नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हफ्ता जमा होणार या दिवशी… मोठी माहिती

The second installment of The NaMo Kisan Samman Nidhi Scheme will be collected on this day. Big info

The second installment of The NaMo Kisan Samman Nidhi Scheme will be collected on this day. Big info राम राम मंडळी PM किसान योजनेचा 16 वा व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हफ्ता कधी जमा होणार आहे,या संदर्भातील माहिती आपण आज पाहणार आहोत.

The second installment of The NaMo Kisan Samman Nidhi Scheme will be collected on this day. Big info

नमो शेतकरी योजनेचा दुसरा व पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हफ्ता कधी मिळणार या बद्दलची आतुरता देशातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी मंडळीना लागली आहे, पहिले फक्त केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देत होती. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने यामध्ये भर घातली, आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली, आणि त्याचा पहिला हफ्ता गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार प्रती शेतकरी, प्रती वर्ष 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार, यामुळे केंद्राचे 6000 हजार व राज्याचे 6000 हजार प्रती वर्ष शेतकऱ्यांना मिळणार. आणि याचा लाभ एक कोटी पंधरा लाख कुटुंबाना मिळतोय, या योजनेमुळे राज्यसरकारवर 6900 कोटी रुपयांचा भर पडणार आहे.

देशातील तथा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना अमलात आणत असते, त्यामधील नमो शेतकरी सन्मान निधी योजना हि एक महत्व पूर्ण योजना आहे. या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीवर्ष 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा पहिला हफ्ता शेतकर्यांना वितरीत करण्यात आलेला आहे, परंतु दुसरा हफ्ता कधी मिळणार याची वाट आता राज्यातील शेतकरी पाहू लागले आहेत. कारण राज्यामध्ये काही ठिकाणी आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, व यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, यामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे संकटात आला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांमधून मिळणाऱ्या पैशातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडा तरी आर्थिक आधार मिळेल.

राज्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता ज्यांना मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हफ्ता वितरीत करण्यात आलेला आहेनमो शेतकरी योजनेचा पाहिला हफ्ता 26 ऑक्टोबर ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला, आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जमा करण्यात येणार आहे. तसेच पाहिला हफ्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना तो कधी मिळेल, तसेच नमो शेतकरी योजनेचा पाहिला हफ्ता व दुसरा हफ्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल, हे पाहुयात.

प्रधानमंत्री किसान योजनेत जे शेतकरी पात्र झाले आहेत त्याच शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरविले आहे, त्यामुळे केंद्राच्या हफ्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या 93 हजारांहुन अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता मिळालेला नाही. सध्या राज्य शासनाकडून नमो शेतकरी चा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन सुरु आहे, पंधरावा हफ्ता जमा केलेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती केंद्राकडून राज्य शासनाने मागवली आहे. ही माहिती येत्या आठवडाभरात प्राप्त होईल.

त्यानंतर या माहितीची छाननी करून महाआयटी कडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आधार संलग्न बँक खात्यातच शेतकऱ्यांना हफ्ता वर्ग करण्यात येईल, अशी सूचना केंद्राने केली होती, परंतु चौदावा हफ्ता देताना ही अट शिथिल करण्यात आली, त्यामुळे राज्यातील 85 लाखांच्या वर शेतकऱ्यांना चौदावा हफ्ता मिळाला, परंतु 15 नोव्हेंबरला 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना ही अट पुन्हा लागू केली, आणि फक्त आधार सलग्न बँक खात्यातच 15 व्या हफ्त्याचे पैसे वितरण करण्यात आले.

तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेल्या 90 हजारांवरून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हफ्त्याचे 2000 हजार रुपये मिळालेले नाहीत, परंतु या शेतकऱ्यांना वितरित न केली गेलेली रक्कम त्यांच्या बँक खाते आधार सोबत लिंक झाल्यावर त्यांना ते पैसे मिळून जातील, तशी सुविधा केंद्राने केलेली आहे, असे सूत्रांच्या माहितीकडून कळते आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचाही पहिल्या हफ्त्यात जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांना देखील पाहिला व दुसरा हफ्ता जे शेतकरी पात्र ठरतील त्यांना मिळेल, विशेष बाब म्हणजे नववर्षाच्या आधीच या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होऊ शकतो अशी माहिती एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आलेली आहे. मात्र या योजनेचा दुसरा हप्ता राज्यातील जवळपास 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही असे चित्र दिसत आहे, कारण की केंद्र सरकारने पी एम किसान चा पंधरावा हप्ता बँक खात्यासोबत आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना दिलेला नाही. 14 वा हप्ता हा 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांना मिळालेला आहे, परंतु पंधरावा हप्ता आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्याने फक्त 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील राज्यातील 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांनाच मिळेल असे दिसून येत आहे. म्हणजेच राज्यातील जवळपास 93 हजार शेतकरी नमो शेतकरी सन्माननिधी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल असे दिसून येत आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी, व आमच्या Yojnajankalyankari.com या वेबसाईटला आवश्य भेट द्यावी,धन्यवाद.