जेष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या फायद्याच्या 3 योजना

3 government benefits schemes for senior citizens

3 government benefits schemes for senior citizens राम राम मंडळी केंद्र शासन नेहमी सर्व सामान्य नागरिकांच्या फायद्याच्या योजना आमलात आणत असते, परंतु आता केंद्र शासनाने जेष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने देखील या 3 योजना सुरु केलेल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात या योजना बाबतची संपूर्ण माहिती.

3 government benefits schemes for senior citizens

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या फायद्याच्या तीन योजना, मंडळी माणसाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत, पण त्या मिळवण्यासाठी माणसाला पैसे कमवणे फार गरजेचे आहे तर त्या माणसाचे जीवन हे पैशाशिवाय अपूर्ण आहे तर पैसा नसेल तर माणूस जीवन जगू शकत नाही. आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षांपुढील आयुष्य हे चांगल्या प्रकारे व स्वाभिमानी जगण्यासाठी पैसा खूप आवश्यक आहे, साठ वर्षानंतर म्हणजेच निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांचे पुढील आयुष्य हे फार जगणे अवघड असते म्हणजे म्हातारपणी जर पैसे नसेल तर त्यांच्या जगणे खूप अवघड होऊन बसते, कारण की उतार वयात जवळ पैसे नसले तर आपले सुद्धा कंटाळा करतात, म्हणजे त्यांच्या जवळची माणसे सुद्धा व्यवस्थित वागवत नाहीत, आणि त्यामुळे जेष्ठ नागरिकांना 60 वर्षानंतर म्हणजेच निवृत्तीनंतर स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसा हा खूप आवश्यक असतो जेणेकरून त्यांचे पुढील आयुष्य हे त्यांच्या हिमतीनुसार ते जगू शकतील व निवांतपणे जगू शकतील.

आणि मंडळी त्यामुळेच सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अनेक निवृत्ती योजना आहेत, म्हणजे सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निवृत्ती योजना या अमलात आणलेल्या आहेत. त्यात काही गॅरेंटेड पेन्शन योजना या योगदानांवर कर कपात आणि अगदी कर्ज यासारखे लाभही देतात तसेच या पेन्शन योजनातून ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे परताव्याच्या रूपात पैसे सुद्धा मिळतात. आणि म्हणूनच आपण केंद्र शासनाने ज्या योजना या ज्येष्ठ नागरिकांसाठी अमलात आणलेल्या आहेत या तीन योजनांची माहिती आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना या योजनेतून पैशांचा परतावा कशाप्रकारे मिळेल कशा प्रकारे त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो, आणि त्यांना या निवृत्तीनंतरचे म्हणजे साठ वर्षां नंतरचे जीवन कसे सुखाचे समृद्धीचे आणि व्यवस्थित जावं हे या योजनेतून आपण पाहणार आहोत.

मंडळी निवृत्ती वेतन योजना, सेवानिवृत्ती लाभ, आरोग्य सेवा आणि प्रवास सवलतींसह भारतात अधिक सुरक्षितपणे जगण्यास मदत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा आणि संसाधने उपलब्ध ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करून देण्यात येतात. आणि यापैकीच भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काही प्रमुख सरकारी योजना या केंद्र शासनाने अमलात आणलेल्या आहेत. आणि यासाठी सरकारने या तीन योजना अमलात आलेल्या आहेत त्यापैकी पहिली योजना आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस- नॅशनल पेन्शन सिस्टीम ) दुसरी योजना आहे (इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना IGNOAPS) आणि तिसरी योजना आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना (prime Minister Vaya Vandana Yojana) या तिन्हीही केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या फायद्याच्या योजना संदर्भातील माहिती आज आपण सविस्तरपणे पाहूयात.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजना (NPS- नॅशनल पेन्शन सिस्टीम)

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजना म्हणजेच (एनपीएस नॅशनल पेन्शन सिस्टीम) ही एक निवृत्ती बचत पेन्शन योजना आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाणारी ही एक योजना आहे. ही योजना निवृत्तीनंतरच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेस 60 वर्षानंतर निवृत्त होतात त्यानंतर त्यांना जर योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक करायची असेल तर ही एक उत्तम योजना आहे, ही योजना भारताच्या नागरिकांना वयानुसार सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने 2004 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मुदतपूर्व देखील पैसे काढता येतात, म्हणजे या योजनेमध्ये तर तुम्ही गुंतवणूक केली असेल आणि तुम्हाला मुदतीपूर्वी जर ह्या योजनेमधून पैसे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता, एनपीएस योजनेचे प्रामुख्याने प्रथम श्रेणीत आणि द्वितीय श्रेणी असे दोन प्रकार पडतात. जर तुम्हाला या योजनेमधून जर मुदतीपूर्वी पैसे काढायचे असल्यास तुम्हाला द्वितीय श्रेणी मधून अधिक चांगला परतावा मिळू शकतो.

