PM उज्वला गॅस योजना 2024

PM Ujjwala Gas Yojana 2024

PM Ujjwala Gas Yojana 2024 राम राम मंडळी पंतप्रधान उज्वला गॅस योजनेमध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच या योजनेसाठी पात्रतेचे निकष, अटी या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूयात.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2.0

PM उज्वला गॅस योजना २०२४, मंडळी 12 ऑगस्ट 2021 पासून देशामध्ये प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही योजना अमलात आणली तथा सुरू करण्यात आलेली आहे. मंडळी आपण जर पाहिलं तर गोरगरीब महिलांना अनुसूचित जाती जमातीतल्या महिलांना तसेच आदिवासी महिलांना याठिकाणी ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा सर्व महिलांना प्रदूषणापासून तसेच चुलीपासून त्यांची सुटका व्हावी याच्यासाठी देशांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम गॅस योजना 2.0 सुरू करण्यात आली होती. अंतर्गत संपूर्ण देशांमध्ये पाच कोटी गॅस वाटपच उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर आठ कोटी पर्यंतचा उद्दिष्ट ठेवण्यात आलं. आणि 2023 पर्यंत नऊ कोटी लोकांना याचा लाभ मिळालेला आहे. आणि हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर सुद्धा लाभार्थी म्हणजे महिला लाभार्थी देखील या गॅस कनेक्शनच्या प्रतीक्षा तथा या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

मंडळी केंद्रशासन ह्या गोरगरिबांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना नेहमी अमलात आणत असते. सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नेहमी म्हणत असतात. आणि हेच उद्दिष्ट हाती धरून पीएम उज्वला गॅस योजना अमलात आणलेली होती. आणि ज्याची सुरुवात ही 12 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे. मंडळी पूर्वी उज्वला गॅस योजना ही राबवत असताना रेशन कार्ड हे आवश्यक होतं, मात्र आता जर आपण पाहिलं तर 2.0 या योजनेमध्ये दिले जाणारे लाभ असतील तसेच मागितली जाणारी कागदपत्र असतील, या सर्वांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

प्रधानमंत्री उज्वला गॅस 2.0 या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गॅस शेगडी गॅस सिलेंडर व रेगुलटर दिला जातो. देशामध्ये आतापर्यंत 9.6 कोटी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि भरपूर लोक याचा लाभ घेणं अजून बाकी आहेत. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना प्राधान्य देण्यात आलेला आहे. तुम्ही कुटुंबातील महिलेचे नावावरती या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला भरलेल्या गॅस सिलेंडर व त्याच्यासोबत तीनशे रुपये अनुदान प्रति सबसिडी मिळते. तसेच या योजनेअंतर्गत आपण भारत गॅस, इंडियन गॅस तसेच एचपी गॅस या तिन्ही गॅस एजन्सीला अर्ज करू शकतो.

पीएम उज्वला गॅस योजनेअंतर्गत आपण कशाप्रकारे अर्ज करू शकतो हे खाली पाहूयात

  • सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती pmuy.gov.इन या केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे
  • त्यानंतर ते पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये apply for new ujjwala 2.0 हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे
  • वरील पर्याय सिलेक्ट केल्यानंतर वेबसाईटचे मुख्य पेज ओपन होईल.
  • त्यानंतर ऑनलाईन पोर्टल या पर्यायावर क्लिक करायचं
  • वरील पर्यावरण सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तीन गॅस एजन्सी चे ऑप्शन दिसतील त्यामध्ये इंडियन गॅस, भारत गॅस व एचपी गॅस असे तीन एजन्सी तुमच्यासमोर दिसतील.
  • त्यानंतर तुम्हाला हव्या त्या एजन्सीवर तुम्ही सिलेक्ट करू शकता.
  • वरील पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील, पहिला म्हणजे रेगुलर करेक्शन रजिस्ट्रेशन आणि दुसरा म्हणजे उज्वला बेनिफैशाली कनेक्शन, याच्यामध्ये तुम्हाला उज्वला बेनफिशियली कनेक्शन हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर गॅस एजन्सी चे नाव हा पर्याय उपलब्ध होईल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गॅस एजन्सी चे नाव सर्च करून सिलेक्ट करायचा आहे, आणि जर तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सी चे नाव जर माहीत नसेल तर तुम्ही तुम्ही लोकेशन हा पर्याय सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीचा नाव शोधू शकता.
  • जर तुम्ही लोकेशन हा पर्याय सिलेक्ट केला,याच्यानंतर तुमच्यासमोर राज्य आणि जिल्हा निवडीचा पर्याय दिसेल, आणि त्यानंतर तुम्ही निवडलेल्या एजन्सीच्या तुमच्या जिल्ह्यातील सर्व एजन्सी तिथे उपलब्ध होतील, आणि त्यातील तुमची जी गॅस एजन्सी असेल ती सिलेक्ट करायची आहे.
  • आणि त्याच्यानंतर ते तुमच्यासमोर एक फॉर्म येईल, तो व्यवस्थित पाहून त्याचे संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरायची आहे.

पात्रतेचे निकष

  • अनुसूचित जातीतील कुटुंबे,अनुसूचित जमातीतील कुटुंबे
  • कोणत्याही श्रेणीतील प्रौढ महिला, म्हणजे कोणतीही महिला अर्ज करू शकते
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे
  • एकाच घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा समान पत्त्यावर कनेक्शन हवे असल्यास आधार ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यात येईल अशा प्रकरणांमध्ये फक्त आधार कार्ड पुरेशी आहे
  • बँक पासबुक

या योजनेमार्फत ग्राहकांना मिळणारे मुख्य फायदे

  • प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 मार्फत भारत सरकार द्वारे रोख मदत करण्यात येते ( 14.2 किलो सिलेंडर साठी 1600 रुपये इतकी रक्कम देण्यात येते तसेच पाच किलो सिलेंडर साठी रुपये 1150 रुपये इतकी रक्कम ग्राहकाला देण्यात येते आणि यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
  • सिलेंडर साठी सुरक्षा ठेव- 14.2 किलो सिलेंडर साठी 1250 रुपये/
  • पाच किलो सिलेंडर साठी 800 रुपये
  • प्रेशर रेगुलेटर साठी 150 रुपये
  • एलपीजी सिलेंडरच्या नळीसाठी 100 रुपये
  • घरगुती गॅस ग्राहक कार्ड 25 रुपये
  • तसेच तपासणी/ मांडणी/ प्रात्यक्षिक शुल्क 75 रुपये
  • तसेच याव्यतिरिक्त या योजनेखालील लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवीमुक्त कनेक्शन बरोबर (ओ एम सी) तर्फे पहिले एलपीजी रिफील आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की पाठवावे व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला आवश्य भेट द्यावी धन्यवाद.