओबीसी प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे आपले स्वतःची घरे नाही जे नागरिक पडक्या घरामध्ये राहत आहेत तसेच कुडाच्या घरामध्ये राहत आहेत अशा सर्व नागरिकांना घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 28 जुलै 2023 रोजी राज्यामध्ये मोदी आवास घरकुल योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये येत्या चार वर्षांमध्ये 12000 कोटी रुपये खर्च करून जवळपास दहा हजार घरं ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत, आणि ज्याच्यासाठी 2023 24 या वर्षांमध्ये जवळपास तीन लाख घरे इतकी घर उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास 3600 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे.

मंडळी आपण जर पाहिलं तर मोदी आवाज घरकुल योजना या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना घर ही उपलब्ध करून दिली जात आहेत तथा घर हे बांधून दिली जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर 27 सप्टेंबर 203 च्या जीआर नुसार इतर मागास प्रवर्गासोबतच राज्यातील विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल उपलब्ध करून दिली जाणार आहेत, याच्यानंतरही राज्यातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून इतर जाती-जमातींचा देखील समावेश केला जावा अशाप्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जात होती आणि आता याच पार्श्वभूमीवरती आता 30 जानेवारी 2024 रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करून मोदी आवास घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गाचा देखील समावेश हा करण्यात आलेला आहे.

मंडळी आपण एकंदरीत जर पाहिलं तर विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील जे काही नागरिक असतील ते उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणावरती इतर भागांमध्ये ते स्थलांतर करीत असतात, या प्रवर्गातील नागरिकांकडे स्वतःची घरे नसतात ते पालावरती कुडामध्ये इतर भागांमध्ये स्थलांतर करतात आणि तिथे राहतात. आणि आता याच पार्श्वभूमीवरती या भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील नागरिकांना देखील घरे उपलब्ध व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून भरपूर मोठ्या प्रमाणावरती मागणी होत होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता या नागरिकांचा या योजनेमध्ये म्हणजेच मोदी आवाज घरकुल योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महोदयांनी दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याच्या सन 2023 24 करिताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवाज घरकुल योजना सुरू करण्यात येईल या योजनेसाठी येत्या तीन वर्षात 12000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील यापैकी तीन लाख घरे 3600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती, आणि त्याच अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख गरिबांसाठी मोदी आवाज घरकुल योजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव 21/07/2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांना 28/07/2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

तथापि विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा यापूर्वी सन 2021 22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय वित्तमंत्री महोदयांनी घरकुले प्रस्तावित केली होती त्यामुळे सदर प्रवर्गासहित घरकुल आवश्यक आहेत त्या अनुषंगाने विशेष मागास प्रवर्गातील घरकुलस पात्र कुटुंबांचा समावेश मुद्दे आवाज घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब ही शासनाच्या विचारांमध्ये तथा विचारधीन होती.

मंडळी आपण पाहिलं असेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही सर्वसामान्य नागरिकांना घर उपलब्ध करून देणारी योजना आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील नागरिकांची प्रतिक्षा यादी तयार केली जाते. मंडळी तसेच 2018 19 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा ड यादीचा सर्वे हा करण्यात आलेला होता, आणि या ड यादीतून ऑटोमॅटिक अपात्र झालेले लाभार्थी तसेच ओबीसी प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी मोदी आवाज घरकुल योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

मित्रांनो सर्वांसाठी घरे 2024 हे राज्य शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुलयुक्त करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजना अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिले याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियमा अनुकूल करणे शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांची निवड सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2011अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीनुसार राज्यातील कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी व छाननी करून ग्रामसभेमार्फत व वर्गनिहाय कायमस्वरूपी प्रतिष्ठा यादी तयार करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र राज्यात कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये अनुसूचित जाती 1 लाख 33 हजार 536 अनुसूचित जमाती 33 हजार 678 अल्पसंख्यांक 37 हजार 982 व इतर पाच लाख 62 हजार 873 असे एकूण दहा लाख 65 हजार 69 इतके लाभार्थी आहेत सन 2016 ते 17 ते 20 ते 21 या कालावधीत सदर कायमस्वरूपी प्रतिष्ठा यादी संपुष्टात आलेली आहे. तसेच सामाजिक व आर्थिक जात सर्वेक्षण 2011 मध्ये तसेच प्राधान्यक्रम यादीमध्ये जी कुटुंब समाविष्ट नव्हती अशा पात्र कुटुंबांसाठी सप्टेंबर 2018 ते मार्च 2019 या कालावधीत आवास प्लस सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये 42 लाख 17122 इतकी पात्र कुटुंबांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असून त्यापैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील बारा लाख 21 हजार 60 अल्पसंख्यांक मधील 91 हजार 583 व इतर 29 लाख 479 इतके लाभार्थी आहेत सन 2021-22 मध्ये आवाज प्लस मधील लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यासाठी 391,921 इतकी उद्दिष्ट प्राप्त झाली आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील 2,35,153 व अल्पसंख्यांक व सर्वसाधारण प्रवर्गातील जमातींसाठी एक लाख 56 हजार 768 एवढे उद्दिष्ट आहे. असे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मंडळी राज्य शासनाच्या माध्यमातून येथे तीन वर्षांमध्ये दहा लाख घरकुलांचे उद्दिष्ट घेऊन सुरू करण्यात आलेली मोदी घरकुल आवास ही योजना या योजने संदर्भातील सर्विस सविस्तर अशी माहिती आज आपण आपल्या संकेतस्थळामार्फत पाहिली. मंडळी केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वांसाठी घरे हे अभियान राबवले जात आहे आणि त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. आणि त्यामध्येही काही लाभार्थ्या आहेत की त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही, एस सी प्रवर्गातील लाभ लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजना, एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शबरी आवास योजना त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील लोकांसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजना या योजना राबवल्या जातात, परंतु ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची योजना ही राबवली जात नव्हती म्हणून याच अनुषंगाने इयत्ता तीन वर्षांमध्ये दहा लाख घरकुलांचे उद्दिष्ट घेऊन मोदी आवास घरकुल योजना ही योजना राबवण्यात येत आहे. तथा या योजनेला मंजुरी ही देण्यात आलेली आहे.

मोदी आवाज घरकुल योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आपण खाली पाहुयात

  • ग्रामसभेचा ठराव
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला/ उत्पन्न 1.20 लाख रुपयांच्या आत पाहिजे
  • जागेचा उतारा नमुना/8अ
  • तसेच कच्चे घर किंवा बेघर असल्याचा दाखला
  • तसेच यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • मित्रांनो तसेच मोदी आवास योजनेत(PMAY) निवड केलेला लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजनेत प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी, व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.