मंडळी अलीकडच्या काळामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करीत आहेत त्यामुळे या योजनेची लोकप्रियता वाढलेली असून खाजगी अथवा सरकारी अशा कोणत्याही कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ घेता येतो. पेन्शन नियमक पीएफआरडीएने सप्टेंबर मध्ये काढलेला आहे का परिपत्रकानुसार प्रत्येक व्यक्तीला या योजनेमध्ये वयाच्या अठराव्या वर्षानंतर कधीही गुंतवणूक करता येते, म्हणजे मंडळी तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षानंतर कधीही या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करून नंतर म्हणजे वृद्धपकाळामध्ये म्हणजे साठ वर्षानंतर या योजनेच्या लाभातून तुम्हाला पेन्शन चालू होऊ शकते आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. आणि मित्रांनो तुम्हाला जर मुदतपूर्वक पैसे काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा असलेल्या एकूण रकमेच्या 20% रक्कम काढता येते तर उर्वरित रक्कम तुम्हाला वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन स्वरूपात मध्ये दिली जाते.

आणि मंडळी जर तुम्ही या योजनेमध्ये पाच लाखांपर्यंत जर रक्कम गुंतवले असेल तर वयाचे साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व रक्कम खात्यातून काढून घेऊ शकता मात्र रक्कम जर पाच लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यातील 60% रक्कम ही तुम्हाला काढता येते, आणि उर्वरित राहिलेली जी 40% रक्कम आहे ती पेन्शन स्वरूपात तुम्हाला दिली जाते आणि या योजनेच्या लाभार्थ्यांचा जर मृत्यू झाला असेल म्हणजे जर ही योजना चालू असताना जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या या योजनेचा जो नॉमिनी आहे त्याला हे सर्व लाभ दिले जातात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS)

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ही योजना एक पेन्शन योजना आहे, या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीची आवश्यकता नाही, म्हणजे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे पैशाची गुंतवणूक ही करायची नाही. मंडळी या योजनेचा लाभ साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 600 ते 1000 रुपये पर्यंत पेन्शन ही दर महिन्याला मिळते. परंतु आता या योजनेच्या लाभात शासनाकडून वाढ करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिना रक्कम दिली जाते. आणि मंडळी या योजनेचा लाभ हे सर्व प्रकारचे लाभार्थी विशेष करून जे ज्या दारिद्र्यरेषेखाली आहेत ते नागरिक घेऊ शकतात, आणि या योजनेचा लाभ साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक हे घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुकास्तरावरील तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज हा करावा लागेल.

प्रधानमंत्री वय वंदना योजना (prime Minister Vaya Vandana Yojana)

मंडळी प्रधानमंत्री वय वंदना योजना ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वपूर्व योजना आहे, तसेच प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ हा साठ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती घेऊ शकते या योजनेचा कालावधी हा दहा वर्षाचा आहे, पीएम वय वंदना योजनेअंतर्गत एक महिना,तीन महिने सहा महिने आणि वार्षिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. यापैकी कोणत्याही सुविधेचा जर लाभ घ्यायचा असेल तर गुंतवणूकदार हा स्वतः निवडू शकतो, म्हणजे त्याला जर एक महिन्याचा लाभ घ्यायचा असेल, तीन महिन्याचा घ्यायचा असेल, सहा महिन्याचा घ्यायचा असेल किंवा तर वार्षिक पेन्शन सुविधा लाभ घ्यायचा असेल तर तो गुंतवणूक करणारा जो गुंतवणूकदार आहे तो स्वतः त्याच्या पसंतीनुसार हा लाभ निवडू शकतो. तसेच या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला वार्षिक आठ टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. या योजनेमध्ये 1 हजार रुपयांपासून ते 15 लाखांपर्यंत गुंतवणूक ही केली जाऊ शकते, आणि त्यातून मिळणारा व्याज परतावा हा देखील गुंतवणुकीच्या हिशोबानेच मिळणार आहे.

अशाप्रकारे केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या या तीन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण योजना या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.