मिनी ट्रॅक्टर योजना 90 टक्के अनुदानावर

Mini tractor scheme at 90% subsidy

Mini tractor scheme at 90% subsidy राम राम मंडळी महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्याकरता रुपये 3.15 लाखाची आर्थिक मदत केली जाते तरी या संदर्भातील सर्व अटी व शर्ती व पात्रता आपण पुढे पाहूयात..

Mini tractor scheme at 90% subsidy

मिनी ट्रॅक्टर योजना आता 90% अनुदानावर, मंडळी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर योजना या अमलात आणल्या जातात, आणि आता याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ज्याच्यामध्ये कल्टीवेटर, रोटावेटर, टेलर अशा प्रकारची साधने व या साधनांचा पुरवठा केला जातो. त्याच्यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ही साधने खरेदी करण्याकरता 90 टक्के अर्थात जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्याचा दिले जाते.

मंडळी याच्यासाठीच वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या मार्फत वेळोवेळी या जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज हे मागविले जात आहेत, आणि अशाच प्रकारच्या जाहिराती आता वेळोवेळी आपल्याला वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दिसत आहेत. समाजातील विविध घटक आणि शेतीसाठी राज्य सरकारच्या अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून घटकांचे विविध आर्थिक व सामाजिक जीवन उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये अनेक योजनांच्या साह्याने अनुदान देण्यात येते व त्या समाज घटकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरता प्रयत्न केले जातात कृषी क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरण होऊ लागले असून या यंत्रणांमध्ये ट्रॅक्टरचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असताना आपण पाहत आहोत, पूर्वी बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत केली जायची, कारण पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे बैलांच्या साह्याने शेती केली जायची मजुरांच्या साह्याने शेती केली जायची, परंतु आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे ट्रॅक्टर च्या साह्याने आता शेती केली जाते. तथा ट्रॅक्टर शिवाय आता शेती केली जातच नाही ट्रॅक्टर असल्याशिवाय शेती सुद्धा होत नाही असा शेतकऱ्यांचा भ्रम झालेला आहे. म्हणजे ट्रॅक्टर हा एक प्रकारचा शेतकऱ्याचा मित्रच बनलेला आहे.

परंतु जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर किंमत जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही म्हणून इच्छा असताना देखील अनेक ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही, ट्रॅक्टरची किंमत आवडली झाल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांकरता शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीवर शासकीय अनुदान दिले जाते याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आलेली आहे याकरिता 90% पर्यंत अनुदान हे देण्यात येते.

मित्रांनो ट्रॅक्टरचा वापर फक्त शेतीसाठी न होता तसेच अन्य व्यवसायासाठी आता ट्रॅक्टरचा वापर होत आहे, त्यामुळे शेतकऱ्याला एक उपजीविकेसाठी म्हणजेच शेतीसोबत एक जोडधंदा म्हणून ट्रॅक्टरचा उपयोग देखील आता होत असताना आपण पाहत आहोत. त्यामुळे ट्रॅक्टर हा शेतकऱ्याच्या जीवनातील एक अविभाज्य घटक हा बनलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये फळबागांसाठी मिनी ट्रॅक्टरचा वापरा मोठ्या प्रमाणावरती होताना आपण पाहत आहोत त्यामध्ये फळबागांसाठी औषध मारणे असेल अंतर्गत राणाची मशागत असेल अशा अन्य प्रकारच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर हा केला जाताना आपण पाहत आहोत, यामुळे शेतकऱ्यांच्या कामावरील भार हलका झालेला असून शेतकऱ्याला मजुरांची संख्या कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नामध्ये देखील वाढवताना आपण पाहत आहोत.

मिनी ट्रॅक्टर योजना कशा पद्धतीची आहे? हे आपण पाहूयात

मिनी ट्रॅक्टर योजना ही योजना नोंदणीकृत बचत गटातील व्यक्तींना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळतो तसेच या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याकरिता 90 टक्के अनुदान मिळते, मग त्या साधनांमध्ये रोटावेटर असेल कल्टा वेटर असेल ट्रेलर असेल अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे उपयोगाची साधने या योजनेमार्फत शेतकऱ्याला दिले जातात. एवढेच नाही तर ज्या बचत गटांना या योजनेचा लाभ मिळेल त्या बचत गटांमध्ये 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे, आणि महत्वाचे म्हणजे या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ पुरुष आणि महिला बचत गटांना देण्यात येतो तसेच ट्रॅक्टर व त्याचे उपसाधनांवर तीन लाख पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान देखील देण्यात येते. आणि मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून 9 ते 18 एच पी चा मिनी ट्रॅक्टर हा या योजनेमार्फत देण्यात येतो.

मिनी ट्रॅक्टर योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी अर्जाचा नमुना उपलब्ध आहे व पात्र बचत गटांनी अर्ज सादर करून घेण्याचे आवाहन देखील या माध्यमातून करण्यात आलेले आहे

तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून अर्ज करण्याच्या तारखेच्या संबंधित अधिक माहिती करता अर्जदारांनी स्वतःच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाशी संपर्क साधने गरजेचे आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना या योजनेसाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे ते आपण पाहूयात

 • स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत
 • तसेच अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत
 • स्वयंसहायता बचत गट या गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत
 • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसा दिले यांच्या खरेदीसाठी कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी राहील
 • तसेच स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मर्यादा रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या 10% शिवाय स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90% म्हणजे 3.15 लक्ष शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
 • स्वयंसहायता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदर बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांक संलग्न करावे
 • तसेच बचत गटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्टरच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे.
 • तसेच या योजनेअंतर्गत बचत गटाच्या आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात आलेल्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडतत्त्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकता येणार नाही, तथा गहाण ठेवता येणार नाहीत तसे केल्यास त्या बचत गटावरती तथा स्वयंसहायता बचत गटावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे नमूद करण्यात येत आहे.
 • गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकशी संलग्न खाते पासबुक ची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत तसेच बचत गटाचे घटनापत्र बचत गट कार्यकारणी सदस्यांची मूळ यादी तसेच सदस्याचा स्वतःचा जातीचा दाखला, कोऱ्या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनेपुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात लागू असल्यास आणि विमा उतरवण्याचा खर्च बचत गटाने करावयाचा आहे.
 • ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
 • तसेच ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर 3.15 लाख शासकीय अनुदान हे अनुज्ञेय राहील.

मंडळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना वेळोवेळी अमलात आणत असते, परंतु या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत तथा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही पोहचत नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना त्या योजना संदर्भातील पात्रतेचे निकष अटी शर्ती आवश्यक कागदपत्रे असे संपूर्ण माहिती आपण नेहमी आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून देत असतो तरी आमच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तर आपण अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी, व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.