लखपती दीदी योजना 2024

Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024 नमस्ते मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून लखपती दीदी योजना सुरु करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा उद्देश आहे. चला तर मग जाणून घेऊयात या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती.

Lakhpati Didi Yojana 2024

लखपती दीदी योजना, मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांना व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी भरपूर योजना अमलात आणल्या जातात. आणि आता केंद्र शासनाच्या माध्यमातून माता-भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आलेली आहे, मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये नुकताच 77 व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. आणि त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपूर अशा घोषणा केल्या होत्या. आणि त्यामध्येच लखपती दीदी योजना या योजनेची घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देऊन महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केल जातं. तसेच विविध लघु उद्योगासाठी लागणारे मार्गदर्शन प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाईल.

मित्रांनो ही योजना म्हणजेच लखपती दीदी योजना ही योजना पहिल्यापासूनच काही राज्यांमध्ये सुरू आहे. आणि मंडळी 2023 मध्ये म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 मध्ये दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे या पहिल्या या योजनेमध्ये एक कोटी महिलांचे सक्षमीकरण करण्याचा ध्येय होतं, परंतु आता त्यामध्ये दोन कोटी महिलांचा सक्षमीकरण करण्याचे हे सांगण्यात आलेलं आहे.

मंडळी आपण पाहिलं तर आपल्या देशातील महिला खेड्यापासून शहरापर्यंत मग ते अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये अगदी अग्रस्थानी काम करताना आपल्याला दिसून येतात, मग आपण पाहिलं असेल आता पूर्वीसारख्या महिला फक्त चुल आणि मुल न पाहता त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मग त्यात पायलेट असेल ड्रायव्हर असेल पोलीस असेल मोठ्या मोठ्या उच्च पदावर आज महिला काम करताना आपल्याला पाहायला दिसतात. प्रत्येक क्षेत्रावरती आता या महिला आपल्याला वर्चस्व गाजवताना दिसतात आणि या महिलांसाठीच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना म्हणाले गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका तसेच विविध व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिला यांना दीदी या नावाने संबोधले जाते, आणि आता अशाच महिलांना लखपती बनवण्यासाठी शासन विविध योजना आखत आहे.

मित्रांनो मग त्यामध्ये बचत गटाशी संलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्यांचा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनून या महिलांना लखपती करणे हे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा केंद्र शासनाचा आहे. मग या प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग बाबत माहिती दिली असेल म्हणजे प्लंबिंग काम करणे, एलईडी बल्ब निर्मिती करणे, ड्रोन चालवणे विविध यंत्र दुरुस्ती करणे अशा प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षण या मार्फत देण्यात येतील. आणि केंद्र शासनाच्या या प्रशिक्षणाच्या निर्णयामुळे महिलांची आर्थिक परिस्थिती तसेच कुटुंब सुधारणांमध्ये त्यांचा हातभार लागणार आहे. आणि त्यामुळेच आपल्या देशातील महिला या सक्षम व स्वावलंबी बनतील, हा प्रमुख उद्देश या योजनेअंतर्गत आहे.

आता कालच एक फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प हा अर्थ तथा वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी प्रसिद्ध केला तथा मांडला. आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विशेष असे प्राधान्य देण्यात आलेले आहे असे दिसून येते. आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असे सांगितले की पूर्वी या योजनेअंतर्गत दोन कोटी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक साह्य केले जात होते, परंतु आता लखपती दीदी या योजनेअंतर्गत अतिरिक्त एक कोटी महिलांचा समावेश करून तीन कोटी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचे एकमेव उद्दिष्टे हे आहे की ज्या महिला आर्थिक पाठबळ ज्यांना कमी आहे तथा आर्थिक दृष्ट्या ज्या महिला कमजोर आहेत परंतु त्या महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे तथा त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन या महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम या योजनेद्वारे करण्यात येणार आहे.

