PM विश्वकर्मा योजना 2024

PM Vishwakarma Yojana 2024

PM Vishwakarma Yojana 2024 नमस्ते मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला 2 लाख 15 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते,हि जी रक्कम लाभार्थ्याला या योजने अंतर्गत दिली जाते, या संदर्भातील अटी,शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत.या बाबतची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या संकेतस्थळा मार्फत पाहूयात.

PM Vishwakarma Yojana 2024

पीएम विश्वकर्मा योजना, मंडळी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. देशातील जेवढे समाज आहेत त्या समाजातील लोकांच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी विश्वकर्मा जयंती निमित्त पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार यांच्यासाठी ही योजना प्रामुख्याने सुरू करण्यात आलेली आहे आणि या लोकांसाठी ही योजना खास आहे.

पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी 13000 कोटी रुपयांची तरतूद ही केंद्र शासनाने विश्वकर्मा योजना या योजनेसाठी केलेली आहे. तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर आणि कारागिरांना आर्थिक मदती केली जाणार आहे, त्यामध्ये मग सोनार असतील कुंभार, लोहार इत्यादींपैकी अजून अठरा जातीतील असंघटित व्यवसायांशी संबंधित लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा फायदा हा होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत सोबतच आधुनिक प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.

मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सुरुवातीला एक लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे, त्या रकमेची परतफेड जर लाभार्थ्यांनी वेळेवर केली तर त्याला अजून एक लाख रुपये म्हणजे दोन लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे आणि 15000 रुपये लाभार्थ्याला हे अनुदान स्वरूपात वस्तूंसाठी दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत फक्त पाच टक्के इतके व्याजदर हे लाभार्थ्याला त्या कर्जावरती लागणार आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना 2024 या योजनेअंतर्गत कोणते कोणते लाभार्थी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात ते आपण खाली पाहुयात

  • मित्रांनो सोने चांदीवर आधारित जे व्यवसायिक आहेत म्हणजे सोनार,सुवर्णकार हे या योजनेसाठी पात्र ठरू शकतात म्हणजे या योजनेचा लाभ हे देऊ शकतात
  • तसेच लाकूड व्यवसायावर आधारित जे व्यवसायिक आहेत म्हणजे सुतार बोट बनवणारे इत्यादी समाजातील लोक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात
  • तसेच लोह धातूंवर आधारित दगडी व्यवसायिक लोहार, हॅमर आणि टूलकिट मेकर तसेच लॉकस्मिथ व शिल्पकार म्हणजे त्यामध्ये मूर्तिकार असतील दगडी कोरीव काम करणारा माणूस असेल दगडी तोडणारी असतील अवजारे बनवणारे असतील असे सर्व समाजातील तसेच सर्व व्यवसायातील लोक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
  • तसेच मंडळी कुंभार,मोची, पादत्रणे बनवणारी, न्हावी,मच्छीमार,धोबी, शिंपी,बडीगर, भारद्वाज,खेळणी बनवणारे, माळी, गवंडी,कुलूप बनवणारे, विणकर, बग्गा कामगार इत्यादी प्रकारच्या सर्व असंघटित कारागिरांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तथा मिळणार आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना तसेच लाभार्थ्यांना 15 हजार रुपये किमतीचे साहित्य केंद्र सरकारकडून प्रोत्साहन पर म्हणून दिले जाणार आहे. म्हणजे मंडळी जर कारागरांनी जर त्या योजनेअंतर्गत जर प्रशिक्षण पूर्ण केले तर त्याला लगेच काम सुरू करण्याकरता भांडवलाची उपलब्धता ची गरज भासणार याचा विचार करून केंद्र शासनाने प्रोत्साहन पर साहित्यकरांसाठी पंधरा हजार रुपये इतकी रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांना मिळणार आहे.

तसेच पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन पैसे मिळाल्यास पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल याच उद्देशाने केंद्र सरकार प्रशिक्षण करताना अनुदान स्वरूपात रक्कम देत आहे.

तसेच पीएम विश्वकर्मा लाभार्थी ओळखण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देखील दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रत्येक कारागिराला पाचशे रुपये रोज इतके पैसे लाभार्थ्यांना विद्यावेतन म्हणून दिले जाणार आहे. तसंच मंडळी या योजनेमुळे विश्वकर्मा समुदायातील लोकांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढवून बेरोजगारीचे प्रमाण हे कमी होणार आहे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या कारागीरास व्यवसाय सुरू करण्यासाठी 5% व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत दरवर्षी हा रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे तस तथा मिळणार आहे विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे.

तसेच मंडळी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर जो व्यवसाय प्रत्येक कारागीर किंवा प्रशिक्षक घेईल त्या व्यवसाय करता पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मार्केटिंग सुद्धा करण्यासाठी सरकार मदत करणार आहे. मंडळी या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ हे देशातील शहरी व ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायिकांना मिळणार आहे हे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच मंडळी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील सर्व पारंपरिक मजुरांचा आर्थिक विकास व स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे हे या योजनेमागची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

पीएम विश्वकर्मा योजना या योजनेसाठी पात्रता काय आहेत ते आपण पाहूयात

  • या योजनेसाठी भारतातील रहिवाशी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तथा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • या योजनेत विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणारा 140 जाती अर्ज करू शकतात
  • तसेच भारतातील सर्व कारागीर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी देखील करू शकतात
  • पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असल्या अत्यंत गरजेचे आहे.
  • तसेच लाभार्थी या योजनेअंतर्गत जर लाभ घेत असेल तर त्याने याच्या व्यतिरिक्त कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या क्रेडिट आधारित योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • तसेच या योजनेअंतर्गत कुटुंबातील एकच सदस्य या योजने करता अर्ज करू शकतो.

पीएम विश्वकर्मा योजना या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत ते आपण पाहूयात

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • तसेच अधिवास प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा संपूर्ण पत्त्याचा पुरावा
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराचे बँक पासबुकची झेरॉक्स
  • तसेच अर्जदाराचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

पंतप्रधान विश्वकर्मा योजना या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा ते आपण खाली पाहुयात

पीएम विश्वकर्मा योजना या योजनेसाठी आपण अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने दाखल करायचा आहे.

या योजनेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर केंद्र शासनाच्या https://pmvishwakarma.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

तसेच तुम्हाला या योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन या योजने करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा दाखल करू शकता.

पीएम विश्वकर्मा योजना 2024 या योजने करता तुम्ही वरील दिलेल्या सर्व पात्रता निकष व अटींमध्ये तसेच जर तुमच्याकडे वरील दिलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता, मित्रांनो केंद्रशासन नेहमी देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच देशातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी कायम लाभाच्या तथा फायद्याची योजना या अमलात आणत असते परंतु या लोकांपर्यंत या योजनांची माहिती ही वेळोवेळी पोहोचत नाही आपण आपल्या या संकेतस्थळामार्फत दररोज वेगवेगळ्या केंद्र शासनाच्या असो तथा देशातील राज्यातील सर्व योजनांची माहिती वेळोवेळी आपण आपल्या संकेतस्थळामार्फत ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो, तरी या संकेतस्थळाद्वारे आपल्या देशातील सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की वरील योजनेच्या लाभासाठी जेवढे पात्र नागरिक असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे व या योजनेचा लाभ घ्यावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र मंडळींना नक्की शेअर करावी व आपल्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.