मोफत पिठाची गिरणी योजना|Free flour mill scheme 2024

Free flour mill scheme 2024

Free flour mill scheme 2024 महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत म्हणजेच जिल्हा परिषद च्या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येतात, चला तर मग जाणून घेऊयात या संदर्भातील अटी शर्ती तसेच अर्ज कसा व कुठे करायचा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतील व पात्रतेचे निकष बाबतीतील संपूर्ण माहिती पाहुयात..

Free flour mill scheme 2024

मोफत पिठाची गिरणी योजना, मंडळी महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रशासनाच्या मार्फत नेहमी शेतकऱ्यांच्या अबाल वृद्धांच्या तसेच महिलांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना वेळोवेळी अमलात आणत असतात. तसेच आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो महिलांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. या योजनेमुळे ज्या महिला बेरोजगार आहेत तथा ज्या महिला फक्त घरकाम करत आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे.

मंडळी राज्य शासन नेहमी तरुणांच्या असतील ज्येष्ठ नागरिकांच्या असतील तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील अशा सर्व लोकांच्या हिताच्या योजना नेहमी अमलात आणत असते. आणि या सर्व योजनांमधून शेतकऱ्यांचा असेल तथा सर्वसामान्य नागरिकांचा असेल त्यांच्या आर्थिक स्थिती सुधरावी व त्यांचे तसेच शेतकरी तथा सर्व सामान्य नागरिक हा समृद्ध व्हावा हेच या सर्व योजना मागचं राज्य शासनाचे उद्दिष्ट असते. आणि आता याच पार्श्वभूमीवरती महिला देखील समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने मोफत पिठाची गिरणी योजना 2024 ही योजना राज्य शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत सुरू केलेली आहे.

मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळणार आहे. ही योजना खास करून ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांसाठी राबवली जात आहे. जेणेकरून खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल व महिलांना गरीब बसून चांगले उत्पन्न घेता येईल आणि ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांचे आर्थिक परिस्थिती सक्षम करणे तसेच सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कारण की पिठाची गिरणीपासून उत्पन्न चांगले मिळते आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात.

तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलां सोबत शहरी भागातील महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येत येणारी एक महत्त्वाची योजना आहे मोफत पिठाची गिरणी मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हा शासनाकडून म्हणजेच जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत आहे.

मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे महिला वर्ग स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे तसेच ज्या महिलांचे एक लाख वीस हजार पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष काय आहेत ते आपण खाली पाहुयात

  • या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिला घेऊ शकतात
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना घेता येईल
  • ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात

मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत नियम व अटी काय आहेत ते आपण खाली पाहुयात

  • लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व साठ वर्षापेक्षा कमी असावे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • या अगोदर लाभार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतलेला नसावा. तसेच या योजनेअंतर्गत आलेल्या सर्व अर्जा पैकी पात्र असलेल्या लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाजकल्याण समितीला राहील
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार सर्व अटींची पूर्तता करत आहे याची खात्री करून मग अर्ज करावा, अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो
  • म्हणजेच लाभार्थ्याने वरील दिलेल्या सर्व अटींमध्ये आपण पात्र आहोत का हे, आधी पाहावे आणि मगच अर्ज करावा

मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज कशा पद्धतीने व कोठे करावा हे आपण खाली पाहुयात

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभागात अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अर्ज करावा लागेल
  • तसेच या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात तुम्हाला या ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करावी तसेच तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही याची माहिती घ्यावी. योजना जर सुरू असेल तर अर्ज करण्याची पद्धत विचारावी मग पूर्ण तयारीने तसेच संपूर्ण कागदपत्रे पूर्तता करून मगच अर्ज आपला सादर करावा.
  • तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो, ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे, व ज्या महिला मोठ्या मोठ्या सिटी मध्ये शहरांमध्ये राहतात व या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून ज्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशा महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • ज्या महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अशा महिलांना अर्जाचा नमुना लागेल तो तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागात तुमच्या जिल्ह्यानुसार मिळून जाईल.

मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराची जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र तथा स्वयंघोषणापत्र
  • आधार संलग्न मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज पाहिली, या योजनेसाठी लागणारे अटी शर्ती तसेच आवश्यक कागदपत्रे व पात्रतेचे निकष, व ही योजना जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. तरी या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व महिलांना एक विनंती राहील, की जर आपण या योजनेस पात्र असाल तर आपण लवकरात लवकर अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करावी, व आमच्या yojnajankalyankari.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी धन्यवाद.