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषण करत असताना असे सांगितले की या योजनेअंतर्गत 9 करोड महिलांचे जीवनमान बदललेले आहे म्हणजे त्या सक्षम झालेल्या आहेत व त्या आत्मनिर्भर झालेल्या आहेत. तसेच लखपती दीदी योजना या योजनेअंतर्गत फायनान्शिअल नॉलेज हे महिलांना दिले जाते, म्हणजे त्यांना म्हणजेच महिलांना बजेट, सेविंग, इन्व्हेस्टमेंट अशा भरपूर गोष्टींची माहिती दिली जाते. लखपती दीदी या योजनेअंतर्गत महिलांना मायक्रो क्रेडिट सुविधा दिली जाते या अंतर्गत त्यांना छोटे छोटे लोन उपलब्ध करून दिले जातात.

लखपती दीदी योजना या योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग यावरती लक्ष केंद्रित केलं जातं आणि महिलांना आंतरप्रनर बनवण्यासाठी म्हणजे ज्या महिलांना उद्योग चालू करायचा आहे अशा महिलांना मार्गदर्शन दिलं जातं. आणि या योजनेअंतर्गत महिलांना फायनान्शिअल सुरक्षा सुद्धा दिली जाते म्हणजे त्यांचं विमा कव्हरेज काढलं जातं आणि त्यांच्या कौटुंबिक सुरक्षा देखील यामधून वाढवली जाते. तसेच या योजनेअंतर्गत महिलांना डिजिटल बँकिंग सेवा असेल मोबाईल वॉलेट सेवा असेल तसेच अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म वरती त्यांचा वापर कसा करावा याच मार्गदर्शन तथा या डिजिटल सेवांचा उपयोग कसा करायचा यासाठी प्रोत्साहित केले जातं. तसेच या योजनेअंतर्गत भरपूर एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम म्हणजे कार्यक्रम चालवले जातात त्याच्यामधून महिलांचा कॉन्फिडन्स तथा आत्मविश्वास वाढवला जातो.

लखपती दीदी योजना या योजनेसाठी लागणारे पात्रतेचे निकष आपण पाहूयात

  • लखपती दीदी योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे
  • बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल
  • सदर योजनेत समाविष्ट झाल्यानंतर महिलांची प्रशिक्षण घेण्याची तयारी असावी
  • अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न कमी असावं

लखपती दीदी योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण खाली पाहुयात

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • पॅनकार्ड झेरॉक्स
  • बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  • शैक्षणिक कागदपत्र
  • रहिवासी दाखला
  • आधार संलग्न मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

लखपती दीदी योजना या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना सक्षमीकरण तथा त्यांना आर्थिक पाठबळ देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. तसेच आशा वर्कर्स अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजना अंतर्गत लाभ देणार असल्याचे सांगितले. तसेच मित्रांनो गर्भाशयाचे कॅन्सर साठी मुलींना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याच्या असल्याचे देखील काल सांगण्यात आले. तसेच महिलांना उच्च शिक्षणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

लखपती दीदी योजना या योजनेअंतर्गत देशातील महिलांसाठी केंद्र शासनाने एक पुढचं पाऊल हे टाकलेलं आहे, जेणेकरून ज्या महिलांना आर्थिक पाठबळ कमी आहे, ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, परंतु ज्या महिलांची इच्छा ही व्यवसाय करण्याची आहे अशा महिलांना लखपती दीदी योजना या योजनेअंतर्गत आर्थिक पाठबळ तथा प्रशिक्षण हे दिले जाणार आहे. जेणेकरून त्या महिलांचे सक्षमीकरण होईल व त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुद्धा सुधारेल व त्यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीला या महिलांकडून हातभार लागेल हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. देशातील आर्थिक दुर्लभ नागरिकांसाठी केंद्र शासन विविध योजना अमलात आणत असते, परंतु या योजनांची माहिती अटी शर्ती पात्रतेचे निकष हे नागरिकांपर्यंत वेळेवरती पोहोचत नाही आणि नागरिक या योजनांपासून वंचित राहतात.तरी या संकेतस्थळामार्फत देशातील सर्व महिलांना/ नागरिकांना विनंती आहे की आपण केंद्र शासनामार्फत ज्या फायद्याच्या तथा लाभाच्या योजना अमलात आणत असते या योजनेचा लाभ आपण घ्यावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.