आता सरकार देणार ड्रोन ला देखील अनुदान

Now the government will also give subsidy to drones.

Now the goernment will also give subsidy to drones महिला बचत गटांना मिळणार ड्रोनवर ८० टक्के अनुदान, ड्रोन ला आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..

Now the government will also give subsidy to drones.

आता सरकार देणार ड्रोन ला देखील अनुदान, केंद्र सरकारने महिला बचत गटांच्या ड्रोन योजनेसाठी १ हजार २६१ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेतून महिलांना तथा महिला बचत गटांना ८ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. २ वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजे २०२४ ते २०२६ या कालावधीत देशातील १५ हजार महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि या योजनेंतर्गत महिला बचत गट शेतकर्यांना देखील भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध करून देतील.

ड्रोन चा वापर इथून मागे आपण फक्त लग्न कार्यासाठी व्हीडीओ शूट साठी वापरलेला पाहत होतो, परंतु आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे ड्रोन चा वापर शेतीसाठी देखील तितकाच उपुक्त ठरत आहे .मंग त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या शेतीसाठी म्हणजे उसाच्या कांद्याच्या अन्य पिकांसाठी फवारणी असेल यांसाठी ड्रोन चा वापर उपयुक्त ठरणार आहे,आणि शेतकऱ्याचा कामाचा भार देखील हलका होणार आहे.

महिला बचत गटाला या योजनेतून ड्रोन किमतीच्या ८० टक्के किवा जास्तीत जास्त ८ लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सध्या एका ड्रोनची किंमत हि १० लाख रुपये आहे, केंद्र सरकार अनुदानाच्या माध्यमातून ड्रोन वरील ३ टक्के व्याज स्वतः भरणार. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत बँकाकडून कमी व्याजदराने कर्ज घेण्याची परवानगी महिला बचत गटांना दिली आहे.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळून शेतकऱ्यांची प्रगती होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी,तसेच शेतकरी समृद्ध व्हावा. हेच उदिष्ट महाराष्ट्र राज्य शासनाचे असते, त्यासाठी अशा प्रकारच्या योजना सरकार नेहमी अमलात आणत असते.

महत्वाचे –

राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि खत कंपन्यांकडून पात्र महिला बचत गटांच्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे, त्यानंतर निवडलेल्या सदस्यांना १५ दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यामध्ये ५ दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच १० दिवस कीटकनाशकांचे प्रशिक्षण देण्यात येईल.राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि खत कंपन्यांकडून ड्रोनची दुरुस्ती आणि यांत्रिक प्रशिक्षणाची आवड असलेल्या सद्स्यांची निवड करण्यत येईल, तसेच त्यांना ड्रोन तंत्रज्ञ म्हणून प्रशिक्षित केले जाईल.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करावी, व आमच्या http://Yojnajankalyankari.com या संकेत स्थळाला आवश्य भेट द्यावी धन्यवाद.

website link

DOWNLOAD PDF