पुणे महानगर पालिकेमध्ये भरती, लवकरात लवकर अर्ज करा..

Pune Municipal Corporation recruitment, apply as soon as possible.

Pune Municipal Corporation recruitment, apply as soon as possible.पुणे महानगर पालिकेच्या वतीने नोकरीसाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगर पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे, येथे क्लर्क काम डाटा एन्ट्री ऑपरेटर ( clerk cum data entry oprator) साठी 16 पदे भरण्यात येणार आहेत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Pune Municipal Corporation recruitment, apply as soon as possible.

पुणे महानगर पालिकेमध्ये भरती करण्यात येत आहे, तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (clerk cum data entry oprator) या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने भरती करण्यात येत आहे. यामुळे पुण्यामध्ये नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे, आणि विशेष करून पदवीधर धारकांसाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे, यामध्ये महिना 21 हजारांपेक्षा जास्त मिळणार आहे.

यामध्ये तुमची वयोमर्यादा ही 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच येथे अर्ज करू शकता. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, याची कॅटेगिरी म्हणलं तर महाराष्ट्र शासनातर्फे ही नोकरी आहे, महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून तथा गावातून अर्ज करू शकता, तुम्ही फ्रेशर असूद्यात किंवा अनुभवी उमेदवार असूद्यात तुम्ही नक्कीच येथे अर्ज करू शकता. या जाहिरातीची अर्ज करण्याची सुरुवात ही 8डिसेंबर पासून झालेली आहे आणि 16 डिसेंबर पर्यंत दुपारी 3 पर्यंत आपण अर्ज पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे अर्ज भरून देऊ शकता,चला तर मग पुढे आपण पाहुयात शैक्षणिकपात्रता, वयोमर्यादा आणि पगार.

पुणे महानगर पालिका भरती 2023

पदाचे नाव – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर

एकूण पदसंख्या – 16

शैक्षणिक पात्रता

BSC पदवी/ पदवी उत्तीर्ण मार्कशीट

टायपिंग प्रमाणपत्र

एम.एस.सि.आय.टी (MSCIT) प्रमाणपत्र

अनुभव प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे

  • फोटो आयडी : आधारकार्ड/पासपोर्ट/वाहन परवाना/पॅनकार्ड इ.
  • जन्म तारखेचा पुरावा : जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/रहिवासी दाखला इ.
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )

अर्जाची पद्धत- ऑफलाईन अर्ज

अर्ज पाठविण्याचा पत्ता- भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक,मंगळवार पेठ, पुणे.
वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – 38 वर्ष
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-16 डिसेंबर
  • पगार- 21840 प्रति महिना

अटी व शर्ती

  • अर्जदार जी कागदपत्रे देणार आहे त्याची जी पात्रता जाहिरातीतील अहर्ता/अटी व शर्तीनुसार मुळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल.
  • दिनांक 16/12/2023 नंतर आवेदन सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, तसेच 16/12/2023 नंतर येणाऱ्या आवेदनपत्राचा कोणताही विचार देखील केला जाणार नाही, असे आवेदनामध्ये स्पष्ट नमूद केले आहे.
  • निवड प्रक्रियेत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मा. अधिष्ठाता, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांना असतील.
  • निवड प्रक्रिया हि मुळ शैक्षणिक अहर्ता व अनुभव गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळीना नक्कीच शेअर करा व आमच्या yojnajankalyankari.com या संकेत स्थळाला आवश्य भेट द्या, धन्यवाद.

DOWNLOAD PDF