खुशखबर!! दुधासाठी मिळणार आता इतकं अनुदान

Good news!! Now there will be so much subsidy for milk

Good news!! Now there will be so much subsidy for milk राम राम मंडळी शेतकऱ्यांचा शेतीसोबत जोडून असलेला व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि या दुग्ध व्यवसायासाठी तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्यशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, चला तर मग पाहूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती..

दुधासाठी मिळणार आता अनुदान..

मंडळी दुधासाठी आता राज्यशासन अनुदान देणार आहे, हा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे, आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे यामध्ये भरपूर अग्रेसर आहे. परंतु दुधाचे ढासळत चाललेले दर यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडनासा झालेला आहे. या व्यवसायाचा आर्थिक गणित मांडलं तर हा व्यवसाय शेतकऱ्यांना सध्या तोट्याचा ठरत चाललेला आहे असे दिसते. आपण पाहतोय की गेल्या काही वर्षापासून दूध दरांच्या प्रश्नामुळे शेतकरी आणि ग्राहकांचा टेन्शन वाढलेला आहे, हे मात्र खरं आहे.

मित्रांनो शेतकरी शेती सोबत अनेक जोडधंदे करत असतो त्यामध्ये शेळीपालन असेल असेल गाय पालन असेल तसेच कुक्कुटपालन असेल असे भरपूर व्यवसाय शेतकरी शेती सोबत करत असतो आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा या व्यवसायांमधून तो करत असतो. परंतु आता दूध व्यवसायामध्ये जनावर पाळण्याचा जेवढा खर्च येतो त्यातून दुधातून परतावा मिळत तर नाही अशी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची तक्रार आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना महागड्या किमतीत दूध खरेदी करावी लागते अशी ओरड सुरू आहे. म्हणजे राज्यामध्ये दूध उत्पादन करणाऱ्याची झोळी रिकामी तर दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या खिशाला कात्री अशी परिस्थिती सध्या राज्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस दूध उत्पन्नाचा खर्च अमाफ हा वाढत चाललेला आहे, दुसरीकडे आपण पाहत असाल की सातत्याने दुधाचे दर हे ढासळत चाललेले आहेत.

पण मंडळी महाराष्ट्रामध्ये नेमकं दुधाचे दर का पडतायेत आणि त्याला जबाबदार नेमकं कोण आहे असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहतात, शेतकऱ्यांना हा दुधाचा व्यवसाय खरच नक्की परवडतोय का? उत्पादक आणि ग्राहक यांना दूध परवडत नाही, याचा नेमका फायदा कसा आणि कुणाला होतोय तसेच दुधाचा अर्थ कारण कसं चालते असे सर्व प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.

तसेच काल 4 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे, याच्यासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये इतकी अनुदानाची मंजुरी देण्यात आलेली आहे, आणि राज्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3.2 फॅट 8.3snf या प्रतीकर्ता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा सांगण्यात आलेले आहे. आणि याच्या नंतर शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. आणि याच्यासाठीच 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये ही योजना राबवली जाणार आहे, व हे अनुदान दिले जाणार आहे आणि याच्यासाठीच राज्य शासनाच्या माध्यमातून 135 कोटी 44 लाख रुपये इतक्या अनुदान हे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधासाठी दिले जाणार आहे.

मंडळी म्हणजे आता शेतकऱ्यांना खाजगी सहकारी दूध संस्थांमधून 29 रुपये प्रति लिटर आणि शासनाच्या माध्यमातून पाच रुपये प्रति लिटर असा मिळून एकूण 34 रुपयापर्यंतचा दर शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर मिळू शकतो, परंतु त्याला फॅट आणि एसएनएफ असल्याने निर्गमित केलेल्या प्रतिकरतेमध्ये बसली पाहिजे असे एकंदरीत दिसून येत आहे. मित्रांनो सध्याच्या घडीला बघायला गेले तर राज्यात एकूण एक कोटी तीस लाख लिटर दूध संकलित होते, त्यापैकी 90 लाख लिटर दूध हे पाऊच पॅक द्वारे घरगुती गरज भागवण्यासाठी रोज खर्च होत असतं. महाराष्ट्रात ही गरज भागून साधारणपणे 40 लाख लिटर दुधाची पावडर आणि बटर बनत म्हणजेच एकंदरीत विचार केला तर घरगुती गरजेपेक्षा चाळीस लाख लिटर दूध हे महाराष्ट्रात अतिरिक्त निर्माण होतं, आणि हेच वाढतं दूध दुधाच्या भावाच्या चढउतारीचा कारण बनतं.

तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात पावडरचे दर पडले, तर पावडर उद्योग हा दुधाचे दर तातडीने कमी करतो. परंतु अशी तत्परता मात्र दर वाढल्यावरती दाखवली जात नाही हे मात्र खर आहे. कारण यामध्ये पावडर बनवणाऱ्या कंपन्या दूध संकलन करणाऱ्या कंपन्या यांना त्यामध्ये पैसे जास्त प्रमाणात मिळत असतात, त्यामुळे दर वाढला तरी तो शेतकऱ्यांसाठी तेवढाच ठेवला जातो तसाच स्थिर ठेवला जातो.

आपल्या देशासाठी दूध व्यवसाय किती महत्त्वाचा आहे आणि त्याला किती मागणी आहे हे आपण पाहूयात.

मंडळी जगामध्ये भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, आम्ही जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी 22 टक्के दूध उत्पादन हे एकट्या भारत देशामध्ये होतं, आणि त्या खालोखाल ब्राझील अमेरिका चीन पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो, आणि मंडळी आपण पाहायला गेले तर भारताच्या एकूण दूध उत्पादनात उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे राज्य असून त्यानंतर राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब यांचे योगदान आहे. सन 2018 ते 19 या वर्षांमध्ये दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या म्हणण्यानुसार भारताचे दूध निर्यात 126 टक्क्यांनी वाढून एक लाख 23 हजार 877 दशलक्ष टन झालेली आहे. त्यापासून अंदाजे भारताला 2700 कोटी रुपये इतके उत्पादन झालेले आहे. आणि हे सर्व पाहता मंडळी दूध व्यवसाय हा भारताच्या आर्थिक व्यवस्थेमधील सर्वात मोठा कणा आहे असे दिसून येत आहे. आणि मंडळी आपण पाहायला गेलं तर व्यक्तीच्या रोजच्या जीवनामध्ये रोज 300 मिलि तरी दुधाची आवश्यकता आहारामध्ये पाहिजे.

मित्रांनो सध्या भारताची लोकसंख्या तथा जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या प्रमाणामध्ये दुधाची उत्पादन क्षमता देखील वाढणे तितकेच गरजेचे आहे, परंतु हे उत्पादन वाढत असताना त्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा योग्य हमीभाव देखील मिळाला पाहिजे हे देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मध्यंतरी भारतामध्ये एकूण दूध उत्पादनापैकी गाईन पासून 45% तर म्हशी पासून 52% इतके दूध उत्पादन होत होते. परंतु सध्या जर्सी गाईंपासून दुधाची उत्पादन जास्त प्रमाणामध्ये निघत आहे असे सध्या तरी चित्र दिसून येत आहे.

मंडळी आपण पाहिला गेलो तर नेहमीप्रमाणे पाच सहा महिन्या वरती हा दुधाचा दरवाढीचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतच असतो, परिणामी शेतकऱ्यांचे पोट ज्याच्या वरती चालते त्याच्यावर पाय आल्यावर आंदोलन करतात, मंग आंदोलन करत असताना ते कधी रस्त्यावरती दूध ओततात तर कधी दुधाने अभिषेक घालतात. आणि यामध्ये सरकार मात्र प्रश्न सोडवण्याच्या नावावरती तात्पुरती सारवा-सारव करत असते. असो असे सगळे प्रश्न जरी उभे असले तरी आता लोकसभेचे इलेक्शन हे काही महिन्या वरती येऊन उभे आहे आणि त्यामुळे सरकारने दुधाला अनुदान देण्याचे ठरवले आहे.तथा आश्वासन दिलेले आहे, तर मंडळी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच की सरकारने दिलेल्या आश्वासन सरकार कितपत पूर्तता करते, का शेतकऱ्याची झोळी रिकामीच ठेवते, हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावे तसेच आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.